Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

Marathi breaking live marathi- मुंबईतील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक भागात रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले असून, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 16, 2025 | 06:32 PM
Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates- दहीहंडीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबईसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सरासरी अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. सायन आणि दादर परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्यांची गती मंदावली असून, प्रवाशांना स्थानकांवर तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

The liveblog has ended.
  • 16 Aug 2025 06:03 PM (IST)

    16 Aug 2025 06:03 PM (IST)

    दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

    मुंबईमध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. दहीहंडीची दोरी बांधत असताना तोल गेल्याने एक गोविंदा खाली पडला. दरम्यान तातडीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. ही घटना मानखुर्द येथे घडल्याचे समोर आले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी साजरी करताना अनेक गोंविदा जखमी झाल्याचे समजते आहे. त्यांना उपचारांसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 16 Aug 2025 05:46 PM (IST)

    16 Aug 2025 05:46 PM (IST)

    नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम

    नीरज चोप्राचा सद्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची पत्नी हिमानीने टेनिस कारकिर्दीला राम राम ठोकला आहे. तिच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. हिमानीने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. हिमानीची महिला एकेरीत ४२ व्या तर दुहेरीत २७ व्या स्थानावर विराजमान आहे. कमी कालावधीत टेनिसमध्ये चांगली कामगिरी करून देखील तिने या खेळापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हिमानीच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीला १.५ कोटी रुपयांची नोकरीची ऑफर देण्यात आली होती. परंतु तिने त्या ऑफरला नकार दिला आहे.

  • 16 Aug 2025 05:27 PM (IST)

    16 Aug 2025 05:27 PM (IST)

    Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

    मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे आज लातुरात असून, मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच ते समाज बांधवांच्या गाठीभेटी घेत आहेत. यादरम्यान दुपारच्या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लातूर येथे येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या भावना आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांच्यापर्यंत पोहोचविणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

  • 16 Aug 2025 05:11 PM (IST)

    16 Aug 2025 05:11 PM (IST)

    कंत्राटी कामगार चेंबरमध्ये गुदमरले, श्वास कोंडला अन्…; पुण्यातील घटनेनं हळहळ व्यक्त

    देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, तिरंग्यांची पताका आणि देशभक्तीची गाणी सुरू असतानाच निगडी प्राधिकरणात दुर्दैवी घटना घडली आहे. बीएसएनएलच्या इन्स्पेक्शन चेंबरमध्ये ऑप्टिकल फायबरचे काम करताना गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात आणि त्यांच्या कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवार (दि. १५) रोजी दुपारी सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ६५ समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बीएसएनएलच्या चेंबरमध्ये घडली आहे.

  • 16 Aug 2025 05:00 PM (IST)

    16 Aug 2025 05:00 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक

    शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झालेतं..15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतीच्या बांधावर तिरंगा झेंडा फडकावून शेतकऱ्यांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलयं..ज्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच असा संदेश सरकारला देण्यात आलायं..तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात..हे अभिनव आंदोलन आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तान करण्यात आलं.

  • 16 Aug 2025 04:50 PM (IST)

    16 Aug 2025 04:50 PM (IST)

    मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन

    लातूर तालुक्यातील मुरुड या एक लाख लोकसंख्येच्या गावात रेल्वे थांबत नसल्यामुळे मुरूड सह २० ते २५ गावातील नागरिकांनी आंदोलन केलं. आज स्वातंत्र्यदिनी जुन्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर तिरंगा फडकावून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलं. मुरुड गावातून दिवसाकाठी 19 रेल्वे गाड्यांचे ये जा होते. मात्र गावात रेल्वे थांबत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना मुरुड वासियांना करावा लागतो. त्यामुळे आज मुरुड रेल्वे थांबा कृती समितीच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने रेल रोको आंदोलन होऊ शकला नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या बाहेर तिरंगा ध्वज फडकावून रेल्वे प्रशासनाने लातूर मुंबई आणि हरंगुळ हडपसर पुणे या दोन रेल्वे गाड्या तातडीने थांबवण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

  • 16 Aug 2025 04:45 PM (IST)

