
CM Relief Fund : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रीजन्सी ग्रुपचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीत ५० लाखांची मदत
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी रीजन्सी ग्रुपचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) महेश अग्रवाल यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत (CM Relief Fund) ५० लाख रुपयांचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात रीजन्सी ग्रुपच्या वतीने महेश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसमोर या परिस्थितीत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून रीजन्सी ग्रुपने हा आर्थिक हातभार लावला आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महेश अग्रवाल यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी आणि उद्योगसमूहांनी नैसर्गिक आपत्ती तसेच संकटाच्या काळात पुढाकार घेऊन मदत केल्यास गरजू घटकांना मोठा आधार मिळतो. रीजन्सी ग्रुपने दिलेले हे योगदान शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.
Sugarcane Workers: उसाच्या शेतांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी अन्…; राज्यमंत्र्यांचे निर्देश काय?
विशेष म्हणजे, महेश अग्रवाल यांनी सामाजिक बांधिलकी जपत यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या विविध भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीमुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले होते. पूरग्रस्तांना मदत मिळावी, या उद्देशाने त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपयांचे आर्थिक योगदान दिले होते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी ५० लाख रुपयांचा निधी दिल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात UCC नव्हे, हिंदू सिव्हिल कोड लागू करण्याचा डाव; ओवैसींचा फडणवीस सरकारवर आरोप
महेश अग्रवाल हे विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असतात. समाजातील गरजू घटकांना मदत करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे, अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. केवळ व्यावसायिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी आणि पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी कुटुंबांना बसतो. अशा वेळी सामाजिक संस्था आणि उद्योगसमूहांकडून मिळणारे आर्थिक सहकार्य महत्त्वाचे ठरते. रीजन्सी ग्रुपने मुख्यमंत्री सहायता निधीत दिलेल्या ५० लाख रुपयांच्या योगदानातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
Ans: महेश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ५० लाख रुपयांचे योगदान दिले.
Ans: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे.
Ans: गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित नागरिकांसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत २५ लाख रुपयांचे योगदान दिले होते.