सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवीन उपराष्ट्रपती
महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा दिला राजीनामा
एनडीएचे वर्चस्व पुन्हा झाले सिद्ध
Acharya Devvrat: देशाच्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यपाल कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत हे कार्यभार पाहणार आहेत. आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
कोण आहेत आचार्य देवव्रत?
आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. याआधी आचार्य देवव्रत हे हिमाचल प्रदेशचे देखील राज्यपाल राहिले आहेत. साधारणतः 3 ते 4 चार वर्षे ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. सध्या ते गुजरातचे राज्यपाल आहेत. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे.
कोण होणार महाराष्ट्राचा राज्यपाल? RSS कोणाला देणार पसंती? भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले. लोकसभा व राज्यसभेतील मिळून एकूण खासदारांची संख्या 788 इतकी होते. दोन्ही सभागृहात 7 पदे रिक्त आहेत. म्हणजेच आज 781 खासदारांनी मतदान करणे अपेक्षित होते. त्यातील 13 खासदारांनी मतदान केले नाही. तर काही प्रमाणात इंडिया आघाडीचची मते फुटल्याचे देखील म्हटले जात आहे. 14 ते 15 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे म्हटले जात आहे.
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
उपराष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाकडूने विविध सुरक्षा यंत्रणांशी संयुक्त सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपतींची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली पोलिसांकडे नाही तर उपराष्ट्रपतीच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे असणार आहे.
गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केंद्रीय सशस्त्र दलाला याबाबत पत्र लिहिले आहे. गृह मंत्रालयाला सूचना दिल्यानंतर ब्लू बुक-२०२५मधील तरतुदींनुसार, सीआरपीएफला उपराष्ट्रपतींना सुरक्षा पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांना देखील काही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना उपराष्ट्रपतींच्या घरातील प्रवेशावरील नियंत्रण किंवा कार पॅसेज क्लिअरन्स ड्युटी आणि निवासस्थानाच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.