    16 Aug 2025 04:45 PM (IST)

    परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    परभणी शहरातील खाटीक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने तात्काळ नूतनीकरण करून देण्यात यावे परभणी शहरातील धारोड वरील महानगरपालिकेचा कत्तलखाना अद्यावत करून द्यावा तसेच सदरील कत्तलखान्यात सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात. तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या ककत्तलखानाच्या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करून त्या अधिकाऱ्यांमार्फत जनावरांची तपासणी करण्यात यावी. कत्तल केल्यानंतर जनावरांचे मांस विकण्यासाठी नवीन शहरात दोन ठिकाणी मार्केट बांधून द्यावे बेकायदेशीर व असंवैधानिक गोरक्षकांच्या अन्याय व अत्याचारापासून कुरेशी समाजाचे रक्षण करावे संपूर्ण परभणी जिल्ह्यातील गोशाळांचे लेखापरीक्षण करून त्यांची तपासणी करण्यात यावी तसेच कुरेशी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुरेशी बिरादरीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

  • 16 Aug 2025 04:40 PM (IST)

    16 Aug 2025 04:40 PM (IST)

    Badalapur : ईडी कारवाईचा वसई- विरार फॉर्मुला बदलापुरात वापरणार- कथोरे

    बदलापूर नगरपालिकेच्या वार्डरचनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आर्थिक देवाणघेवाण करून मनाप्रमाणे वार्ड रचना केल्याचा दावा करत त्यांनी थेट प्रशासकांवर निशाणा साधला. प्रशासकांची मनमानी सहन केली जाणार नाही, त्यांच्या कारभाराची चौकशी ईडीमार्फत व्हावी लागेल, असा इशारा देत कथोरेंनी १८ तारखेला ठोस पुरावे सादर करण्याची घोषणा केली.

  • 16 Aug 2025 04:30 PM (IST)

    16 Aug 2025 04:30 PM (IST)

    तिलारीमध्ये अमुझमेंट पार्क होणार: आमदार दीपक केसरकर

    सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाणबुडी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे या आठवड्यात बैठक घेणार आहेत. पाटबंधारे विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांची सुद्धा मी भेट घेतली आहे. तसेच तिलारी येथे होणारे अम्युझ्मेंट पार्क हे भव्य दिव्य व्हावे अशी त्यांची इच्छा आहे या संदर्भात आपले खासदार नारायण राणे यांनी सुद्धा हे अम्युझ्मेंट
    पार्क व्हावे यासाठी लक्ष घातला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होईल. तसेच पाणबुडी प्रकल्प हा सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा होईल. आंबोली येथील जमिनीचा वाटप प्रश्न सुटला की तिथे सुद्धा अनेक प्रकल्प होणार आहेत, असं सांगितलं गेलं आहे.

  • 16 Aug 2025 04:25 PM (IST)

    16 Aug 2025 04:25 PM (IST)

    रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस

    मुसळधार पावसामुळे नवली पासून पालघर शहराला जोडणारा भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून योग्य नालेसफाई व पाणी उपसण्याची व्यवस्था न केल्याने प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.नागरिकांचा आरोप आहे की, "भुयारी मार्ग सुरू होऊन काही महिन्यांतच दर पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवते, तरीदेखील रेल्वे प्रशासन डोळेझाक करत आहे." यामुळे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

  • 16 Aug 2025 04:20 PM (IST)

    16 Aug 2025 04:20 PM (IST)

    पालघर ग्रामीण भागात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष

    ग्रामीण भागात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. डहाणू तालुक्यातील उर्से गावात ‘एक गाव एक उत्सव’ या संकल्पनेतून दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला.गेल्या पन्नास वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली ही परंपरा यंदाही गावकऱ्यांच्या एकोप्याने पुढे नेली गेली. गावकऱ्यांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करताना भक्तीभाव, आनंद आणि मैत्रीचे दर्शन घडवले.या उत्सवाच्या माध्यमातून उर्से गावाने पुन्हा एकदा गावातील ऐक्य, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपला आहे.

