Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम गीता’वरून भाजप युवा मोर्चा आक्रमक; ‘या’ आमदारांच्या मतदारसंघात होणार समुहगायन

वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2025 | 08:50 PM
Mangal Prabhat Lodha: 'वंदे मातरम गीता'वरून भाजप युवा मोर्चा आक्रमक; 'या' आमदारांच्या मतदारसंघात होणार समुहगायन

Mangal Prabhat Lodha: 'वंदे मातरम गीता'वरून भाजप युवा मोर्चा आक्रमक; 'या' आमदारांच्या मतदारसंघात होणार समुहगायन

Follow Us
Close
Follow Us:

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला होता इशारा
वंदे मातरम गीताच्या ​गायनावरून राज्यात राजकीय वातावरण पेटले
आझमी, शेख आणि पटेल या आमदारांच्या मतदारसंघात​ वंदे मातरम गीताचे समुहगायन​

मुंबई: वंदे मातरम गीताच्या ​गायनावरून राज्यात राजकीय वातावरण पेटलेले असताना आता याप्रकरणी भाजप युवा ​मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ​कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कॉंग्रेस आमदार अमीन पटेल, अस्लम शेख,अबू आझमी आणि रईस शेख यांच्या कार्यालयासमोर वंदे मातरम समूह गायन करण्याचा इशारा दिला होता, अखेर भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी या तीनही आमदारांच्या कार्यालयाबाहेर वंदे मातरम समूह गायनाच्या कार्यक्रमाची रणनीती आखली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ​कार्यक्रमांतर्गत राज्यातील ​शैक्षणिक संस्थांमध्ये​ ही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे​त. या निमिताने देशभरात ​जल्लोषाचे वातावरण असताना ​काँग्रेसच्या आणि समाजवादी ​पक्षाच्या काही आमदारांनी याला विरोध​ करणारे वक्तव्य केले होते. याचा तीव्र शब्दात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निषेध व्यक्त केला होता. त्याच वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या तीन आमदाराच्या ​मतदार संघात ​वंदे मातरम​चे समूहगान करण्याचा इशारा दिला होता. ​पार्श्वभूमीवर आता भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी कुलाबा, मुंबादेवी, मालाड आणि मानखुर्द या चार ठिकाणी वंदे मातरम गीताचे समूह ​गायन करण्या​ची आखणी सुरु केली असल्याची माहिती पुढे आली आहे. या चारही ठिकाणची जबाबदारी स्थानिक ​पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली असल्याचे कळते . या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष ​तेजिंदर तिवाना हे​ देखील सामील होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता वंदे मातरम गी​​ताच्या गायनावरून शुक्रवारी मुंबईत राजकीय आखाडा होण्याची शक्य​ता निर्माण झाली आहे.

फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात

स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेतून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता ‘वंदे मातरम् ‘ चे समुहगान होणार आहे. पुढील वर्षभर याअंतर्गत ‘ सार्ध शताब्दी महोत्सवाच्या माध्यमाने राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती ही राज्याचे कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

Web Title: Mangal prabhat lodha bjp morcha warn sing vande mataram front offices mla amin patel aslam sheikh abu azmi and rais sheikh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • vande mataram

संबंधित बातम्या

Devnar Power Project: कचरा आणि वीज संकट दोन्हीवर उतारा! १०२० कोटींचा देवनार प्रकल्प मे २०२६ मध्ये कार्यान्वित
1

Devnar Power Project: कचरा आणि वीज संकट दोन्हीवर उतारा! १०२० कोटींचा देवनार प्रकल्प मे २०२६ मध्ये कार्यान्वित

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात
2

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात

ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी
3

ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी

‘वंदे मातरम’ला विरोध अन् Mangal Prabhat Lodha अबू आझमींविरुद्ध आक्रमक; दिले थेट ‘हे’ आव्हान
4

‘वंदे मातरम’ला विरोध अन् Mangal Prabhat Lodha अबू आझमींविरुद्ध आक्रमक; दिले थेट ‘हे’ आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.