Marathi Breaking news live updates: उमरगा-लोहारा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरसभेत महायुतीत प्रवेशाची खुली ऑफर दिली. लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाच्या कामाचे उद्घाटन होत असताना ही घटना घडली.
कार्यक्रमादरम्यान स्वामी यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी पाण्याची मागणी केली असता, “पाणी कुठल्या वळणावर आहे, हे तुम्हालाही कळले पाहिजे… पाणी तर आम्हीच देणार,” असे म्हणत विखे पाटील यांनी उपस्थितांना हात वर करून स्वामींना निर्णय घेण्याचे आवाहन केले. या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.
12 Aug 2025 07:34 PM (IST)
Yes Bank Loan Fraud Marathi News: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने उद्योगपती अनिल अंबानी यांची याचिका फेटाळून लावली आहे, ज्यामध्ये त्यांनी येस बँकेतील गुंतवणुकीशी संबंधित आरोपांची पूर्तता करण्याची मागणी केली होती. यामुळे आता त्यांना किमान १,८२८ कोटी रुपयांचा दंड होऊ शकतो.
12 Aug 2025 07:04 PM (IST)
Lifestyle News: हल्लीच्या काळात आपले प्रत्येकाचेच जीवन हे धपालीचे झालेले आहे. ऑफिसचे काम, अन्य गोष्टींची काळजी अशा अनेक गोष्टींचा आपण ताण घेत असतो. तो आपोआप येतच असतो. प्रत्त्येकाच्या जीवनात ताण आहे. मानसिक ताण, शारीरिक ताण असे आपण म्हणून शकतो. व्यायाम व आहारात असलेली अनियमितता यामुळे देखील अनेक आजार होण्याचा धोका असतो. स्ट्रेस हा कोणत्याही गोष्टीचा येत असतो. रोजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस येणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र हा स्ट्रेस म्हणजेच तणाव कमी करणे अस्व्ह्यक आहे. तो कसा कमी करायचा याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
12 Aug 2025 06:20 PM (IST)
Viral video of cricket on the mountain: क्रिकेट या खेळाच भारतात प्रचंड वेड आहे. भारतात क्रिकेट हा खेळ सर्वाधिक पाहिला आणि खेळला जात असतो. या आपल्या देशात क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा देऊन पुजलं देखील जातं. भारतातील प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीत क्रिकेट खेळताना कित्येक क्रिकेटप्रेमी दिसून येतील. तसेच क्रिकेटवर तासनतास गप्पा मारणारे क्रिकेट तज्ञ देखील तुम्हाला भारतातच बघायला मिळतील. क्रिकेट वेड काय असतं हे दाखवून देणारा एक व्हिडिओ सद्या शोधलं मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.
12 Aug 2025 06:08 PM (IST)
पुणे/Pune Crime News: सध्या राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. जुगार, कोयता गॅंग, खून अशा स्वरूपाचे गुन्हे घडताना दिसून येत आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी धनकवडी येथे मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी एका जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी केली आहे. एका जुन्या पत्र्याची शेड असलेल्या भागात जुगार खेळला जात होता. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याचे समोर आले आहे.
12 Aug 2025 05:46 PM (IST)
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मध्यंतरी मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे बंधू यांनी एकत्रित यावे अशी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंची युती होणार का हे पाहावे लागणार आहे. मात्र याबाबत काँग्रेसची भूमिका वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केली आहे.
12 Aug 2025 04:55 PM (IST)
गेली अकरा वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. हा रस्ता खड्डेमय झाला आहे.अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांनी आता भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही. सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन-तीन वर्षे हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढील वर्षभरता हा महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या बुधवार १३ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी ११ वाजता रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे
12 Aug 2025 04:50 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात दुपारपासून काही भागात मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळी सुद्धा पावसाची रिपरिप कायम आहे. जिल्ह्यातील माणगाव खोरे, घोटगे, नारुर, दोडामार्ग या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला.
