Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

MSRTC NCMC Card: एसटी महामंडळाच्या NCMC कार्ड प्रकल्पात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. २१ सप्टेंबरपासून बायोमेट्रिक जुळत नसलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार OTPद्वारे नोंदणी करता येणार असून, हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड ब्लॉक करून ₹१९९ शुल्कात नवीन कार्ड मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 18, 2026 | 07:18 PM
एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Follow Us
Follow Us:
  • एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल
  • आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
  • बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार OTPचा पर्याय
MSRTC NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले असून, संबंधित लाभार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार OTPचा पर्याय

ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी दि. २१ सप्टेंबर २०२६ पासून आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड पुन्हा मिळणार

२१ सप्टेंबरपासून हरवलेले अथवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून रु. १९९ शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबरपासून कार्ड वितरण

१९ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना दि. २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

QR कोड पावतीद्वारे सवलतीचे तिकीट

१६ सप्टेंबरपासून NCMC कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी ३० दिवसांच्या आत NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा प्रवास अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सर्व सवलतधारकांनी तातडीने NCMC नोंदणी करावी

एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारक लाभार्थ्यांनी तात्काळ NCMC कार्ड नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. NCMC कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे.

एसटीत सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; अकोला विभागात 3 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांकडे नवं कार्ड

Web Title: Msrtc ncmc card registration aadhaar otp senior citizen women concession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
1

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
2

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
3

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.