पंढरीच्या वारीत एसटी झाली 'मालामाल'; महामंडळाला मिळाले तब्बल 'इतक्या' कोटींचे उत्पन्न
मुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या 7 तारखेला यापूर्वी वेतन दिले जात होते. मात्र, आता ही वेतनाची परंपरा गेल्या अनेक महिन्यांपासून खंडित झाली आहे. राज्य सरकारने जुलै महिन्यात 7 तारखेपर्यंत विविध सवलतीपोटी द्यावयाची तब्बल 404 कोटी रुपये प्रतिपूर्ती रक्कम अजूनही दिलेली नाही. यामुळे एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेतन उशिरा मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरत आहे. विशेष म्हणजे 3 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्व कामगार संघटनांच्या बैठकीमध्ये पुढील महिन्यापासून वेतन रखडणार नाही. तसेच महागाई भत्ता 47 टक्क्यांवरून 53 टक्के करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. परंतु, ती घोषणा देखील हवेत विरली आहे. गृहकर्ज, व्यक्तिगत कर्जाचे हप्ते वेळेत न भरल्यास संबंधित बँका कर्मचाऱ्यांना व्याज लावतात. त्यामुळे हजारो रुपयांचा दंड विनाकारण कर्मचाऱ्यांना भरावा लागतो.
तसेच विम्याचे हप्ते वेळेत न गेल्यास त्याबाबत देखील विचारणा होते. वारंवार अशा प्रकारे वेतन वेळेत न होण्याने कर्मचाऱ्यांना विनाकारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळेत वेतन मिळावे, अशी सर्वच कामगारांची मागणी आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना देखील अर्थखात्याने थकीत रकमेची अशाप्रकारे दिरंगाई केल्यामुळे ८३ हजार एसटी कर्मचारी आपल्या वेतनासाठी हवालदिल झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष
महामंडळाने गेले कित्येक महिने थकलेली विविध सवलती पोटीची प्रतिकृती रक्कम म्हणून ९२१ कोटी रुपयांची मागणी अर्थ खात्याकडे केली आहे. त्यात मागील महिन्याच्या ४०४ कोटी रुपये रकमेचा देखील समावेश आहे. प्रतिपूर्ती रकमेचा सरकारचा निर्णय मंगळवारी आला तरी दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचा वेतन होऊ शकते. परंतु दर महिन्याला हक्काच्या वेतनासाठी वाट पहावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे.
यापूर्वी झाली होती महत्त्वाची घोषणा
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून, वेतन देण्याइतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही. त्यातच एसटी बँकेला ४० कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्याने एसटी प्रशासन बुचकळ्यात पडले असून या महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी यापूर्वीच दिली होती.