12 Aug 2025 04:40 PM (IST)
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील वटफळी येथील शेतकरी परसराम जाधव यांनी तीन एकर क्षेत्रावर मालविका नावाच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. सध्या सोयाबीनला फुले व शेंगा लागण्याचा हंगाम असताना पिकाला शेंगा न लागल्याने ते हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने पंचनामा करून बियाणे उत्पादक कंपनीकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे
12 Aug 2025 04:35 PM (IST)
बई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
12 Aug 2025 04:30 PM (IST)
उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्यापासून आमदार कुमार आयलानी यांनी शहरातील रस्ते सुरळीत करण्यासाठी सतत प्रयत्न केले असून, मनपा आयुक्त मनीषा आव्हाळे यांना वारंवार पत्रे देऊन तसेच व्यक्तिगत चर्चा करूनही रस्त्यांच्या प्रश्नावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. फक्त आश्वासने देण्यात येत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर आमदार कुमार आयलानी व जिलाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या नेतृत्वाखाली भाजप उल्हासनगरने मनपा आयुक्तांना अंतिम चेतावणी दिली आहे. पुढील सात दिवसांत शहरातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
12 Aug 2025 04:25 PM (IST)
मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार नोंदणी व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ८०-९० टक्के जैन समाज कबुतरखाना हटवण्याच्या विरोधात आहे. कबुतरांपासून जीव धोक्यात येत असल्यास त्यावर विचार व्हावा, मात्र लोकांना त्रास होत असेल तर कसली जीवदया आणि भूतदया, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोर्टाच्या नियमांचे पालन होणे गरजेचे असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
12 Aug 2025 04:21 PM (IST)
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी यात येसूबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतेच तिचे साखरपुडा हुरकला आहे. मुळात, तिला खऱ्या आयुष्यात देखील ‘शंभूराज’ मिळाल्याने हे नवं जोडपं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड करत आहे. अशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने तिची लव्ह स्टोरी शेअर केली आहे. ही फिल्मी स्टोरी चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.
12 Aug 2025 04:20 PM (IST)
‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ विधीमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले आहे. असं असलं तरी हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे,रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार , विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष – संघटनांनी केला आहे.
12 Aug 2025 04:20 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उच्छाद सुरू असून शेती, बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. काही महिन्यांपूर्वी हत्तींच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर अलीकडेच एका शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला केला. राज्य सरकारने ३० जूनपूर्वी हत्तींचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कारवाई न झाल्याने ठाकरे गट शिवसेनेकडून १४ ऑगस्ट रोजी वनखात्याच्या कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी दिला.
12 Aug 2025 04:10 PM (IST)
भारतीय स्वातंत्रच्या 78 व्या वर्धापन दिना निमित्त हर घर तिरंगा योजने अंतर्गत म्हसळा शहरात तालुका प्रशासना मार्फत आज सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन मध्ये तालुक्यातील माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्याचे ओपन गट, 8वी, 12 वी व मुलींचा गट असे एकूण चार गट तयार करण्यात आले होते.मॅरेथॉनची स्पर्धा करडे पेट्रोल पम्प येथून सुरु झाली आणि अंजुमन शाळेपर्यंत समाप्त झाली.ओपन गटात सुशील दत्तात्रय नाक्ती, माध्यमिक गटात जमीर अब्दुल मजीद लंगडे, विद्यालय गटात नीरज यशवंत गाणेकर, तर मुलींच्या गटात श्वेता वसंत पयेर यांनी प्रथम क्रमांक पटकवला.
12 Aug 2025 04:05 PM (IST)
अंबरनाथ कार्यालयाच्या आवारात नैसर्गिक रानभाजा महोत्सव आयोजित करण्यात आला. पंचायत समितीच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पिकवलेल्या आणि पावसाळ्यातील औषधी, गुणकारी रानभाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडित राठोड यांच्या हस्ते सकाळी रानभाज्या महोत्सवाच उद्घाटन पार पडलं. अंबरनाथ तालुका कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात आघाडा, शेवळा, कुलोजी भाजी, भारंग, मायाळू, कपाळ फोडी, दिंडा भाजी, करटोळी, टाकळा अशा विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीचे स्टॉल आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांनी लावले होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण होऊन त्यांना बाजारपेठ देखील उपलब्ध होत आहे.
