Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे प्रमुख मागणी होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 06, 2025 | 10:01 PM
मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला 'हा' मोठा निर्णय

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला 'हा' मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

राज्य सरकारने काढला मराठा आरक्षणाचा जीआर 
मराठा आरक्षणाच्या जीआरविरुद्ध ओबीसी नेते आक्रमक 
आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन उभे कळे होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आरक्षणचा जीआर काढला आहे. मात्र या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे मराठा समाजाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने उच्च न्यायालयात कॅवेट दाखल करण्यात आली. अ‍ॅड. अतुल पाटील यांनी ही कॅवेट दाखल केली असून, ‘आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयाविरुद्ध याचिका दाखल झाल्यास आमचे म्हणणेही ऐकले जावे व कोणताही एकतर्फी आदेश देऊ नये,’ अशी विनंती अर्जात केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी वकील गणेश म्हस्के तसेच मराठा आरक्षण अभ्यासक प्रशांत भोसले यांच्या वतीने ही कॅवेट दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने सरकारकडे सातत्याने मागणी केली होती की, हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा. त्यानुसार राज्य सरकारने शासन निर्णय काढला असला तरी, त्यावर न्यायालयीन वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कॅवेट दाखल करण्यात आली आहे.

लक्ष्मण हाकेंचा पवारांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पवारांनीच रसद पुरवली असल्याचा आरोप करत, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेला आमचा कायम विरोध असून, आमच्या या न्याय हक्कासाठी संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करणार असल्याचे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

Maratha Reservation: लक्ष्मण हाकेंचा पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, “जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला…”

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून या निषेधार्थ बारामती शहरात ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा प्रा . लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहरातून प्रांत कार्यालयासमोर काढण्यात आला. बारामती शहरातील भिगवन चौकातून सुरू झालेला मोर्चा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे प्रांत कार्यालय समोर गेला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी प्रा. हाके यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात काढलेल्या अध्यादेशावरून ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खा. सुप्रिया सुळे व इतर नेत्यांवर प्रचंड टीका केली.

Web Title: Maratha community filed a caveat in high court as maratha reservation challenge in court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai High Court
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

ओबीसी आरक्षणासाठी पंचमसाली समाजाचा अक्कलकोटमध्ये मेळावा; जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक
1

ओबीसी आरक्षणासाठी पंचमसाली समाजाचा अक्कलकोटमध्ये मेळावा; जगद्गुरू बसव मृत्युंजय गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका
2

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन
3

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
4

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.