सौजन्य : iStock
गोंदिया : जगभरात सध्या डेटिंग व सेक्स चॅटच्या विविध संकेतस्थळ व ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. गोंदियासारख्या शहरातही अशा ऑनलाईन जाळ्यामध्ये अडकणारे तरुण व अन्य वयोगटांतील लोकांची संख्या वाढत आहे. अशा संकेतस्थळांपासून दूर राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
ऑडिओ, व्हिडीओ, टेक्स मॅसेज अशा माध्यमातून डेटिंग व सेक्स चॅट करणारी संकेतस्थळे, ॲप इंटरनेटच्या जाळ्यात विस्तारत आहेत. पॉर्न साइट्स पाहणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याने अशा संकेतस्थळावर लिंक देऊन डेटिंगच्या विश्वात ओढले जाते. या जाळ्यात अनेक जण अलगद अडकतात. यातून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत.
कधी अश्लील फोटो शेअर करू कधी चॅटिंगचे रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग केले जाते तर कधी आर्थिक फसवणूकही केली जाते. त्यामुळे अशा संकेतस्थळांपासून दूर राहणे सर्वांच्या हिताचे आहे. कोरोना काळात सायबर गुन्हेगारांची संख्या वाढली असून, फसवणुकीसाठी नवनवीन प्रकार शोधले जात आहेत. त्यातच या डेटिंग अॅपचा फंड सध्या वापरला जात आहे.
अशी होते फसवणूक
डेटिंग ॲप किंवा संकेतस्थळावरील महिला तसेच पुरुष अश्लील फोटो शेअर करण्यास सांगतात. असे फोटो शेअर केल्यानंतर त्याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो. ऑडिओ रेकॉडिंगद्वारेही ब्लॅकमेलिंग केले जाते. संकेतस्थळ किंवा ॲपमध्ये नोंदणी फीची मागणी केली जाते. त्यानंतर, वारंवार पैशाची मागणी किंवा थेट लिंकद्वारे बँकेतील पैशावर डल्ला मारला जातो.
तक्रारी न करण्याची कारणे
अशा संकेतस्थळावर फसवणूक झाली तर बदनामीच्या भीतीने बहुतांश पीडित या गोष्टी लपवितात. पोलिसांत तक्रार करणे लांबच, परंतु, मित्र किंवा नातेवाईकांनाही ते या गोष्टी सांगू शकत नाहीत. त्यामुळे फसवणुकीचे असे प्रकार समोर येण्याचे प्रमाण कमी आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! ‘चौकशी करणारेच PSI वाल्मिक कराडचे मित्र? जितेंद्र आव्हाडांनी थेट फोटो केले पोस्ट