12 Aug 2025 04:03 PM (IST)
अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीत माझी वसुंधरा योजनेतील १० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम दंडासह वसूल करावी व संबंधितांची पदावरून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीस २०२१ मध्ये माझी वसुंधरा योजनेअंतर्गत शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. या निधीचा खर्च पंचतत्वावर आधारित नियमांचे पालन करून व पर्यावरण विभागाच्या परवानगीनेच करणे बंधनकारक असताना, विद्यमान सरपंच सुनीता नितीन खेतमाळस, सरपंचपती व ग्रामपंचायत सदस्य नितीन खेतमाळस, तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी नियमबाह्य व्यवहार केला असल्याचे पुराव्यासहित दिलेले आहे व ग्रामपंचायतच्या कॅशबुक नोंदींनुसार, २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सरपंचांचा भाचा आकाश वाघ यांच्या नावावर १० लाख रुपये वर्ग करण्यात आले असून आकाश वाघ हा शासकीय नोकरदार असून, त्याला कोणतेही कामाचे टेंडर दिले नसतानाही ही रक्कम खात्यावर कस काय जमा करण्यात आली? या अपहारप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून रक्कम दंडासह वसूल करावी व संबंधितांची पदावरून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले आहे.
12 Aug 2025 03:45 PM (IST)
महाराष्ट्रातील प्रमुख महानगरपालिकांपैकी एक असलेल्या ठाणे महानगरपालिका (TMC) कडून १७७३ पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. गट-क आणि गट-ड संवर्गातील ही पदे सरळसेवा पद्धतीने भरली जाणार असून, सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय आणि निमवैद्यकोष अशा विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. या विभागामध्ये आधीच अनुभव असल्यास तुम्ही सहज या पदांसाठी पात्र ठरू शकता.
12 Aug 2025 03:30 PM (IST)
लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये सुरू असलेले विशेष सघन पुर्नपरिक्षण (SIR) चा मुद्दाही चांगलाच पेटला आहे. एसआयआरच्या माध्यमातून बिहारमधील मतदार यादीत फेरफार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातआहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.
12 Aug 2025 03:25 PM (IST)
नवी दिल्ली: दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्ली आणि एनसीआर भागात अनेकांना भटके कुत्रे चावल्याने रेबीज आजाराचा सामना करावा लागला आहे. दरम्यान काळ सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला याबाबत अत्यंत महत्वाचे आदेश दिले आहे. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. या निर्णयावर आता काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील भाष्य केले आहे.
12 Aug 2025 03:22 PM (IST)
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ६ महिन्यात जवळपास ४५ लाख मतं वाढली! ही आली कुठून मतं? मतांची चोरी करुन सत्तेमध्ये बसले आहेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे
12 Aug 2025 03:00 PM (IST)
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत, असे मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडले आहे.
12 Aug 2025 02:50 PM (IST)
रायगडच्या पालकमंत्री पदाचा गुंता अजूनही महायुतीकडून सुटलेला नाही. यामुळे अजित पवार गटाच्या आदिती तटकरे की शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यावरुन पालकमंत्रिपद रिक्त राहिले आहे. आता स्वातंत्र्यदिनी आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
12 Aug 2025 02:47 PM (IST)
नवी दिल्ली: गेले काही दिवस देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पश्चिम भारतात जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान आज देखील भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड भागात जोरदार पाऊस सुरु आहे.
12 Aug 2025 02:40 PM (IST)
ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही टी-२० सर्किटमध्ये सक्रिय आहे. तो वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळत आहे. दरम्यान, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये मोठे विक्रम केले आहेत आणि विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. डेव्हिड वॉर्नर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये पोहोचला आहे आणि विराट कोहली टॉप ५ मधून बाहेर पडला आहे.