  • 16 Aug 2025 04:15 PM (IST)

    16 Aug 2025 04:15 PM (IST)

    खालापूरमध्ये विद्युत वाहिनी अंगावर पडून महिलेचा मृत्यू, परिसरात संताप

    खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत चौक क्षेत्रातील जांभिवली या गावात चालू विद्युत वाहिनी तुटून एका वयोवृद्ध महिलेने आपला जीव गमावला आहे. जुनाट जीर्ण झाल्याला विद्युत वाहिनी जोरदार वारा आणि पाऊस यामुळे तुटतात, याची वारंवार तक्रार या परिसरातील जागरूक नागरिक यांनी करून देखील वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली.पहाटे गावातील एक वृद्ध महिला सुलोचना दत्तात्रेय गावडे वय वर्ष ६३ या घराच्या मागील बाजूस असलेल्या प्रसाधन गृहाकडे प्रार्थविधीसाठी जात असताना अचानक त्यांच्या अंगावर विद्युत प्रवाह सुरू असलेली विद्युत वाहिनी तुटून पडली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  • 16 Aug 2025 04:10 PM (IST)

    16 Aug 2025 04:10 PM (IST)

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, चिंचणी आणि वाणगाव परिसरात जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दरम्यान, तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साचले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.हवामान खात्याने पुढील काही तासांमध्येही जोरदार पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • 16 Aug 2025 03:44 PM (IST)

    16 Aug 2025 03:44 PM (IST)

    Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

    Heavy Rain in Kokan: आज सर्वत्र दहीहंडी आणि गोकुळाष्टमीचा उत्साह आहे. सर्वात अत्यंत उत्साहात दहीहंडी साजरी केली जात आहे. दरम्यान याच मुहूर्तावर वरुणराजाने देखील हजेरी लावली आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

  • 16 Aug 2025 03:35 PM (IST)

    16 Aug 2025 03:35 PM (IST)

    Vice President Elections: उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; ‘या’ नावांवर होणार चर्चा

    NDA Meeting: भारतीय जनता पक्षाने उद्या (१७ ऑगस्ट) रोजी त्यांच्या संसदीय मंडळाची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भाजपच्या सर्वोच्च संघटनात्मक संस्थेने, संसदीय मंडळाने ही बैठक बोलावली असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

  • 16 Aug 2025 03:25 PM (IST)

    16 Aug 2025 03:25 PM (IST)

    Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

    पुणे : पुण्यात महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चालला आहे. आता देखील ९ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातून २४ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे.

    बातमीची तपशील वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

  • 16 Aug 2025 03:06 PM (IST)

    16 Aug 2025 03:06 PM (IST)

    कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण

    Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ (The Bengal Files) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवरून कोलकातामध्ये (Kolkata) बराच गोंधळ झाला. ट्रेलर लाँचचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त करत थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.

    बातमीचा तपशील वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 16 Aug 2025 02:19 PM (IST)

    16 Aug 2025 02:19 PM (IST)

    Monsoon Alert: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर पावसाचा जोर वाढला: उत्तराखंडमध्ये तर…; चिपळूणमध्ये पाणी भरण्याची शक्यता

    IMD Rain Alert India: गेले दोन ते तीन दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये अत्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. संपूर्ण भारतात मुसळधार पाऊस आहे. सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. उत्तराखंड, महाराष्ट्र, दक्षिण भारत अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. आज भारतीय हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट दिला आहे ते जाणून घेऊयात.

  • 16 Aug 2025 01:55 PM (IST)

    16 Aug 2025 01:55 PM (IST)

    माझ्या मतदारसंघात १३ हजार दुप्पट मते…; बच्चू कडूंचा निशाणा

    निवडणुका लढवाव्यात ती नाही हा विचार माझ्या मनात आहे. मला वाटतं मतदान केंद्रांची काही गरजच नाही, थेट भाजपच्या कार्यालयात मतपेट्या ठेवून भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मतदान करून त्यांनीच नगरसेवक निवडून आणावेत. निवडणुकीचा खर्च तरी कशासाठी करायचा. माझ्या मतदारसंघात १३ हजार नावे दुप्पट आढळली आहेत. लोकशाहीचे पतन सुरू आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देणार आहोत,” अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

  • 16 Aug 2025 01:50 PM (IST)

    16 Aug 2025 01:50 PM (IST)

    30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ!

    भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये काही दिवसांमध्ये एकदिवसीय विश्वचषक 2025 चा महासंग्राम सुरु होणार आहे. भारताच्या संघासाठी हा विश्वचषक फार महत्वाचा असणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीवर यावेळी विशेष लक्ष भारतीय क्रिकेट चाहत्यांचे असणार आहे. भारतीय महिला संघाने मागील काही महिन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्यामुळे या विश्वचषकामध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. भारतामध्ये या विश्वचषक होणार आहे त्यामुळे भारतीय समर्थक मैदानावर जास्त पहायला मिळणार आहेत. महिला क्रिकेट आता पुढची मोठी झेप घेण्यास सज्ज आहे.

