Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर येणार? केंद्रीय पथक बारामतीत

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या या पथकाने विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची माहिती घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2026 | 11:33 AM
अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी माहिती समोर येणार? केंद्रीय पथक बारामतीत
Follow Us
Follow Us:

बारामती : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत मोठा अपघात झाला होता. या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. इतकेच नाहीतर हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यासाठीच बारामतीत विमानतळाची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या टीमने पाहणी केली.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या या पथकाने विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणेची माहिती घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, या तपासणीची कोणतीही संबंधित माहिती माध्यमांना अधिकृत उपलब्ध झालेली नाही. अजित पवार यांचे बारामती विमानतळावर विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेला १४ दिवस उलटले आहेत. त्यातच आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त करत वरिष्ठ पातळीवर चौकशीची मागणी केली आहे. त्यानंतर या अपघाताच्या तपासाला वेग आल्याचे चित्र होते. दरम्यान, डीजीसीएने केलेल्या पाहणीबाबत अधिकृत अहवाल आल्यानंतर माहिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत शंका उपस्थित होत आहेत. या सर्व शंका, संशयांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातग्रस्त विमानाची तपासणी झाली होती का, त्याची दुरुस्ती कोणत्या कर्मचाऱ्यांनी केली होती, असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केली होती. आता ही मागणी मान्य होताना दिसत आहे.

दोन दिवस आधी विमान होते कुठं?

अजित पवार २८ जानेवारीला ज्या विमानातून आले, त्याच्या दोन दिवस आधी ते विमान कुठे कुठे प्रवास करून आले, त्याची माहिती घेतली. जे विमान अपघातग्रस्त झाले. ते विमान दोन दिवसांपूर्वी सुरतचा प्रवास केला होता. त्या विमान कंपनीचा मालकाने सांगितले की, विमान सुस्थितीत आणि वेळोवेळी दुरुस्ती केली जात असल्याचे सांगितले होते. पण विमान अपघाताच्या वेळी बारामतीतील प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, रोजच्या प्रमाणे विमानाचा आवाज वेगळाच आला होता. म्हणजेच विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता होती.

हेदेखील वाचा : Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

Web Title: Major information may come to light in ajit pawars plane crash case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.