12 Aug 2025 02:40 PM (IST)
उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यामध्ये वाद उफाळला आहे. सदर ठिकाण हे मंदिर आहे की मकबरा यावरुन वाद निर्माण झाला आहे. मुस्लिम समाजाकडून हे ठिकाण नवाब अब्दुल समद यांची कबर म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी शेकडो हिंदू लोकांनी कबरीत घुसून तोडफोड केली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मकबरा पर भगवा झंडा लहराते हुए।
यूपी के फ़तेहपुर मैं नवाब अब्दुल समद मकबरा है और यहां जो कुछ हो रहा है सब पुलिस प्रशासन की मौजूदगी में हो रहा है #Fatehpur pic.twitter.com/m1tngPOFVw
— 𓂆 چاندنی (@Chandnii__) August 11, 2025
12 Aug 2025 02:40 PM (IST)
वसई: मुंबईलगतच्या वसईमध्ये भरदिवसा तब्बल 1.5 कोटी रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १० ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. घरात एकटेच वृद्ध गृहस्थ उपस्तिथ असल्याचे पाहत चोरट्यांनी संधी साधली आणि घरात धाड टाकली. ही घटना वसईच्या पश्चिम येथील किशोर कुंज सोसायटीत घडली. उधोजी भानुशाली यांच्या घरात ही चोरी झाली. उधोजी भानुशाली यांचा मुलगा मितेश, आई आणि घरातील महिला रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मामाच्या घरी गेले होते. त्यावेळी ते एकटे घरात होते. त्याचवेळी ही घटना घडली.
12 Aug 2025 02:31 PM (IST)
२०१८ मध्ये ‘केदारनाथ’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी सारा अली खान बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. एकेकाळी या अभिनेत्रीचे वजन खूप जास्त होते, परंतु तिने तिच्या मेहनतीने आणि आवडीने ते कमी केले आणि आज ती तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. आज १२ ऑगस्ट रोजी ही अभिनेत्री तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, तिच्या आयुष्याबद्दल, करिअरबद्दल आणि वैयक्तिक पैलूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
12 Aug 2025 02:29 PM (IST)
Cincinnati Open 2025 : स्टार टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सिनसिनाटी ओपन २०२५ मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सबालेंकाने ३ तास ९ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूला पराभूत करून विजेतेपदावर नाव कोरले आहे. रॅडुकानूला पुन्हा एकदा सबालेंकाकडून पराभव चाखावा लागला. एकूणच, सबालेंका विरुद्धच्या सलग पराभवांची मालिका तिला आल्यावेळी देखील खंडित करता आली नाही.
12 Aug 2025 02:29 PM (IST)
महाभारताच्या कथेत अनेक प्रतिज्ञांचा उल्लेख आहे, परंतु अशी एक प्रतिज्ञा होती ज्यामुळे अर्जुनाचा जीव धोक्यात आला होता, तुम्हाला ही कथा माहीत आहे का? परिस्थिती अशी आली होती की अर्जुन निराशेत आपले जीवन अर्पण करण्यास तयार होता. महाभारतातील महान धनुर्धर योद्ध्यांमध्ये गणला जाणारा अर्जुन आत्महत्या करणार होता. मात्र त्यानंतर अशी घटना घडली ज्यामुळे केवळ अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा सन्मानच वाचला नाही तर त्याचा जीवही यामुळे वाचला.
12 Aug 2025 02:28 PM (IST)
१५ ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, कृतज्ञतेचा आणि आनंदाचा दिवस आहे. १९४७ साली या दिवशी आपल्या देशाने परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवले आणि आपला तिरंगा आकाशात फडकला. या दिवशी आपण शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि घराघरांमध्ये ध्वजवंदन करतो, देशभक्तीची गाणी गातो, आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना व सैनिकांना सन्मानाने स्मरतो.
