
पिंपरी- चिंचवडमध्येही राजकीय भूकंप; 'या' बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक ‘‘पिंपरी-चिंचवडचा दादा विरुद्ध बारामतीचा दादा’’ अशी होणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकरांनी नोंदवले आहे. विशेष म्हणजे, प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला पक्षश्रेष्ठींकडे विशेष ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काळात शहरातील निर्णय शहरात होतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे नेते म्हणून राष्ट्रवादीला अक्षरश: घायाळ केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा मोठा ‘सपोर्ट’ असल्याचे सिद्ध झाले आहे.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे
माजी महापौर उबाठा गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील, माजी अध्यक्ष, स्थायी समिती उषा वाघेरे, प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, उबाठा गटाचे नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, माजी नगरसेवक रवी लांडगे, संजय नाना काटे, माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, प्रविण भालेकर, जालिंदर बापु शिंदे, सचिन सानप (स्वतः व पत्नी), दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी), सदगुरु कदम, समीर मासुळकर (स्वतः व पत्नी), डॉ. सुहास कांबळे, कुशाग्र कदम, अशोक मगर, नागेश गवळी, प्रसाद शेट्टी, नवनाथ जगताप, प्रभाकर वाघेरे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. देव-देश-धर्म अन् संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी निर्विवाद विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.