Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

खाजगीकरणाच्या विरोधात विज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे. महावितरणने विज कर्मचाऱ्यांना कामांवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2025 | 03:43 PM
संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

संप बेकायदेशीर, कामांवर विनाविलंब रूजू व्हा; महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • वीज कर्मचारी 3 दिवस संपावर
  • महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन
  • संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट

मुंबई : मागील काही महिन्यांपासून विद्युत क्षेत्रामधील खाजगीकरण विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तीनही शासकीय विज कंपन्यांमधील अधिकारी आणि कर्मचारी संतापलेले पाहायला मिळत आहे. खाजगीकरणाच्या विरोधात अभियंता अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ८ ऑक्टोबर रोजी बुधवारी मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आता कंपन्यांमधील वीज यंत्रनेचा संपूर्ण भार हा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर येणार आहे. यावरुन महावितरणने विज कर्मचाऱ्यांना कामांवर रुजू होण्याचे आवाहन केले आहे.

वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी ७२ तासांच्या संपाला सुरवात केली आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली आहे. बैठकीत खाजगीकरण व पुनर्रचनेसह संयुक्त कृती समितीच्या इतर सर्व मुद्द्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका व्यवस्थापनाने स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे.

हा संप टाळण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यवस्थापनाने वेळोवेळी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. मात्र सर्वच मागण्यांशी पुरक असलेली स्पष्ट भूमिका जाहीर करूनही संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे, असे महावितरणने म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्र अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या संकटातून सावरत आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दिवाळी सण देखील काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमिवर संपामध्ये सहभागी झालेल्या सर्वांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या कार्यालयांमध्ये विनाविलंब रूजू व्हावे. पूर परिस्थितीच्या संकट काळात तसेच सणासुदीच्या दिवसांत तत्पर वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Web Title: Mahavitaran has appealed to electricity employees to return to work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Mahavitaran Department
  • mahavitaran strike

संबंधित बातम्या

फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, PM मोदींनी महाराष्ट्रासाठी…;  हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, PM मोदींनी महाराष्ट्रासाठी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
2

Ichalkaranji Crime : गुटखा तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या; चारचाकी वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

एफआरपीसाठी लढा तीव्र होणार, ऊस परिषदेकडे लक्ष; साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक
3

एफआरपीसाठी लढा तीव्र होणार, ऊस परिषदेकडे लक्ष; साखर कारखान्यांना हंगाम ठरणार आव्हानात्मक

मुंबई हल्ल्यातील आरोपीला काँग्रेसच्या काळात फाशी दिली, पण मोदी सरकारने…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल
4

मुंबई हल्ल्यातील आरोपीला काँग्रेसच्या काळात फाशी दिली, पण मोदी सरकारने…; काँग्रेसच्या नेत्याचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.