
जालन्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली! 'या' नेत्यांनी सपकाळांच्या उपस्थितीत केला प्रवेश
जालना : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. अनेक नेते पक्षही बदलत आहेत. अशातच आता जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राहुल गांधी यांचा संघर्ष व काँग्रेसच्या विचारधारेवर तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, राशिद पैलवान, प्रतापराव महाते पाटील, सय्यद लतीफ भाई, माजेद खान दाऊद खान, अर्शद भाई (चंदनझिरा फ्रेंड्स), इम्रान खान, फमिम खान (समाजसेवक), सलमान खान, आकाश श्रीरामवार (शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), भाऊसाहेब गोविंद अवघड (भाजप),अकबर खान बने खान (२५ वर्षे नगरसेवक व नगरपरिषदेचे पाणी पुरवठा सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार गट) तसेच अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित नेत्यांनी शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून, या पक्ष प्रवेशाने जालना जिल्ह्याची सत्तासमीकरणे बदलणार असून काँग्रेस पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे.
प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, राजेंद्र राख, कल्याण दळे, आतिक खान, जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहराध्यक्ष युसूफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथे अभूतपूर्व उत्साहात भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा पार पडला.