Mango festival by Pune devotees on occasion of Akshaya Tritiya at Ayodhya Ram Temple
पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय तृतीया लवकरच साजरा केला जाणार आहे. या दिवशी आंबे आणि सोने खरेदी करण्यावर विशेष भर दिला जातो. मंदिरांमध्ये देखील आंब्याचा भोग चढवला जातो. तसेच अक्षय तृतीया आंब्याचे पूजन केल्यानंतर सेवन केले जाते. पुण्यातील एक रामभक्त अनोख्या पद्धतीने भोग चढवणार आहे.
पुणेकर श्रीराम भक्त विनायक काची हे रामजन्मभूमी असलेल्या आयोध्येच्या राम मंदिरामध्ये आंब्याचा भोग चढवणार आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे 11000 आंब्यांची आरास वा महानैवैद्य असणार आहे. यासाठी अकरा हजार आंब्याचा ट्रक श्री क्षेत्र आयोध्या तील श्री रामलाल्ला च्या चरणी भोग आणि महाप्रसादासाठी रवाना देखील झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अक्षय तृतीया ही बुधवारी येत्या 30 एप्रिल रोजी श्रीराम भक्त विनायक भालचंद्र काची यांनी अयोध्येमध्ये महाभोग आयोजित केला आहे.
आज किसनराव – लक्ष्मणराव सिताराम काची (बुंदेले) फाउंडेशन, आणि श्रीरामभक्त विनायक काची यांच्या अकरा हजार आंब्याचा ट्रक श्री क्षेत्र आयोध्या कडे रवाना केला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नंदकिशोर तरूण मंडळात ‘श्रीं ‘ ची पुजन करण्यात आले. त्याचबरोबर मिठगंज पोलीस चौकी, आपला मारुती मंदिरासमोर ट्रक आणि आंब्याच्या पेटी चे पुजन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत रासने यांनी पुजा करुन 11000 व इतर फळे असलेला ट्रक भगवा झेंडा दाखवू रामजन्मभूमी अयोध्याच्या दिशेने प्रस्थान केले.
यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, ‘भाजपाचे कार्यकर्ते आणि माझे सहकारी विनायक काची यांनी अयोध्यातील श्रीराम लल्ला यांना 11000 आंबे आणि इतर फळांचा महा प्रसाद, भोग घेऊन निघाले आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा आणि अयोध्येतील रामलाल्ला यांना प्रार्थना करतो की भारतात आणि जगभरात रामराज्य स्थापन व्हावे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देऊन रामराज्य प्रस्थापित व्हावे, असे आमदार हेमंत रासने म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात 100 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर देशात राहत पाकिस्तानी नागरिकांविरोधात कडक भूमिका घेण्यात आली आहे. भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले जात असतानाच पुण्यातून 3 नागरिकांनी देश सोडला आहे. तर पुण्यात सध्या 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या परदेशी नागरिकांत मुस्लिम, सिंधी व हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच 20 नागरिक व्हिजिटर व्हिसावर तसेच इतर वेगवेगळ्या कारणासाठी पुण्यात आलेले आहेत.