Manoj jarange patil on maratha arakshan
जालना : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. ओबीसी समजामधून मराठा संपूर्ण आरक्षण मिळावे अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर हे मराठा आरक्षण द्यावे. अन्यथा, आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मनोज जरांगे पाटील राजकारणाच्या मैदानात उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आरक्षण देण्याची अल्टीमेटम राज्य सरकारला दिला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये उपोषण करण्याच्या तयारीमध्ये मराठा नेते आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 29 सप्टेंबरपूर्वी आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितली आहे. याबाबत त्यांनी अंतरवाली सराटी येथून घोषणा केली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात उपोषण होण्याची शक्यता आहे. बार्शी तालुक्यातील मराठा समाज जरांगे पाटील यांच्या विरोधात आवाज उठवण्याच्या तयारीमध्ये आहेत.
मनोज जरांगे पाटलांना सवाल
सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवानी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? मनोज जरांगे पाटील यांना असा सवाल मराठा बांधवांनी विचारला आहे. आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसणार अशी घोषणा करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना सवाल केला आहे.
उपोषणाचा इशारा
मराठा समाजामध्ये आता आरक्षणावरुन दोन गट निर्माण होण्याची शक्यता आहे. 29 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारकडे आऱक्षणची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. नाहीकर निवडणूकीला उमेदवार पाडू असा आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला आहे. तर महाविकास आघाडीला जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा समाजातील दुसरा गट करत आहेत. यावरुन अण्णासाहेब शिंदे यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा, असा जहरी सवाल केला आहे.