Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महावितरण ग्राहकांना दिलासा, सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत

राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2025 | 07:44 PM
महावितरण ग्राहकांना दिलासा, सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत (फोटो सौजन्य-X)

महावितरण ग्राहकांना दिलासा, सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर लावण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 गेल इंडिया कंपनीच्या प्रस्तावित पाईपलाईन प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील जवळपास सर्वच राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला २९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्यातून चार विविध कंपन्यांना काम देण्यात आले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यातील विजेचे दर कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली नसून या मीटरमध्ये प्रत्येक युनिटचे कॅलक्युलेशन ऑटोमॅटिक होत असल्याने वीज देयकामध्ये वाढ होण्याची शंका निर्माण होण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळीवाडे आणि वन जमिनीवरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन योजना तयार करण्यात येईल आणि ती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आतापर्यंत २८ हजार २०२ वाहिन्यांवर स्मार्ट माटर बसविले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ लाख ७ हजार ५०७ पैकी १ लाख ४० हजार ५६१ रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) स्मार्ट मीटर बसविले आहेत. राज्यातील २ कोटी २४ लाख ८८ हजार ग्राहकांपैकी ३२ लाख २३ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतली आहेत. ही सर्व स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत; अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

स्मार्ट पोस्टपेड मीटर रिअल-टाइम डेटा पुरवतात. यामुळे नेमकी किती वीज वापरली याची अचूक आकडेवारी कंपनीला आणि ग्राहकाला मिळते. या आकडेवारीआधारे योग्य ते बिल ग्राहकाला आकारले जाते. चेक, थेट खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर अथवा युनिफाईड पेमेंट सर्व्हिस अर्थात यूपीआयच्या मदतीने ग्राहक बिलाचा भरणा कंपनीला करू शकतात.

“मारहाणीचे समर्थन करणार नाही…”, संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कडक शब्दांत समज

Web Title: Mahavitaran gives relief to customers 10 percent discount on electricity bill for usage during solar hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • smart meter

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.