Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधवांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Annabhau Sathe Jayanti 2026: मल्लारपेठ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त मातंग समाज बांधव आणि पंचशील मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 09:00 PM
मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधवांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
Follow Us
Follow Us:
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०७ व्या जयंती
  • मातंग समाज बांधवांकडून अभिवादन
  • विचारांचे स्मरण ठेवून समाजहिताची वाटचाल करण्याचे आवाहन
मल्लारपेठ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधव तसेच पंचशील मित्र मंडळ, ठोंमसे यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत समाजाने शिक्षण, संघटन आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

वर्धापन दिनानिमित्त सातारा पालिकेचा हरित शहराचा संदेश, साताऱ्यातून भव्य रॅली शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र लोंढे यांनी मार्गदर्शन करताना समाज बांधवांनी संस्कारक्षम शिक्षणाला प्राधान्य देऊन संघटितपणे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून वंचित समाजाला नवी दिशा दिली असून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी कार्यकर्ते दयानंद शिलवंत यांनी महापुरुषांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजहिताची वाटचाल करण्याचे आवाहन केले. महापुरुषांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.मल्हारपेठ भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष चंद्रकांत भिसे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचा इतिहास सांगितला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जेपी भिसे, पाटण दूध संघाचे संचालक विकास शीलवंत, मानसिंग शीलवंत, काशिनाथ नागरे बाळासो शीलवंत बबन शीलवंत मिलिंद शीलवंत हरिभाऊ डोंगळे, माया शीलवंत चंद्रभागा शीलवंत भारती शीलवंत सुनील शीलवंत या मान्यवर व समाजबांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मातंग समाजातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते,ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Wardha News : जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचे आवाहन ; कर्जमुक्ती योजनेचा मिळणार लाभ, शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करावे

Web Title: Mallarpeth annabhau sathe 107th jayanti matang samaj tribute program

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • BJP
  • Jayanti

संबंधित बातम्या

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा
1

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा

ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! खान्देश भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
2

ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! खान्देश भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ लांबणीवर! मॉन्सून सत्रात बिल नाही; मोदी सरकारची नवी रणनीती काय?
3

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ लांबणीवर! मॉन्सून सत्रात बिल नाही; मोदी सरकारची नवी रणनीती काय?

‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी
4

‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाहच जबाबदार’, मल्लिकार्जुन खरगेंचा थेट हल्लाबोल, गृहमंत्र्यांविरोधात केली ‘ही’ तात्काळ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.