Marathi Breaking news live updates- भारतीय क्रिकेटविश्वात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला अवैध ऑनलाइन सट्टेबाजी अॅपप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, आज (बुधवार) रैना या प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर होऊ शकतो. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रैनाचा जबाब मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत नोंदवला जाण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर क्रिकेटविश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
13 Aug 2025 06:59 PM (IST)
मुंबई हायकोर्टाने आजची सुनावणी झाल्यावर कबुतरांना अन्न, पाणी देण्यासाठी तूर्तास बंदी कायम ठेवली आहे. मुंबई हायकोर्टात ४ आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे जैन समाज आता काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान आता या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
13 Aug 2025 06:41 PM (IST)
America News Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्या एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. टॅरिफच्या आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना (Illegal Immirgration) देशातून हाकलण्याच्या त्यांच्या निर्णयाने तर संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. याचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक भारतीय स्थलांतरित आहे.
13 Aug 2025 06:21 PM (IST)
ONGC Q1 Results Marathi News: सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने बुधवारी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले आहे की जून तिमाहीत तिचा नफा १० टक्क्यांनी कमी झाला आहे. कमी तेलाच्या किमती आणि जुन्या तेल क्षेत्रांमधून मंदावलेले उत्पादन यामुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे.
13 Aug 2025 06:08 PM (IST)
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
13 Aug 2025 05:49 PM (IST)
जम्मू काश्मीर: पाकिस्तान मधून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर जोरदार गोळीबार सुरू केला. हा गोळीबार सीमेच्या आत मध्ये घुसण्यासाठी होता. दरम्यान या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पुरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देखील, सीमेशेजारील शत्रुराष्ट्र सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.
13 Aug 2025 05:15 PM (IST)
कांदा खरेदीतील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसने आज जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे थोरात यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी काँग्रेसने शासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
13 Aug 2025 05:05 PM (IST)
मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचे समाजाला आवाहन केले आहे. सध्या ते मराठवाड्यात संवाद दौरा करत आहेत. आंदोलनाच्या काळात राज्यात दंगल भडकवण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. मला याची कुणकुण लागल्याचे त्यांनी सांगितले. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.
13 Aug 2025 04:55 PM (IST)
राज्यात एकीकडे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार यावरून देखील नाराजीनाट्य रंगल्याच्या चर्चा आहे. अशातच राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होतं. तर मंत्री भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं. मात्र त्यासाठी मंत्री भुजबळांनी नकारघंटा लावण्याने त्यांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत. तसे शासनाकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आले आहे
13 Aug 2025 04:45 PM (IST)
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील सरूळ शिवारात यशोदा नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा – राळेगाव मार्गाची वाहतूक प्रभावित झाली आहे.
13 Aug 2025 04:43 PM (IST)
मुंबई: दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. महापालिकेने या ठिकाणी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी केली होती. त्यानंतर या ठिकाणी मोठे आंदोलन जैन समाजाकडून करण्यात आले होते. मात्र आज मुंबई हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. मुंबई हायकोर्टाने तूर्तास तरी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम ठेवली आहे. सार्वजनिक आरोग्य महत्वाचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
13 Aug 2025 04:37 PM (IST)
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.
13 Aug 2025 03:45 PM (IST)
हटके स्टाईलसाठी चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ असणारा मराठी स्टार गश्मीर महाजनी सध्या फार चर्चेत येत आहे. अभिनेता तसा त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांशी नेहमी संपर्कात असतो. दरम्यान, त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘Ask Me Question’ या इंस्टाग्राम फीचर्सचा लाभ घेतला आहे. या फीचर्सचा लाभ घेत त्याच्या चाहते मंडळींनी अभिनेत्याला डायरेक्ट प्रश्न केले आहेत आणि अभिनेत्याने त्याचे उत्तरं चाहत्यांना दिली आहेत. दरम्यान, या सर्व प्रश्नांमध्ये असणाऱ्या एका प्रश्नाने संपूर्ण मराठी सिनेचाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. तो प्रश्न असा होता की,”गश्मीर तुझी मराठी सिनेसृष्टीतील क्रश कोणती?” तेव्हा गश्मीरने चाहत्याच्या या स्पेशल प्रश्नाला उत्तर दिले आहे. गश्मीर महाजनी म्हणतो की,” अभिनेत्री अश्विनी भावे त्याच्या क्रश आहेत.” हे ऐकून बऱ्याच चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला असला तरी असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारले गेले आहेत.
