Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या भांडणाचा मनात होता राग,भररस्त्यात तरुणाची चाकूने भोसकून हत्या – कल्याणमधला धक्कादायक प्रकार

आरोपी जयेश डोईफोडे हा सराईत गुन्हेगार आहे. अमोल आणि जयेशमध्ये आधीपासून वाद होते. चार दिवसांपूर्वी अमोल लोखंडे याने आरोपीच्या एका मित्राला परिसरात दहशत का माजवता असं विचारलं. यामुळे आरोपी चिडला होता.

  • By साधना
Updated On: Jun 12, 2023 | 04:02 PM
जुन्या भांडणाचा मनात होता राग,भररस्त्यात तरुणाची चाकूने भोसकून हत्या – कल्याणमधला धक्कादायक प्रकार
Follow Us
Follow Us:

कल्याण : जुन्या भांडणाच्या रागातून चाकूने वार करून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना कल्याणमध्ये (Kalyan News) घडली आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एकाने तरुणाची हत्या (Kalyan Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे.अमोल लोखंडे असं मृत तरुणाचं नाव आहे. जयेश डोईफोडे असं आरोपीचं नाव आहे.(Kalyan Crime News)

कल्याण पुर्वेतील ईश्वरी क्लासेसजवळ नवीन दुर्गा माता मंदिर रोड काटेमानिवली येथे सोमवारी रात्री 11.00वाजण्याच्या सुमारास  अमोल लोखंडेवर पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी टक्या उर्फ जयेश डोईफोडे याने चाकूने वार केला. जयेशने अमोलच्या पोटावर, छातीवर, हाताच्या दंडावर अनेक वार केल्याने अमोल लोखंडेचा (वय 39 वर्षे) जागीच मृत्यू झाला. जयेश डोईफोडे यांच्यावर फिर्यादी ममता गर्भे यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलिसांनी भा.दं.वि. 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी जयेश डोईफोडे याला अटक करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे पो.नि. एस. जी.गवळी याप्रकरणी तपास करीत आहेत.

कसला होता राग?
आरोपी जयेश डोईफोडे हा सराईत गुन्हेगार आहे. अमोल आणि जयेशमध्ये आधीपासून वाद होते. चार दिवसांपूर्वी अमोल लोखंडे याने आरोपीच्या एका मित्राला परिसरात दहशत का माजवता असं विचारलं. यामुळे आरोपी चिडला होता. आरोपीने याच गोष्टीचा राग मनात धरुन तरुणाचा काटा काढला. अमोल काल रात्री परिसरात उभा असताना आरोपींनी मागून येऊन त्याच्यावर हल्ला केला.

हत्या करून स्वत:ला मारहाण झाल्याचा रचला बनाव
अमोलची हत्या केल्यानंतर आरोपी जयेश डोईफोडे हा स्वतः कल्याण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्याला मारहाण झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्याला मेमो देऊन रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. काही वेळाने पोलिसांना हत्येची माहिती मिळाली. तसेच जयेशने ही हत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Man killed by knife in kalyan due to old dispute nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2023 | 03:57 PM

Topics:  

  • crime news
  • kalyan crime news
  • kalyan news

संबंधित बातम्या

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
1

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.