12 Aug 2025 02:28 PM (IST)
केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने गुजरात आणि महाराष्ट्रात दुजाभाव केल्याचा आरोप केला जातो. यावरून अनेकदा राजकीय संघर्षही झाले आहेत. अशात आज कांद्यावरून गुजरात आणि महाराष्ट्रात दुजाभाव केल्याचा आरोप करत संसदेत विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कांदा खरेदीवरून देशातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारचा चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. संसदेच्या आवारात कांद्याचे प्रश्न आणि त्यावरील घोषणाबाजी करून संसदेचा परिसर दणाणून सोडला.
12 Aug 2025 02:28 PM (IST)
भाजप आमदार रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघाची थेट पाकिस्तानसोबत तुलना केली. याचा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला आहे. तसेच जोरदार टीका देखील केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार रमेश कराड यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रमेश कराड हे त्यांचा लातूर ग्रामीण मतदारसंघ हा पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे असे म्हणाले आहेत. यावरुन आता वाद चिघळण्याची शक्यता आहे.
बेताल बरळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार रमेशअप्पा कराड यांचाही समावेश झाला. ‘‘लातूर ग्रामीण मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानात भारताचा झेंडा लावण्यासारखा प्रकार’’, हे त्यांचं वक्तव्य म्हणजे लातूर ग्रामीण मतदारसंघातील तमाम जनतेचा अवमान आहे आणि याबाबत त्यांनी माफी मागितली… pic.twitter.com/TFnVy88IhO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 12, 2025
12 Aug 2025 02:28 PM (IST)
Share Market Holiday Marathi News: या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात फक्त चार दिवस व्यवहार होतील. बीएसई आणि एनएसईवर ट्रेडिंग ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान चालेल, तर १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी बाजार बंद राहतील. १५ ऑगस्ट रोजी देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल, ज्यामुळे त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असेल. यानंतर, शनिवार आणि रविवार (१६-१७ ऑगस्ट) असल्याने बाजार बंद राहतील.
12 Aug 2025 01:55 PM (IST)
इंडियन प्रिमियर लीग 2025 च्या 18 व्या सिझनमध्ये राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने जेतेपद जिंकले होते. आयपीएल 2025 च्या आधी मेगा ऑक्शन पार पडला होता यावेळी संघामध्ये फेरबदल पाहायला मिळाला होता. यावेळी भारताचा स्टार विकेटकिपर ऋषभ पंत याला लखनऊ सुपर जायंट्सला 27 कोटींना विकत घेतले होते. तर श्रेयस अय्यरला 26 कोटींना विकत घेतले होते. यावेळी भारताच्या अनेक खेळाडू हे आयपीएल 2025 मध्ये मालामाल झाले होते.
12 Aug 2025 01:45 PM (IST)
काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेतून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
12 Aug 2025 01:35 PM (IST)
नुकतेच इस्रायलच्या (Israel) सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा सिटी ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र बेंजामिन नेतन्याहूंच्या या योजनेला संयुक्त राष्ट्र संघ आणि मुस्लीम देशांकडून विरोध केला जात आहे. गाझामध्ये लाखो पॅलेस्टिनी राहतात. त्यांच्यासाठी ही योजना धोकादायक असल्याचे मानले जात आहे. आज आपण या देशांनी इस्रायलच्या या योजनेवर नेमकं काय म्हटले आहे ते सविस्तर जाणून घेणार आहेत.
12 Aug 2025 01:25 PM (IST)
iPhone युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक जायंट कंपनी अॅपलने iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेट जारी केले आहे. एवढंच नाही तर कंपनीने iPadOS, watchOS, tvOS, macOS साठी देखील अपडेट्स जारी केले आहेत. त्यामुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी सप्टेंबरपर्यंत या बीटा अपडेटचे स्टेबल अपडेट रिलीज करू शकते. कारण नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या लेटेस्ट अपडेटमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही.
12 Aug 2025 01:15 PM (IST)
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तब्बल १४ हजार पोलीस पदांच्या भरती संदर्भातील निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील तरुण पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. ही बातमी त्यांच्यासाठी एक नवा आशेचा किरण ठरणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रियी रखडली होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण होते. पण मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रीया वेगाने सुरू होईल.
