Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

BARC चा अत्याधुनिक ‘Isomed 2.0’ प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे वैद्यकीय आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. Isomed 2.0’मुळे वैद्यकीय उपकरणे आणि बियाणे अधिक सुरक्षित होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2026 | 03:02 PM
भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • वैद्यकीय आणि कृषी क्षेत्राला नवे बळ! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे भारताची मोठी झेप
  • BARC चा अत्याधुनिक ‘Isomed 2.0’ प्रकल्प सुरू; वैद्यकीय आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा
  • भारताची वैज्ञानिक झेप! ‘Isomed 2.0’मुळे वैद्यकीय उपकरणे आणि बियाणे होणार अधिक सुरक्षित
मुंबई: मानवी कल्याणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना ‘आयसोमेड’ प्रकल्पामुळे नवे बळ मिळाले असून, १९७४ मध्ये तुर्भे येथे सुरू झालेल्या या सुविधेचे आधुनिकीकरण करून उभारण्यात आलेल्या ‘आयसोमेड २.०’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे. एप्रिल २०२५ पासून या केंद्राचे व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरू झाले असून वैद्यकीय उपकरणे, कृषी उत्पादने आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

भाभा अणुसंशोधन केंद्राशी संलग्न असलेल्या बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी (ब्रिट) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे रुग्णालयांमधील संसर्ग कमी करण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात अन्नप्रक्रिया आणि बियाण्यांच्या संरक्षणासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. भारतीय बनावटीच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया उपलब्ध झाल्याने निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) माध्यम प्रतिनिधींना या केंद्राची भेट घडवून दिली.  (फोटो सौजन्य – AI Created) 

निर्जंतुकीकरणासाठी प्रभावी पद्धत

वैद्यकीय उत्पादने, शस्त्रक्रियेची साधने, सिरिज आणि इतर उपकरणे सूक्ष्मजीवमुक्त करण्यासाठी ‘गामा रेडिएशन’ ही पद्धत जागतिक स्तरावर अत्यंत प्रभावी मानली जाते. ‘आयसीमेड २.०’मध्ये ‘कोबाल्ट ६०’ या रेडिओआइसोटोपचा वापर करून उत्पादनांना किमान २५ किली-ग्रे इतका किरणोत्सर्गाचा डोस दिला जातो. ही प्रक्रिया अत्यंत अचूक पद्धतीने केली जात असल्याने निर्जंतुकीकरणाचा दर्जा उच्च पातळीवर राखला जातो.

भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा त्याचाच भाग असलेल्या ब्रिटसारख्या संस्था राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या संस्था स्वतः हून प्रसारमाध्यमांपुढे येत नाहीत. मात्र येथे होत असलेले देशाच्या प्रगतीसाठी होणारे संशोधन सर्वसामान्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अशा संस्थांच्या भेटी पीआयबीमार्फत आयोजित केल्या जातात.” – जयदेवी पुजारी, उपसंचालिका, पीआयबी

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

अत्याधुनिक नियंत्रण

या केंद्रात अद्ययावत ‘स्काडा’ आधारित नियंत्रण प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे रेडिएशन स्रोताचे नियंत्रण आणि उत्पादनांची हालचाल अधिक सुरक्षित पद्धतीने करता येते, तसेच इंटरलॉक्स आणि आपत्कालीन स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास कर्मचा-यांचे रेडिएशनपासून संरक्षण होते. या सुविधेला ‘करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रेक्टिस’ आणि ‘आयएसओ १११३७ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळाली आहेत. १९७४ मध्ये केवळ १२ उत्पादकांपासून सुरू झालेला हा प्रवास २०१८ पर्यंत १६०० हून अधिक उत्पादकांपर्यंत पोहोचला आहे. ‘आयसोमेड २.० ‘मुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनाचे मूळ स्वरूप किवा पॅकेजिंग न बदलता त्यांना सूक्ष्मजीवमुक्त करता येते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: India takes a major leap in nuclear technology isomed 20 project makes sterilization process faster and more efficient

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका
1

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

LPG टंचाईच्या काळात सिलेंडरबाबत सरकारचे ‘हे’ 7 नियम जाणून घ्या, कधीही कापलं नाही जाणार तुमचं कनेक्शन
2

LPG टंचाईच्या काळात सिलेंडरबाबत सरकारचे ‘हे’ 7 नियम जाणून घ्या, कधीही कापलं नाही जाणार तुमचं कनेक्शन

नवीन कार घ्यायची गरज नाही, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो केलात तर जुनी कार पण देईल चांगलं मायलेज
3

नवीन कार घ्यायची गरज नाही, ‘या’ सोप्या टिप्स फॉलो केलात तर जुनी कार पण देईल चांगलं मायलेज

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?
4

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.