माढा : मंत्री छगन भुजबळ व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत माढ्यात २८ जानेवारीला होणाऱ्या ओबिसी मेळाव्याला सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध दर्शवला आहे.मंत्री छगन भुजबळ व प्रकाश आंबेडकर हे दोघे एकाच मंचावर येणारी महाराष्ट्रातील पहिली सभा होणार आहे. (Maratha community opposes OBC rally in Madha)
दरम्यान या सभेला माढ्यातील सकल मराठा समाजाने विरोध दर्शवत प्रशासनाला निवेदन देऊन स.म.गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेचे मैदान न देण्याची मागणी केली आहे.२८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ओबीसी आरक्षण व संविधान बचाव यासाठी शहरातील जि. प.मराठी शाळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत ओबिसी नेते रमेश बारसकर यांनी माढ्यात दिली होती. मात्र जिल्हा परिषद मुलाच्या शाळेच्या आवारात सभेसाठीची शाळेने परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.
माढा तहसील प्रशासनासह पोलिस ठाण्याला सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,स.म.गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेत सभा होत आहे.दरम्यान कोणतीही परवानगी घेतली नसलेल्या तसेच या सभेमुळे २ समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.एकिकडे मनोज जरांगे-पाटील मुंबई कडे विराट मोर्चा घेऊन निघाले आहेत.या वातावरणातच अशी सभा म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ठरणार आहे.अश्या परिस्थितीत ओबिसी सभेला परवानगी देऊ नयेत.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन देताना सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
वरिष्ठांकडून नाही परवानगी,सभा विना परवाना होणार ?
ओबीसी मेळाव्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व स.म.गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला या दोन्ही शाळांनी सभेसाठी अद्याप तरी परवानगी दिलेली नसल्याचे दोन्ही शाळाच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आले.शालेय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखील परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे २ दिवसांच्या सुट्टीच्या काळात परवानगी मिळणार का ? ओबिसी मेळावा विना परवाना पार पडणार ? असे सवाल उपस्थित झाले आहेत.
[blockquote content=” ओबिसी मेळाव्याच्या सभे साठी जिल्हा परिषद प्रशालेचे मैदानाची परवानगी मागण्यात आली आहे.मात्र शाळेच्या व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी दिलेली नाही.आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल. ” pic=”” name=”-नेताजी बंडगर,माढा पोलिस स्टेशन सहा.पोलिस निरीक्षक”]