  • 16 Aug 2025 01:40 PM (IST)

    16 Aug 2025 01:40 PM (IST)

    पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्षांनी संघटनबांधणीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत देत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.

  • 16 Aug 2025 01:35 PM (IST)

    16 Aug 2025 01:35 PM (IST)

    कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

    सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजीच्या अब्दुललाट शाखेतील बोगस कर्ज प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ सचिन मेथे व त्यांची पत्नी संगीता मेथे यांनी १५ ऑगस्ट रोजी कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दाम्पत्याने पोलिस ठाण्यासमोर डिझेल ओतून घेऊन स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस व तक्रारदार यांच्यात झटापटही झाली.

  • 16 Aug 2025 01:25 PM (IST)

    16 Aug 2025 01:25 PM (IST)

    एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी पण..

    “एकनाथ शिंदे यांनाही लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, ज्यांना ती लागलेली आहे, त्यांनीती योग्यरित्या टिकवली पाहिजे, असा शब्दांत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पालघरमधील दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. पण या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद सुरूच असल्याचे दिसत आहे.

  • 16 Aug 2025 01:15 PM (IST)

    16 Aug 2025 01:15 PM (IST)

    युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल?

    जगात पुन्हा एकदा अण्वस्त्रांच्या सावटाचे गडद ढग जमू लागले आहेत. तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढत असल्याच्या भीतीने पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमधील लाखो नागरिक आजपासूनच युद्ध, अणुहल्ला किंवा मोठ्या आपत्तींसाठी तयारी करत असल्याचे वृत्त Daily Mail आणि New York Post ने दिले आहे. युद्धाचे ढग अजून फक्त आकाशात आहेत, पण लोक मात्र जमिनीखाली उतरत आहेत. ब्रिटनमधील अनेक लोक आपल्या घरांच्या तळघरात बंकर उभारू लागले आहेत. या बंकरमध्ये पाणी, औषधे आणि कॅन केलेले अन्नसाठे ठेवले जात आहेत. सर्वाधिक मागणी आहे ती २५ वर्ष टिकणाऱ्या मांसाच्या कॅनची. काही नामवंत व्यक्तिमत्त्वे देखील या गुप्त तयारीत सामील झाल्याचे वृत्त आहे.

  • 16 Aug 2025 01:05 PM (IST)

    16 Aug 2025 01:05 PM (IST)

    शरद पवार आज पुण्यात, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

    जेष्ठ नेते शरद पवार पुण्यात असून त्यांनी सकाळपासून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. साखर संकुलातील भेटीनंतर ते दुपारी 3 वाजता किशोर पवार यांच्या स्मृतीदीन कार्यक्रमासाठी एस एम जोशी सभागृहात उपस्थितीत राहणार आहेत. तर तर सायंकाळी 5 वाजता काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे उपस्थितीत राहणार आहेत.

  • 16 Aug 2025 01:04 PM (IST)

    16 Aug 2025 01:04 PM (IST)

    ’परम सुंदरी’मधील जान्हवी कपूरचे मल्याळी ऐकून भडकली अभिनेत्री

    ‘परम सुंदरी’ या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सिद्धार्थ मल्होत्राच्या सोबत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये दोन्ही स्टार्स हलक्याफुलक्या रोमान्ससह विनोदाचा तडका लावताना दिसत आहेत. आता मल्याळम चित्रपट अभिनेत्री पवित्रा मेनन हिने ‘परम सुंदरी’ मध्ये जान्हवी कपूरच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ती म्हणते की एका मल्याळी अभिनेत्रीला चित्रपटात का कास्ट केले नाही?

  • 16 Aug 2025 12:55 PM (IST)

    16 Aug 2025 12:55 PM (IST)

    प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हंडीचे पूजन

    डोंबिवली शहरातील बाजी प्रभू चौकात ‘डोंबिवलीचा मानबिंदू २०२५’ या नावाने भाजपच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन… ​भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या ‘मनाची हंडी’चे पूजन करण्यात आले… सकाळपासूनच शेकडो गोविंदा पथकांनी या उत्सवाला हजेरी लावली आहे, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. चव्हाण यांनी दहीहंडीसोबतच या उत्सवासाठी उभारलेल्या रंगमंचाचेही पूजन केले. या दहीहंडीला भाजपची ‘मनाची हंडी’ असे संबोधले जात असल्याने, या उत्सवाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • 16 Aug 2025 12:44 PM (IST)

    16 Aug 2025 12:44 PM (IST)

    संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

    “बिर्याणी खाऊन माध्यमातून दाखवले आणि इम्तियाज जलील यांनी आम्हाला डीवचण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही ते आहोत ज्यांनी, याच जमिनीत औरंगजेब गाडला आहे” संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल.

