Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पथकासोबत बैठक घेऊन शेतकरी आणि शेतमजुरांना मदत देण्याची गरज अधोरेखित केली.

  • By विवेक
Updated On: Oct 11, 2026 | 06:36 PM
Maharashtr cm meeting drought

Maharashtr cm meeting drought

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून आढावा
  • कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांना फटका
  • धरणांमधील पाणीसाठा आणि पाणीटंचाईचा प्रश्न
 

राज्यात यंदा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतीच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचं संकट समोर असून कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक दाखल झालं आहे. (Maharashtra Drought)

गेल्या काही दिवसांपासून हे पथक राज्यातील विविध भागांत भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. अश्यातच आज (रविवार, 11 ऑकटोबर) या पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल आणि पथकातील अन्य सदस्य या बैठकीला उपस्थित होते. राज्यातील दुष्काळाची तीव्रता, शेतीचं नुकसान आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीवर यावेळी चर्चा झाली. मंत्री गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील हेही बैठकीला उपस्थित होते.

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिलं. कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून तूर पिकालाही फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकरी आणि शेतमजुरांना मदतीवर भर

राज्यात मोठं कृषी संकट निर्माण झालं असून आगामी रब्बी हंगामावरही त्याचे परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना सर्व प्रकारची मदत देण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मदतीचं नियोजन करताना सामान्य शेतकरी आणि शेतमजूर केंद्रस्थानी असतील, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय पथकाने राज्यातील विविध भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

पिण्याचं पाणी आणि पशुधन वाचवण्याचं आव्हान

दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल. नागरिकांसोबतच जनावरांसाठीही पुरेसं पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन राज्य सरकार करेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. पाण्याचं आरक्षण करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्रीय पथकाला प्राथमिक निवेदन सादर करण्यात आलं असून लवकरच अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. आता केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर राज्याला किती आर्थिक मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दुष्काळाचा सामना करताना शेती, पाणीपुरवठा आणि पशुधनाचं संरक्षण ही राज्यासमोरील मोठी आव्हानं ठरणार आहेत.

पुण्यात संस्थाचालकाची फिल्मी स्टाईल फसवणूक ! ५० कोटींचा चेक दाखवला, बदल्यात ८७ लाख घेतले; पेट्या उघडताच निघाल्या…

Web Title: Maharashtra drought central team devendra fadnavis farmer relief vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • drought news
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
1

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा
2

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
3

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा
4

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.