13 Aug 2025 03:36 PM (IST)
पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
13 Aug 2025 03:32 PM (IST)
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज, १३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून कुस्तीगीर सुशील कुमारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ज्युनियर कुस्ती चॅम्पियन सागर धनखरच्या हत्ये प्रकरणातील सुशील कुमार हा मुख्य आरोपी आहे. ४ मार्च रोजी न्यायमूर्ती संजय करोल आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने सुशील कुमारला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
13 Aug 2025 03:00 PM (IST)
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन जणांनी बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या मारहाणीचे मूळ कारण अद्याप समोर आले नाही आहे. मारहाण झालेल्या सरपंचाचे नाव प्रदीप फुके आहे. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून गावी जात होते. वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. त्याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला आणि या वादादरम्यान सरपंच फुके यांना २ व्यक्तींनी मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. घटनेनंतर सरपंच फुके यांनी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
13 Aug 2025 02:51 PM (IST)
एक मोठी खळबजनक माहिती समोर आलेली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Joung Un) यांच्याशी संपर्क केला. दोन्ही नेत्यांनी फोनवरुन संवाद साधला. यावेळी रशिया आणि उत्तर कोरियामधील संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. तसेच युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धावरही चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा अशा वेळी झाली आहे, जेव्हा पुतिन दोन दिवसांनी अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यामुळे हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
13 Aug 2025 02:41 PM (IST)
PAK vs WI: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेचा समारोप झाला आहे. या दोन संघात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर एकतर्फी २०२ धावांनी विजय मिळवला आहे. हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा पराभव मनाला जात आहे. दुसरीकडे, हा विजय वेस्ट इंडिज संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. या सामन्यात कॅरेबियन शाई होपने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आहे.
13 Aug 2025 02:39 PM (IST)
Anurag Thakur on Raebareli Voter Fraud : नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये मतचोरी हा मुद्दा जोरदार चर्चेत आणला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये मतदारांची यादीतून नावे वगळणे, मेलेल्यांकडून मतदान झाल्याचे दाखवणे आणि तसेच एका व्यक्तीची वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान केले असल्याचे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले आहे. यावर आता भाजपने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींच्या मतदारसंघामध्ये घोटाळा झाला असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
13 Aug 2025 02:33 PM (IST)
Rain Marathi News: देशभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे.राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज दिल्लीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. पर्वतीय राज्यांमध्ये म्हणजे खास करून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज हवामान विभागाने कोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात.
13 Aug 2025 02:33 PM (IST)
सिडको : इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी चुंचाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. युवराज मंगल मगरे (१३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, औद्योगिक वसाहत, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
13 Aug 2025 02:18 PM (IST)
Delhi Airport Marathi News: स्वातंत्र्यदिनी, दिल्ली विमानतळावरून नॉन-शेड्यूल्ड विमानांना बंदी घालण्यात येईल. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १० आणि त्यानंतर दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत, अशा विमानांना उड्डाण किंवा उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हे निर्बंध चार्टर्ड विमाने आणि शेड्यूल्ड विमान कंपन्यांच्या विशेष उड्डाणांना लागू असतील.
13 Aug 2025 02:17 PM (IST)
बँक ऑफ महाराष्ट्र, देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पुणे येथे मुख्यालय असलेली आणि देशभरात 2,600 हून अधिक शाखांचे जाळे असलेली, जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) भरती 2025 जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 500 कायमस्वरूपी रिक्त पदे भरली जाणार आहेत. शाखा संचालन आणि व्यवसाय विकास क्षेत्रातील नेतृत्वाची संधी इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
13 Aug 2025 02:17 PM (IST)
दहीहंडी हा दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात साजरा करण्यात येणारा सण आहे. या सणाला गोकुळाष्टमी नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कृत्यांची आठवण करून देतात आणि त्यांच्याप्रमाणेच मडकी फोडून हा सण साजरा करतात. यावर्षी दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सण म्हणजे एक खेळ नाही, परंपरा नाही तर या सणाला लोकांमध्ये एकता, कठोर परिश्रम आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. जाणून घेऊया दहीहंडीची सुरुवात कशी झाली आणि या सणामागील इतिहास आणि महत्त्व काय आहे, जाणून घ्या
13 Aug 2025 02:16 PM (IST)
मूत्रपिंड अर्थात किडनी हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव आहेत. ते रक्त स्वच्छ करण्याचे आणि शरीरातील पाणी, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्याचे काम करतात. मूत्रपिंड कमकुवत झाल्यास शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. म्हणून, मूत्रपिंड निरोगी ठेवणे महत्वाचे आहे.
13 Aug 2025 02:16 PM (IST)
अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील वडगाव रोठे येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वसंता बरिंगे यांच्या घराच्या बांधकामस्थळी मोठी दुर्घटना घडली आहे. सेंट्रिंगचे काम करत असताना १४ ते १५ तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यातून १७ वर्षीय अल्पवयीन कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ओमप्रकाश केशवराव जांभळे असे आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील वसाडी (ता. संग्रामपूर) येथील रहिवासी आहे. तो इतर मजुरांसोबत घराच्या स्लॅब टाकण्याच्या कामासाठी आला होता.
