Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manchar News: लव्ह मॅरेज झालयं का….? भर सभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला सवाल

अजित पवारांनी प्रदीप कंद यांची ओळख खास पद्धतीने करून देण्यास सांगितले. “पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष,” अशी ओळख करुन द्यावी, असा चिमटा त्यांनी हसतखेळत काढला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 28, 2025 | 03:09 PM
Manchar News: लव्ह मॅरेज झालयं का….? भर सभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला सवाल
Follow Us
Close
Follow Us:
  • मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची संयुक्त सभा
  • अजित पवार पुन्हा एकदा वादग्रस्त प्रश्नामुळे चर्चेत
  • एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्ष टीका
Manchar News: पुण्यातील मंचर येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती केली असून त्यांचा थेट सामना शिंदे गटाच्या शिवसेनेशी होणार आहे. यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, सतत आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे अजित पवार (Ajit pawar)  पुन्हा एकदा वादग्रस्त प्रश्नामुळे चर्चेत आले आहेत. सभेत बोलताना त्यांनी मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना थेट, “तुमचं लव्ह मॅरेज झालंय का?” असा प्रश्न विचारला. सासर आणि माहेर एकाच गावात असल्याने हा प्रश्न विचारल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा रंगली असून विरोधकांनीही यावर टीकेची झोड उठवली आहे.

राजापूरकरांच्या नागरिकांच्या समस्या जैसे थे! लोकप्रतिनिधी ‘हे’ शिवधनुष्य कसे पेलणार? निवडणुकीत होणार फैसला

Ajit Pawar: नेमकं काय म्हणाले अजित पवार?

मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मोनिका बाणखेले यांना दिली आहे. मोनिका बाणखेले पुर्वच्या मोनिका बेंड या उमेदवार फारदेशीर आहेत. मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण इथेच आहे. बरोबर आहे ना? मग लव्ह मॅरेज आहे का काय? असा मिश्लिक सवाल विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. सासर आमि माहेर जवळ असलं की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नका, असी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान त्याचवेळी मंचरमधील निवडणूकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांना विनोदी शैलीत चिमटा काढला. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाषण संपवताना ‘आता उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतील’ अशी घोषणा केली. मात्र अजित पवार यांनी लगेचच कंद यांना आधी बोलण्याची संधी देण्याची विनंती केली.

यावेळी अजित पवारांनी प्रदीप कंद यांची ओळख खास पद्धतीने करून देण्यास सांगितले. “पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आणि सध्या भाजपचे (BJP)  जिल्हाध्यक्ष,” अशी ओळख करुन द्यावी, असा चिमटा त्यांनी हसतखेळत काढला. दिलीप वळसे पाटील यांनीही त्याच सुरात ही ओळख करून दिल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्स्फूर्त हास्याची लहर पसरली. निवडणूक वातावरणात झालेला हा हलकाफुलका प्रसंग आता स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Maharashtra Government Holiday : २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचर येथील सभेत आपल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत अप्रत्यक्ष टीका केली. मंचरचा विकास कोण करू शकतो, असा सवाल उपस्थित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची नावे घेतली. मात्र, महायुती सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी मुद्दामहून टाळल्याचे स्पष्ट दिसले. मंचर नगरपंचायतीत शिंदे गटाच्या शिवसेनेशी थेट सामना असल्यामुळे अजित पवारांनी नामोल्लेख टाळतच शिंदेंवर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

 

Web Title: Manchar news did you have a love marriage ajit pawar asked a female candidate in a public meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राज्यात महायुतीला मोठा धक्का; कोकणातील ‘या’ भागात दिसून आले नवे समीकरण
1

Maharashtra Politics: राज्यात महायुतीला मोठा धक्का; कोकणातील ‘या’ भागात दिसून आले नवे समीकरण

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार
2

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार

Maharashtra Politics : उत्तर सोलापूरमध्ये अजित पवारांनी दाखवली ताकद; साठे पिता-पुत्रांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश
3

Maharashtra Politics : उत्तर सोलापूरमध्ये अजित पवारांनी दाखवली ताकद; साठे पिता-पुत्रांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”
4

अजित पवारांच्या तिजोरीच्या किल्लीचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, हा दृष्टीकोन..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.