  • 16 Aug 2025 12:35 PM (IST)

    16 Aug 2025 12:35 PM (IST)

    नंदूरबारमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. वळवी यांचे मी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. लवकरच नंदूरबार येथे मोठा कार्यक्रम करून त्यांच्या सहकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

  • 16 Aug 2025 12:25 PM (IST)

    16 Aug 2025 12:25 PM (IST)

    नाशिकध्ये मनसेचा राडा परप्रांतीयांना दिला चोप

    तीन दिवसांपूर्वी घडली घटना पंचवटी परिसरातील घटना… परप्रांतीय युवक अर्ध नग्न अवस्थेत फिरतात, महिलांची छेड काढत असल्याचे आरोप… गांजाचे सेवन करतात, स्थानिक मराठी नागरिकांवर दादागीरी करतात असा आरोप करत मारहाण केल्याची माहिती… पोलिसांत तक्रार नाही आपापसात वाद मिटवल्याने गुन्हा दाखल नाही…

  • 16 Aug 2025 12:11 PM (IST)

    16 Aug 2025 12:11 PM (IST)

    मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला

    आज राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव दिसून येत आहे. मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 16 Aug 2025 12:05 PM (IST)

    16 Aug 2025 12:05 PM (IST)

    मुंबई परिसरात पावसाची संततधार सुरूच

    रात्री पासून सुरू असणाऱ्या पावसाने रात्री अंधेरी सबवे मध्ये पाणी साचले होते मात्र आता सकाळ च्या वेळेत सबवेतील पाणी हे ओसरले आहे.

  • 16 Aug 2025 11:55 AM (IST)

    16 Aug 2025 11:55 AM (IST)

    धाराशिवमध्ये पावसामुळे मांजरा नदीला पूर

    पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान , सोयाबीन पिकाला मोठा फटका… मांजरा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध लागला नाही, रेस्क्यू सुरूच… पुराच्या पाण्यात दगावलेली जनावर, शेतीचा नुकसान सर्व गोष्टींच्या पंचनाम्याच्या सूचना

  • 16 Aug 2025 11:45 AM (IST)

    16 Aug 2025 11:45 AM (IST)

    हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया - केशव उपाध्य

    मुंबईच्या समुद्धीने कलानगरचा रस्ता कधी ओलांडलाच नाही. केवळ हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना टोला.

  • 16 Aug 2025 11:41 AM (IST)

    16 Aug 2025 11:41 AM (IST)

    War 2 चा ऐतिहासिक रेकॉर्ड

    हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या ‘War 2’ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त केवळ मोठी झेप घेतली नाही तर १५ ऑगस्ट रोजी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपटही बनला आहे. आता किती कमाई होणार ठरणार उत्सुकतेचे, वाचा वृत्त 

  • 16 Aug 2025 11:40 AM (IST)

    16 Aug 2025 11:40 AM (IST)

    ट्रम्पने अलास्कामध्ये पुतिनचे केले ‘असे’ स्वागत

    अँकोरेज येथील जॉइंट बेस एल्मेंडोर्फ-रिचर्डसन येथे हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला. पुतिन विमानातून उतरताच रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत करण्यात आले. ट्रम्प स्वतः स्वागतासाठी उपस्थित होते. दोन्ही नेते उबदार हस्तांदोलन करत काही क्षण स्मितहास्य करत राहिले. या स्वागत सोहळ्याने आंतरराष्ट्रीय मंचावर लक्ष वेधले. वाचा सविस्तर 

  • 16 Aug 2025 11:30 AM (IST)

    16 Aug 2025 11:30 AM (IST)

    Asia Cup 2025 आधी संजू सॅमसनने केला हाहाकार!

