Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुरू असलेल्या पोलीस कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2026 | 12:15 PM
विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

Follow Us
Follow Us:

पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुरू असलेल्या पोलीस कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात असताना आपल्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल करत पवार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. विद्यार्थ्यांऐवजी माझ्यावर गुन्हे दाखल करा आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी करतानाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली.

 

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी शांततेत आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनातील आयोजक आणि विद्यार्थ्यांना पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच, मध्यरात्री वसतिगृह चालकांना दिलेल्या नोटिसा आणि विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी न होण्याबाबत दिल्या जाणाऱ्या कथित धमक्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांना गुन्हेगार किंवा दहशतवादी समजून वागविणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना गुन्हेगार आणि हेर असल्याप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन संबंधित कलमांनुसार आपल्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

… तर परिस्थिती चिघळू शकते

आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगीचे अनेक अर्ज दिले असून, काही अर्ज नाकारण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी कारवाईचा मार्ग स्वीकारल्यास परिस्थिती चिघळू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ड्रोन उडविल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ड्रोन जप्त केला आहे. पोलीस हवालदार युवराज भारत टोळे यांच्या तक्रारीवरून दिगंबर भारत खारे, प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गांगुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा  : खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आंदोलनस्थळाच्या मागील बाजूस जनरेटरजवळ दिगंबर खारे हे रिमोट कंट्रोलरच्या साहाय्याने ड्रोन उडविताना आढळले. चौकशीदरम्यान ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवाना आणि पोलिसांची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईनंतर रोहित पवार विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोहोचले. विद्यार्थ्यांवर गुन्हे कोणाच्या आदेशाने दाखल केले जात आहेत, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. यापूर्वी परवानगी रद्द झाल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Mla rohit pawar has questioned the police regarding the action taken against the students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • MLA Rohit Pawar
  • Pune Police

संबंधित बातम्या

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
1

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
3

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
4

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.