Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2025 | 05:56 PM
उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन (फोटो सौजन्य-X)

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य,पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. ‘इज ऑफ ड्युईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

वडगाव मावळ न्यायालयासाठी १०९ कोटींची नवीन भव्य इमारत; आमदार सुनील शेळके यांचा निर्णय

गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात या साठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. एक खिडकी योजना असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांगला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इज ऑफ ड्युईंग बिझनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरामुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे. संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत. राज्यात सांडपाणी व्यवस्थापन, त्यावरील प्रक्रिया, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल. पुण्यात जलद वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रित व उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य देश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात. आता हेच शिक्षण नवी मुंबई येथील ‘एज्यूसिटी’ मध्ये मिळणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाशी कुर्निल विद्यापीठाने केलेल्या करारामुळे खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध होऊन त्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लोह उद्योगाला होईल. गडचिरोली ही देशाची लोह राजधानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलीप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

MiraBhayander : रेडीमिक्स डंपरच्या अपघाताने 11 वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत ; वाहतूक विभागाचा निष्काळजीपणावर मनसेचा रस्ता रोको

Web Title: Maharashtra is the best state for industry and investment with a nurturing ecosystem available in the state asserted devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Police : ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटतेय? मग फॉलो करा मुंबई पोलिसांचा ‘एबीसीडी’ फॉर्म्युला
1

Mumbai Police : ऑनलाइन फसवणुकीची भीती वाटतेय? मग फॉलो करा मुंबई पोलिसांचा ‘एबीसीडी’ फॉर्म्युला

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त
2

मोखाड्यात अवैधपणे मद्य वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात, 6.15 लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास
3

कर्जत तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करणार, गटविकास अधिकाऱ्यांचा विश्वास

Dahisar Toll Naka Relocation : मिरा-भाईंदर प्रवास कोंडीमुक्त होणार! दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर, काय आहे नवीन ठिकाण?
4

Dahisar Toll Naka Relocation : मिरा-भाईंदर प्रवास कोंडीमुक्त होणार! दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर, काय आहे नवीन ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.