Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक भरतीत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय नाही; शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Pavitra Portal Teacher Recruitment Maharashtra : पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याचे दावे शालेय शिक्षण विभागाने फेटाळले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 18, 2026 | 08:45 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • शिक्षक भरतीत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय नाही
  • शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण
  • रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्याची तरतूद
मुंबई: पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याच्या काही प्रसारमाध्यमांमधून व्यक्त करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबत शालेय शिक्षण विभागाने सविस्तर खुलासा केला असून, शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया अद्ययावत बिंदुनामावली, आरक्षण नियम व शासनाच्या विद्यमान तरतुदींनुसारच राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात; ‘जे. डी.’ त रंगल्या चुरशीच्या लढती

शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदुनामावली अनिवार्य असून संबंधित व्यवस्थापन स्तरावर ती ठेवली जाते. आरक्षण धोरणात किंवा पदसंख्येत बदल झाल्यास नवीन भरतीपूर्वी मागासवर्ग कक्षाकडून बिंदुनामावलीची तपासणी करूनच भरती प्रक्रिया राबविली जाते. मंजूर पदे, कार्यरत शिक्षकांची संख्या आणि रिक्त पदे यांचा विचार करूनच जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे जाहिरातीत दिसणाऱ्या पदांची संख्या ही केवळ आरक्षणाच्या टक्केवारीवर आधारित नसून संबंधित व्यवस्थापनातील मंजूर, कार्यरत व रिक्त पदांच्या स्थितीवर अवलंबून असते.

शासन निर्णय दिनांक २१ जून २०२३ नुसार रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्याची तरतूद असून त्याच मर्यादेत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस तसेच खुल्या प्रवर्गातील पदांचा समावेश असून कोणत्याही प्रवर्गावर अन्याय झालेला नसल्याचे विभागाने नमूद केले आहे. सर्व प्रवर्गांसाठी जाहिराती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील पदांसाठीही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील कार्यरत शिक्षकांची संख्या कमी असल्याने त्या प्रवर्गाचा अनुशेष दिसून येतो. त्यामुळे 7 टक्के आरक्षण असतानाही जाहिरातींमध्ये एसटी प्रवर्गासाठी १०.७२ टक्के पदे उपलब्ध झालेली आहेत. पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबतही शासन निर्णयानुसार स्वतंत्र बिंदुनामावली निश्चित करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रात आरक्षित व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी ५० टक्के तरतूद असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील पदांची संख्या तुलनेने अधिक दिसून येत असल्याचे विभागाने कळविले आहे.

एनटी-सी प्रवर्गाबाबत प्रसिद्ध झालेल्या काही आकडेवारीत विसंगती असल्याचेही विभागाने निदर्शनास आणून दिले आहे. एनटी-सी प्रवर्गाचे ११ हजारांहून अधिक उमेदवार असून केवळ १०० जागा जाहिरातीत आल्याचा दावा चुकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात या प्रवर्गातील ७ हजार ५४६ उमेदवार असून ५०५ पदांच्या जाहिराती प्राप्त झाल्या असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

विमुक्त जाती-अ, भटक्या जमाती-ब, क आणि ड या प्रवर्गांसाठी स्वतंत्र आरक्षण असले तरी त्यांचे एकत्रित आरक्षण ११ टक्के आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या आणि एकूण आरक्षण मर्यादा विचारात घेऊन पदांची गणना केली जात असल्याने काही उपप्रवर्गांमध्ये जाहिरातींचे प्रमाण तुलनेने कमी दिसू शकते, असेही विभागाने नमूद केले आहे. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती संबंधित व्यवस्थापनांकडून प्राप्त झालेल्या असून, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बिंदुनामावलीनुसार रिक्त पदांची मागणी असल्याची खातरजमा केल्यानंतरच जाहिरातींना मान्यता दिली आहे. त्यामुळे जाहिरातीत नमूद करण्यात आलेली पदसंख्या योग्य असून शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही मागासवर्गीय प्रवर्गावर अन्याय झालेला नसल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

Web Title: Maharashtra teacher recruitment pavitra portal reservation 80 percent vacancies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Caste Reservation
  • Maharashtra Teachers Recruitment
  • Teacher Exam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.