13 Aug 2025 02:15 PM (IST)
दिव्या खोसला आणि नील नितीन मुकेश यांच्या आगामी ‘एक चतुर नार’ या चित्रपटाचे शीर्षक आणि पहिला लूक आज प्रदर्शित झाला आहे. शीर्षक आणि मोशन पोस्टरवरून हा चित्रपट एक विनोदी-नाटक असल्याचे दिसते आहे. चित्रपटाचा पहिला लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार आहे.
13 Aug 2025 02:00 PM (IST)
छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आला आहे. यात कर्जबाजारी प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने आपल्या आईचे दागिने दिल्याचे समोर आले आहे. आईचे ११ तोळे दागिने आणि एक लाख ५५ हजाराची रोकडही दिली. कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. परिणामी प्रेमात बुडालेल्या प्रेयसीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगेश विलास आणि १९ वर्षीय तरुणी असे आहे. मंगेशचा मित्र कुणाल केरकरला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
13 Aug 2025 01:50 PM (IST)
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा विडा खाल्यानंतर शरीराला आणि मनाला वेदना झाल्याचं पीडित व्यक्तीने सांगितले आहे.या अघोरी प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोना प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादू टोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे.
13 Aug 2025 01:40 PM (IST)
वसईमधून एक अशी चोरीची घटना समोर येत आहे जी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. मात्र वसई- विरार पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे ही उच्चशिक्षित महिला चोर अवघ्या १२ तासात पकडली गेली आहे. आरोपीचे नाव ज्योती भानुशाली (27 वर्ष) असून, ती उच्चशिक्षित असून बँकेत नोकरी करते.
13 Aug 2025 01:30 PM (IST)
अमरावतीत अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे अनेक कारवाईतून स्पष्ट झाले आहे. त्यातच आता शिरखेड पोलिसांनी धामणगाव येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कौशल्यपूर्ण कारवाई करत एकूण १ लाख ५४ हजार ९५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, पोलिसांनी या धाडीसाठी भजनी मंडळाचा वेश परिधान करून गावात प्रवेश केला. ही कारवाई सोमवारी (दि. ११) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
13 Aug 2025 01:20 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदाराच्या पुतण्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पुतण्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव दीपेश राजू तनवाणी असे आहे.
13 Aug 2025 01:10 PM (IST)
कोपरगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात 8 ऑगस्ट रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच कोडं अखेर उलगडलंय. महिलेच्या पतीनेच तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळल्याची पोलीस तपासात उघड झाला आहे. मृत महिलेचं नाव वनिता उर्फ वर्षा मोहिते असे आहे. तर आरोपीचे नाव संजय हिरामण मोहिते असे आहे. न्यायालयीन दावे सुरु असतांना वारंवार येणाऱ्या वारंटमुळे पतीनेच पत्नीचा कट रचून काटा काढल्याचा पोलीस तपासात उघड झाला आहे.
13 Aug 2025 12:53 PM (IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतील आय लव यू म्हणाल्याचे रागातून हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीत 12 ऑगस्ट (मंगळवार) रोजी रात्री 8.30 वाजता घडली आहे. साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय 35) अशी हत्या झालेल्या व्यक्तीने नाव आहे. तर सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21) आणि समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22) अशी आरोपींची नवे आहेत. आरोपींला अटक करण्यात आली आहे.
13 Aug 2025 12:29 PM (IST)
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडी कार्यालयात पोहोचले. गेमिंग अॅप प्रमोशन प्रकरणात ईडीने त्यांना समन्स पाठवले होते. आता या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे.
13 Aug 2025 12:17 PM (IST)
दादर येथील कबुतरखाना बंद करावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितेने आज आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आता पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू आहे.
13 Aug 2025 11:55 AM (IST)
“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलय का?स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज्य हे काय नवीन थोतांड आहे. या थोतांडाचे जनक कोण आहे? महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले की, मावळे काय वरणभात, तूप खाऊन लढत होते का? ते मांसाहार करत होते. बाजीराव पेशवे मांसाहार करायचे त्या शिवाय युद्धावर लढता येत नाही. सीमेवर सैन्याला मांसाहार करावा लागतो, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
13 Aug 2025 11:45 AM (IST)
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर त्यांनी तिरंगा फडकवला आहे. हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत अमित शाह यांनी सपत्नीक झेंडा फडकवला. लवकरच 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.
13 Aug 2025 11:35 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखेपाटील हे देखील सहभागी झाले आहेत.
13 Aug 2025 11:25 AM (IST)
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पडणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यामुळे आव्हाड हे थेट मंदिरामध्ये उपस्थित राहिले. जितेंद्र आव्हाड यांची तुळजा भवानी मंदिराच्या सुरक्षा रक्षकासोबत बाचाबाची झाली असल्याचे देखील समोर आले आहे.
