
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या या बैठकीत चारही महानगरपालिका मध्ये शिवसेना भाजप युतीचा निर्णय झालाय, उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होईल आणि महायुती म्हणून निवडणूक लढतील. अकोल्यात राष्ट्रवादी सोबत येऊ शकते, अशी शक्यता आहे. अमरावतीत रवी राणा यांचा स्वाभिमानी पक्ष आमच्या सोबत येणार आहे, आणि चंद्रपूरमध्येही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती होण्याची चिन्हे आहेत. मला असं वाटतं की, चारही ठिकाणी महायुतीचा जवळपास निर्णय होईल. नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचा विचार झालाय पण राष्ट्रवादीशी अजून चर्चा झालेली नाही.
पुण्यात आघाडीत बिघाडी? वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक काॅंग्रेसच्या नेत्यांची कोंडी
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेचे नियोजन सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी माजी मंत्री हंसराज अहिर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.निवडणुकीचे प्रभारी म्हणून अशोक नेते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, तर निवडणूक प्रमुख म्हणून किशोर जोरगेवार काम पाहणार आहेत. याशिवाय, निवडणुकीच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी चैनसुख संचेती यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, संघटनात्मक पातळीवर शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध निवडणूक राबवली जाईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही सातही लोक या ठिकाणी बसून होतो, आम्ही एकेक ठिकाणी कॅंडिडेट निवड केलेला आहे आणि दोघांचेही सहमत झालेला आहे, चंद्रपूर मध्ये समन्वयाने जागावाटप झालेला आहे उद्या किंवा परवा पर्यंत यादी जाहीर होईल.
काही मुद्द्यांवर चर्चा झाल्या, शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाली, तीन तास चंद्रपूरचे बैठक झाली त्यात काही खमंग चर्चा झाली पण काही अशा वाकड्यातिकड्या चर्चा झाल्या नाही, मला असं वाटते यातून मार्ग निघेल. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात निवडणूक होणार असल्याचे त्यांनी मान्य केले. हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात किशोर जोरगेवार तिथले अध्यक्ष होते, आणि चंद्रपूर मध्ये आता चांगला विजय होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Maharashtra Politics: पैसा है कैसा…नही कोई ऐसा! धनाढ्यांकडून निवडणूक हायजॅक; सामन्यांसाठी ‘घास’च
सुधीर मुनगंटीवार यांच्या मागे केंद्रीय भाजपा, राज्य, भाजपा, नितीन गडकरी, मुख्यमंत्री उभे आहेत, ते स्वतः नेते आहेत त्यांनी स्वतःला कमजोर समजण्याचे कारण नाही, सुधीर भाऊंचा नेतृत्व आहे, असंही त्यांनी सांगितलं. सुधीर भाऊंच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्ष काम केलेला आहे त्यामुळे त्यांना कोण डावलणार, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.
भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे सर्वांना बोलण्याचा, सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. काही ठिकाणी एक मत झाले आणि सत्तावीस तारखेपर्यंत जे पार्टी काय ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, हे सर्वांनी मान्य केलं. शेवटी प्रत्येक निवडणूक वेगळी असते. महानगरपालिकेत चांगल्या पद्धतीने यश मिळेल, प्रत्येक निवडणुकीचे विश्लेषण वेगळे असते, कॅंडिडेट वेगळे असतात. अजेंडा वेगळा असतो. या निवडणुकीचा अजेंडा वेगळा आहे. चंद्रपूर मध्ये भाजपचा महापौर बसावा तिथे भाजपचे सरकार यावं, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि जनता ही आमच्या सोबत आहे, असंही बावनकुळेंनी नमुद केलं.