Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahavikas Aghadi News: EVM विरोधातील लढाई तीव्र होणार; महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची दिल्लीतील संभाव्य युती आणि I.N.D.I.A आघाडीची कमान ममता बॅनर्जींकडे सोपवणे या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 11, 2024 | 09:55 AM
EVM विरोधातील लढाईसाठी महाविकास आघाडी न्यायालयात याचिका दाखल करणार

EVM विरोधातील लढाईसाठी महाविकास आघाडी न्यायालयात याचिका दाखल करणार

Follow Us
Close
Follow Us:

 मुंबई:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम डेटा हटवणे आणि मतदार यादीतील अनियमितता या आरोपांवरून विरोधी आघाडी I.N.D.I.A ने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी शरद पवार यांच्या घरी ही बैठक झाली. आघाडीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे शरद पवाव गटाचे  नेते प्रशांत जगताप यांनी मंगळवारी दिली.

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत जगताप म्हणाले की, ईव्हीएममधील कथित गैरप्रकार आणि मतदार यादीतील अनियमिततेच्या मुद्द्यांवर शुक्रवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा केली जाईल. या मुद्द्यांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, त्याबाबत युती पूर्ण गांभीर्याने याचा पाठपुरावा करणार आहे.

Todays Gold Price: सोन्या चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या, तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

ईव्हीएममधील बिघाडावर चर्चा

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची दिल्लीतील संभाव्य युती आणि I.N.D.I.A आघाडीची कमान ममता बॅनर्जींकडे सोपवणे या मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक केवळ ईव्हीएममधील त्रुटी आणि निवडणुकीतील गैरप्रकारांपुरती मर्यादित असल्याचे प्रशांत जगताप यांनी आवर्जून सांगितले. तसेच,  विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने हा मुद्दा उपस्थित करतील असेही ते म्हणाले.

निकालानंतर ईव्हीएमबाबत शंका

दरम्यान,  महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये अनियमितता आणि मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप केला होता. आता या आरोपांबाबत महाविकास आघाडीने न्यायालयात जाण्याचा निर्णय आहे. न्यायालयाकडून निष्पक्ष तपासाचे आदेश मिळतील आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल, अशी विरोधकांना आशा आहे.

जगातील सर्वात मोठा YouTuber घेऊन येत आहे नवीन रिॲलिटी शो, 14 मिलियन डॉलर्सचा खर्च,

निवडणुकीत कोणतीही अनियमितता नाही-महाराष्ट्र निवडणूक आयोग

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणी दरम्यान, 23 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व 288 विधानसभा मतदारसंघात 1440 VVPAT स्लिपची अनिवार्य मोजणी पूर्ण झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व 288 मतदारसंघात एकूण 1440 मतदान झाले. 23.11.2024 रोजी पूर्णा, EVM मधील मतदार स्लिप्स आणि VVPAT मशीनमधील स्लिप्सच्या संख्येत कोणताही फरक आढळला नाही. असे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.  तसेच, निवडणूक अधिकाऱ्याने पुष्टी केली की EVM मध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या संख्येत आणि VVPAT मशीनमध्ये प्रत्येक उमेदवाराविरुद्ध नोंदवलेल्या स्लिपच्या संख्येमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. या प्रक्रियेनंतर सर्वकाही योग्य असल्याचे आढळले.

Web Title: Mahavikas aghadi to file petition in court to fight against evm nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Nana patole
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
3

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.