13 Aug 2025 11:18 AM (IST)
राज्यातील महायुतीचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात असल्यचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, त्यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
13 Aug 2025 10:59 AM (IST)
डॉ. शर्मा पुढे म्हणतात, ‘आयुर्वेदात दात आणि हिरड्या स्वच्छ करण्यासाठी अनेक सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धती सांगितल्या आहेत, ज्या हानीशिवाय परिणाम दर्शवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही योग्य रेसिपीचे पालन केले तर पायोरिया आणि तोंडातून दुर्गंधी येणे यासारख्या समस्या मुळापासून दूर करता येतात.’ यासाठी डॉक्टरांनी एक खास रेसिपीदेखील शेअर केली आहे. १० ग्रॅम लवंग, २० ग्रॅम हळद, ३० ग्रॅम तमालपत्र, ४० ग्रॅम खडे मीठ... या चार गोष्टी एकत्र करून बारीक बारीक करा आणि तयार पावडर हवाबंद डब्यात ठेवा. डॉक्टर दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा चमचा या पावडरला थोडेसे मोहरीच्या तेलात मिसळून दात घासण्याचा सल्ला देतात
13 Aug 2025 10:55 AM (IST)
वसईमधून एक अशी चोरीची घटना समोर येत आहे जी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल. एका उच्चशिक्षित तरुणीने आपल्याच बहिणीच्या सासरच्या घरी दीड कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. मात्र वसई- विरार पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे ही उच्चशिक्षित महिला चोर अवघ्या १२ तासात पकडली गेली आहे. आरोपीचे नाव ज्योती भानुशाली (27 वर्ष) असून, ती उच्चशिक्षित असून बँकेत नोकरी करते.
13 Aug 2025 10:50 AM (IST)
तिरंगा कुल्फी हा असा एक डेसर्ट आहे ज्यात आपल्या राष्ट्रध्वजाचे तीन रंग – केशरी, पांढरा आणि हिरवा – सुंदरपणे दिसतात. केशरी रंग गाजर किंवा केशराने, पांढरा रंग दूध-खवा याने आणि हिरवा रंग पिस्ता किंवा पान फ्लेवरने तयार केला जातो. थंडगार, चविष्ट आणि देशभक्तीची आठवण करून देणारी ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
13 Aug 2025 10:45 AM (IST)
13 Aug 2025 10:40 AM (IST)
रेड बॉल स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ वर्षीय आयुष म्हात्रेला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले आहे. संघात सरफराज खान, हार्दिक तामोर, आकाश पार्कर आणि रॉयस्टन डायससारखे अनुभवी खेळाडू आहेत. यानंतरही आयुषला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. १८ वर्षीय आयुष म्हात्रेची मुंबई क्रिकेटमध्ये चांगल्या खेळामुळे झपाट्याने वाढत आहे. गेल्या IPL हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करताना त्याने सर्वांना प्रभावित केले होते आणि त्याची घोडदौड चालू आहे. विरारचा हा मुलगा सर्वांचे मन जिंकताना दिसून येत आहे.
13 Aug 2025 10:35 AM (IST)
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातून एक जादूटोण्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेला नागोळीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा विडा खाल्यानंतर शरीराला आणि मनाला वेदना झाल्याचं पीडित व्यक्तीने सांगितले आहे.या अघोरी प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादूटोना प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादू टोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे.
13 Aug 2025 10:30 AM (IST)
दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेत स्वतःच्या नागरिकांवर कारवाई करण्याची कुप्रसिद्ध परंपरा असलेल्या पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा प्रांताला रणांगण बनवले आहे. बाजौर जिल्ह्यातील लोई मामुंड आणि वार मामुंड तहसीलमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू झाली आहे. या ऑपरेशनमुळे ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी घर सोडले असून, सुमारे ४ लाख लोक कठोर कर्फ्यूमुळे घरातच अडकले आहेत.
13 Aug 2025 10:25 AM (IST)
व्हिडिओमध्ये एक मुलगी सिंहाला छेडताना दिसून येत आहे. जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहासोबत पंगा घेणं खरंतर फार महागात पडू शकतं आणि असंच काहीस मुलीसोबतही घडून आल्याचं व्हिडिओत दिसून आलं. सिंहाला छेडताच त्याने मुलीसोबत असं काही केलं की पाहून सर्वांचाच थरकाप उडाला. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या.
13 Aug 2025 10:20 AM (IST)
Mumbai News: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनाच्या आवारात महिनाभरापूर्वी दोन गटांमध्ये राडा झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आणखी चार जणांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली होती.
13 Aug 2025 10:15 AM (IST)
India-US Relations : भारत-अमेरिका संबंध नव्या वळणावर उभे आहेत. अमेरिकेच्या करवाढीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये न्यू यॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यात त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होऊ शकते.