Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तृतीयपंथी समाजाच्या हक्क व कल्याणासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन

Transgender Rights Welfare Maharashtra: मुंबई विभागीय तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळाने तृतीयपंथीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 07, 2026 | 09:22 PM
Transgender Rights Welfare Maharashtra:

Transgender Rights Welfare Maharashtra:

Follow Us
Follow Us:
  • तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी राज्यभर जनजागृती मोहीम
  • सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणावर भर
  • संवैधानिक व कायदेशीर अधिकारांची नागरिकांना माहिती देणार
मुंबई : तृतीयपंथीयांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्याबाबत समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे आवाहन विभागीय तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ मुंबई यांनी केले आहे. यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींना उपलब्ध असलेले संवैधानिक व कायदेशीर अधिकार, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच उपलब्ध सुविधा यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर या मोहिमेत विशेष भर देण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

या जनजागृती मोहिमेमध्ये तृतीयपंथी व्यक्तींना प्राप्त होणारे अधिकार, वित्तीय वर्ष २०२६ मधील अर्थसंकल्पीय तरतुदी व त्याअंतर्गत उपलब्ध सुविधा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या तृतीयपंथीयांच्या विविध धोरणांची व योजनांची माहिती देण्यात यावी. यामध्ये बीज भांडवल योजना (स्वयंरोजगार व उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य), विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण व शैक्षणिक सहाय्य, रोजगारातील आरक्षण व समान संधीबाबत शासनाची धोरणे, आरोग्य सेवा, लिंग-पुष्टीकरण आरोग्यसेवा, मानसिक आरोग्य सेवा व आरोग्य विमा सुविधा यांचा समावेश करण्यात यावा. तसेच निवास (गृहनिर्माण) सुविधा, पुनर्वसन योजना, सामाजिक सुरक्षा योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, आर्थिक समावेशन, कायदेशीर मदत, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना याबाबतची माहितीही व्यापक स्वरूपात प्रसारित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तृतीयपंथी व्यक्तींविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी शासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य कर्मचारी, पोलीस विभाग, खासगी क्षेत्रातील नियोजक तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी संवेदनशीलता निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करण्यावरही भर देण्यात आला आहे. तृतीयपंथी व्यक्तींचे संवैधानिक व कायदेशीर अधिकार, समानता, सन्मान आणि भेदभावमुक्त जीवन याबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.

दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांतून जनजागृती

मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये जनजागृतीपर साहित्य तयार करून दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे, सामाजिक माध्यमे, शासनाचे संकेतस्थळ, डिजिटल माध्यमे, माहितीपट, परिसंवाद, कार्यशाळा तसेच रस्त्यावरची नाटके (स्ट्रीट प्ले) आदी विविध माध्यमांतून राज्यभर प्रसारित करण्याचे आवाहन (विभागीय तृतीयपंथी व्यक्ती हक्काचे संरक्षण व कल्याण मंडळ) यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे तृतीयपंथी यांच्याविषयी समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास, भेदभाव कमी होण्यास तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.

Child Health : कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्

Web Title: Maharashtra transgender rights welfare awareness campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • Maharashtra Goverment
  • right
  • Transgender

संबंधित बातम्या

Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय! आता कंत्राटदारांऐवजी तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा
1

Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय! आता कंत्राटदारांऐवजी तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा
2

Satara News : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर; साताऱ्यात मूक मोर्चा, मुंबईत आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.