12 Aug 2025 01:05 PM (IST)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेतून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
12 Aug 2025 12:45 PM (IST)
‘पर्यायी इंधनाला चालना देऊनही देशातील जीवाश्म इंधनाची आयात वाढतच असून, देशाची जीवाश्म इंधन आयात शून्य होईल तो देशासाठी मोठा दिवस असेल,’
12 Aug 2025 12:30 PM (IST)
भाजप खासदारांना 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं आहे. भाजपची दिल्लीत तीन दिवस कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत खासदारांशी संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. तसेच देशातील सध्याचे मुद्दे आणि पक्षाची रणनीती कार्यशाळेत मांडली जाणार आहे.
12 Aug 2025 12:24 PM (IST)
खासदार भास्कर भगरे, राजभाऊ वाजे, अरविंद सावंत, बजरंग सोनवणे, निलेश लंके, डॉ. शोभा बच्छाव यांसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी कांद्याच्या माळा घालून आज संसदेत आंदोलन केले. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
12 Aug 2025 12:05 PM (IST)
जागतिक हत्ती दिनानिमित्त ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर खास वाळू शिल्प रेखाटण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यावर वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांनी १२ फूट लांबीचे हत्ती वाळू शिल्प साकारले आहे. यामधून हत्ती वाचवण्याचा संदेश देण्यात आला आहे.
#WATCH | Puri, Odisha: Sand artist Sudarsan Pattnaik creates 12-ft-long elephant sand sculpture at Puri Beach on World Elephant Day.
(Source: Sudarsan Pattnaik) pic.twitter.com/Tffz8hU1UC
— ANI (@ANI) August 12, 2025
12 Aug 2025 12:01 PM (IST)
महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 14 हजार पोलीस पदांच्या भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही भरती प्रक्रिया लवकरच वेगाने सुरू होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
12 Aug 2025 11:45 AM (IST)
काल इंडिया आघाडीच्या 300 हून अधिक खासदारांनी आंदोलन केले. निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे दिल्लीमध्ये वातावरण तापले. या राड्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खास जेवणाचे आयोजन केले होते.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कांग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी सोमवारी आयोजित केलेल्या रात्री भोजआणि बैठकीसाठी उपस्थित राहिलो!
अनेक विषयांवर अनौपचारीक चर्चा झाल्या! pic.twitter.com/29xxr51yTj— Sanjay Raut (@rautsanjay61) August 12, 2025
12 Aug 2025 11:40 AM (IST)
संसदेच्या मकर द्वारावर पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु झाले आहे. एसआयआर विरोधात इंडिया आघाडीचे खासदार हे जोरदार निदर्शने करत आहे.
#WATCH | INDIA Bloc MPs protest against the SIR at Makar Dwar of the Parliament. pic.twitter.com/QLEZWT0Duk
— ANI (@ANI) August 12, 2025
12 Aug 2025 11:28 AM (IST)
"तुम्ही संसदेला लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर मानता, पण त्याच मंदिरात चोऱ्या-माऱ्या करून सत्तेवर आलेले लोक आमच्या अवतीभवती आहेत. त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचं निवडणूक आयोग काम करतं. निवडणूक आयोग रखवालदार नव्हे तर चोराच्या भूमिकेमध्ये आहे," असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
12 Aug 2025 11:25 AM (IST)
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश भक्तांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे. चतुर्थीनिमित्त मंदिर आणि परिसर सजवण्यात आला असून आकर्षक फुलांची मोराच्या स्वरुपांमध्ये सजावट केली आहे. मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
12 Aug 2025 11:21 AM (IST)
भाजप आमदार परिणय फुके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर आरोप केला आहे. यासंदर्भात फुके म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम हे जरांगे पाटील करत आहेत. जसं पाऊस आला की बेडकं बाहेर येतात तसं निवडणूका आल्या की मनोज जरांगे पाटील बाहेर येतात. आणि बेताल वक्तव्य करतात, असा टोला भाजप आमदार परिणय फुके यांनी लगावला आहे.