Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, अमरावती आणि नाशिक काँग्रेसला, नागपूर शिवसेनेच्या ठाकरे गटाला, जयंत पाटील म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर महत्त्वाची माहिती दिली. “महाविकास आघाडीकडून अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर मराठवाड्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरेल. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय, तर नागपूरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी देण्यात आलीय.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 11, 2023 | 05:58 PM
विधानपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार,  अमरावती आणि नाशिक काँग्रेसला,  नागपूर शिवसेनेच्या ठाकरे गटाला, जयंत पाटील म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक (MLC election) जाहीर झालीय. यामध्ये नाशिक (Nashik), अमरावती (Amravati) या दोन पदवीधरच्या जागांचा आणि औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) आणि कोकण (Konkan) शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या जागेसाठी आग्रही होते. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत जागावाटप झाली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली.

-काँग्रेसला संधी देण्याचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बैठकीनंतर महत्त्वाची माहिती दिली. “महाविकास आघाडीकडून अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर मराठवाड्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरेल. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय, तर नागपूरची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी देण्यात आलीय. ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज भरलाय”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

-मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस
“अमरावती, नाशिक येथे काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, नागपुरात शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलाय. अमरावती आणि इतर मतदारसंघात अर्ज दाखल केले जातील. मराठवाड्याचा अर्ज औरंगाबादला दाखल करण्यात आलाय. नागपूरच्या जागेसाठी एकमताने निर्णय झालाय. शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. इतर कुणी अर्ज भरलाय त्यांच्याशी चर्चा केली जाईल. या निवडणुकीला एकमताने जाण्याचे काम केलं जाईल. आमचं सर्वांचं एकमत झालंय”, “नागपूरच्या जागेसाठी नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशी भूमिक मांडली होती. काँग्रेस त्याठिकाणी अर्ज भरणार नाही. त्या व्यतिरिक्त तिथे जे अर्ज भरणार आहेत त्यांचंही एकमत केलं जाईल”, असं जयंत पाटील म्हणाले.

-आम्ही एक पाऊल मागे आलो
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “आज बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाई, अनेक प्रश्न आहे. जागा वाटप हा प्रश्न महत्त्वाचा नाहीय. आम्ही एकमताने या सत्तेला थांबविण्यासाठी निर्णय घेतला आहे”, असं नाना पटोले म्हणाले. “हुकूमशाही विरोधात एकमताने लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही लढाई आहे. त्यासाठी आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. पाचही जागा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा प्रयत्न करु”, असं नाना पटोले म्हणाले.

Web Title: Mahavikas aghadi will contest legislative council elections together amravati and nashik to congress nagpur to shiv senas thackeray faction jayant patil said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2023 | 05:58 PM

Topics:  

  • jayant patil
  • Mahavikas Aghadi
  • Thackeray Group
  • अमरावती

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावर तराट गॅंगची दारु पार्टी; परनावगी दिलीच कशी…? शिवसेना ठाकरे गट आक्रमक
2

Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावर तराट गॅंगची दारु पार्टी; परनावगी दिलीच कशी…? शिवसेना ठाकरे गट आक्रमक

उरूण- ईश्वरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा होईल; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
3

उरूण- ईश्वरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा होईल; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.