Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus News: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली

ST Bus News: एसटी प्रवासातील शासनाच्या विविध सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 03:55 PM
सवलतीच्या तिकिटासाठी आजपासून एसटीमध्ये एनसीएमसी कार्ड बंधनकारक; कार्ड नसेल तर सवलत नाही

सवलतीच्या तिकिटासाठी आजपासून एसटीमध्ये एनसीएमसी कार्ड बंधनकारक; कार्ड नसेल तर सवलत नाही

Follow Us
Follow Us:
  • NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
  • NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली
मुंबई : एसटी प्रवासादरम्यान (ST Bus News) शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्रत्यक्षात प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एमएसआरटीसी) अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनाकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मोफत प्रवासाची सुविधा, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता.

ST Employees: अतिवृष्टीमुळे गैरहजर ST कर्मचाऱ्यांना विशेष रजा द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

मात्र, राज्यभरातील लाखो पात्र प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली, तरी अनेकांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. अशा परिस्थितीत केवळ कार्ड उपलब्ध नसल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या सवलतींपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल परिवहन विभागाने घेतली आहे.

याबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

या निर्णयामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्यांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज केला आहे, पण अद्याप कार्ड मिळालेले नाही, त्यांनाही या वाढीव मुदतीदरम्यान पूर्वीप्रमाणेच शासनाच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, परिवहन विभागाने पात्र प्रवाशांना वाढीव मुदतीचा लाभ घेत NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. १ सप्टेंबरनंतर स्मार्ट कार्डची अनिवार्यता लागू होण्याची शक्यता असल्याने, लाभार्थ्यांनी वेळेत कार्ड मिळवून भविष्यातील गैरसोय टाळावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यभरात एसटी सेवेद्वारे दररोज लाखो महिला आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. त्यामुळे मुदतवाढीच्या या निर्णयामुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि अद्याप कार्ड न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

Web Title: Maharashtra st bus ncmc smart card deadline extended till september 1 st bus news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
1

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
2

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
3

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
4

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.