Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाच्या चटक्यासोबतच ‘गारपिटी’चे संकट! राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात हाहाकार माजवणार

महाराष्ट्रात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. वाचा सविस्तर हवामान अंदाज.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 18, 2026 | 06:52 PM
उन्हाच्या चटक्यासोबतच 'गारपिटी'चे संकट! (Photo Credit- X)

उन्हाच्या चटक्यासोबतच 'गारपिटी'चे संकट! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • उन्हाच्या चटक्यासोबतच ‘गारपिटी’चे संकट!
  • राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा इशारा
  • शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा ‘अलर्ट’
Maharashtra Weather Alert: कडाक्याच्या उन्हाचा चटका सोसणाऱ्या राज्यातील जनतेसाठी हवामान खात्याने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. येत्या २० ते २२ एप्रिल दरम्यान राज्याच्या विविध भागांत हवामानात मोठे बदल होणार असून, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ भागात कोसळणार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथा आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. १९ एप्रिलला दुपारनंतर घाट क्षेत्र आणि उत्तर खानदेशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते. २० आणि २१ एप्रिलला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील अमरावती परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. २२ एप्रिलला पावसाचा जोर हळूहळू ओसरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 18, 2026

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा ‘अलर्ट’

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:

१. पीक संरक्षण: काढणी केलेली पिके सुरक्षित जागी किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत.

२. कामाचे नियोजन: शेतीची कामे हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजित करावीत.

३. विजेपासून संरक्षण: वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेणे टाळावे.

दुपारनंतर बदलणार हवामान

राज्यात सध्या तापमानाचा पारा वाढलेला असताना, दुपारनंतर अचानक आभाळ दाटून येण्याचे प्रमाण वाढणार आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हे बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या वादळी पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी शेती पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’; खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Web Title: Maharashtra weather forecast rain and hailstorm alert 20 to 22 april

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • maharashtra weather alert
  • rain

संबंधित बातम्या

Nashik News: त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा
1

Nashik News: त्र्यंबकरोडचे दळणवळण की नरकयातना? आयटीआय सिग्नलवर किलोमीटरभर रांगा, तासनतास कोंडी अन् वाहतुकीचा बोजवारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.