Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवाब मलिक यांचं ठरलं! राष्ट्रवादीचा ‘हा’ गट निवडणार ; सूत्रांची महत्त्वाची माहिती

नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांचं वजन 25 ते 30 किलोने घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यात सांगितलं आहे असं त्यांचे बंधू कप्तान मलिक म्हणाले. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 या दिवशी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती.

  • By Aparna
Updated On: Aug 15, 2023 | 04:24 PM
नवाब मलिक यांचं ठरलं! राष्ट्रवादीचा ‘हा’ गट निवडणार ;  सूत्रांची महत्त्वाची माहिती
Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांची काल तुरुंगातून सुटका झाली. मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलया कडून जामीन मंजूर झालाय. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन देण्यात आला आहे. नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यापासून ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? हा प्रश्न विचारला जातोय. आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांचा समावेश होता.

नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार ते ठरलं?

नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. एक आठवड्यानंतर ते भूमिका जाहीर करतील. सध्या राष्ट्रवादीचा दोन्हीं गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठीं भेटीगाठी सुरु आहेत. राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी, नवाब मलिक यांचा कोणताही निर्णय झालेला नाही. नवाब मलिक राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांना पाठिंबा देणार आहेत. एका मराठी वृत्त वाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

नवाब मलिक यांना का अटक झालेली?

नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांचं वजन 25 ते 30 किलोने घटलेलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी प्रकृतीची काळजी घेण्यात सांगितलं आहे असं त्यांचे बंधू कप्तान मलिक म्हणाले. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 या दिवशी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती.तब्बल दीड वर्षांनंतर नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणामुळे दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारांसाठी जामीनाची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. ती मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.

प्रफुल्ल पटेल नवाब मलिक यांची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले?

“राजकीय विषयावर चर्चा केलेली नाही. 25-30 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. माणुसकी म्हणून, मित्र म्हणून त्यांना भेटायला आलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. राजकीय भेट नव्हती. दुसरा कुठलाही अर्थ काढू नका.त्यांची प्रकृती सुधारल्याशिवाय दुसरे कुठलेही काम त्यांनी करू नये, असंच आमचं म्हणणं आहे” असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.

Web Title: Malik decided this group of ncp will be chosen important sources nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2023 | 04:24 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • nawab malik
  • Sharad Pawar Group

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.