    आशिया कप २०२५ च्या आधी, एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे संजू सॅमसन. या विकेटकीपर फलंदाजाला संघात संधी मिळेल की नाही याबद्दल बरीच चर्चा आहे? आशिया कप २०२५ च्या आधी, संजू सॅमसनने शानदार अर्धशतकी खेळी खेळून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. तसे, आशिया कपमध्ये अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन सलामीला येताना दिसू शकतो अशीही बरीच चर्चा आहे. आता केरळ क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका खास सामन्यात चौकार आणि षटकार ठोकून संजूने धुमाकूळ घातला आहे.

  • 16 Aug 2025 10:40 AM (IST)

    16 Aug 2025 10:40 AM (IST)

    सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी!

    क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये त्याने त्याच्या कामगिरी आणि खेळीने ओळख निर्माण केली आहे. नुकताच त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने साखरपुडा केला होता अशी वृतांची माहिती होती. तर त्याची मुलगी सध्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये कमालीचे काम करत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही अनेकदा चर्चेचा विषय असते. आता तिने एक नवीन कंपनी सुरू केली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सारा वेगवेगळ्या प्रकारची कामे करते आणि आता तिने मुंबईत पिलेट्स अकादमी नावाच्या कंपनीची एक नवीन शाखा सुरू केली आहे.

  • 16 Aug 2025 10:29 AM (IST)

    16 Aug 2025 10:29 AM (IST)

    का काढलं कॉमेंट्री पॅनलमधून?

    लल्लंटॉपच्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या शोमध्ये इरफान पठाणला विचारण्यात आले की कोणाच्या टीकेमुळे त्याला कमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्यात आले? इरफान म्हणाला, पहा, माझा असा विश्वास आहे की कॉमेंट्री पॅनलचे काम म्हणजे दृश्यमान गोष्टींच्या पलीकडे, काय घडत आहे, ते का घडत आहे, ते का घडत आहे याच्या पलीकडे कथा सांगणे. सामन्याच्या वेळी किंवा खेळाडूंच्या निवडीवर काय होऊ शकते, काय घडण्याची शक्यता आहे, हे समालोचकाचे काम आहे. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल तर त्याची प्रशंसा करा. जर खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर त्याची टीका करा. समालोचकाची जबाबदारी खेळाडूची नाही तर चाहत्यांची आहे. बातमी सविस्तर वाचा

  • 16 Aug 2025 10:20 AM (IST)

    16 Aug 2025 10:20 AM (IST)

    विक्रोळीतील दरड कोसळली

    मुंबईतून एक मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळी (पश्चिम) येथील जनकल्याण सोसायटी, वर्षा नगर परिसरात शनिवारी पहाटे दरड कोसळली. डोंगराळ भागातील माती व दगड घसरून एका झोपडीवर कोसळले. या अपघतात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. तर आई आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून आई आणि मुलावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 16 Aug 2025 10:09 AM (IST)

    16 Aug 2025 10:09 AM (IST)

    अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

    अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला झाला आहे. अ‍ॅसिड हल्ला करणारे दोघे जण होते. आधी त्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवून मारहाण केली त्यानंतर त्याच्याकडील रोक रक्कम, मोबाईल आणि इतर वस्तू हिसकावून घेत अ‍ॅसिड फेकलं. अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणाचे नाव अमोल इसाळ आहे. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगावचा आहे. अमोलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

  • 16 Aug 2025 09:55 AM (IST)

    16 Aug 2025 09:55 AM (IST)

    ‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल?

    Hillary Clinton On Trump : अमेरिकेच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातील वैर कोणाला लपलेले नाही. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी क्लिंटन यांचा पराभव केला होता आणि त्यानंतरपासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा सुरू आहे. मात्र आता रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करण्याऐवजी एक धाडसी विधान केले आहे. क्लिंटन यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले की  “जर ट्रम्प यांनी कीवमधील एकही भूभाग न सोडता रशिया-युक्रेन युद्ध संपवले, जर ते पुतिनविरुद्ध खंबीरपणे उभे राहू शकले, तर मी त्यांना स्वतः नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करेन.”

  • 16 Aug 2025 09:50 AM (IST)

    16 Aug 2025 09:50 AM (IST)

    AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी

    16 ऑगस्ट रोजी आज संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमी साजरी केली जात आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत आहे. तुम्हाला देखील तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुगलवरून कोणतेही फोटो किंवा स्टिकर पॅक डाऊनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही स्मार्ट ChatGPT प्रॉम्प्ट्सचा वापर करून अगदी हटके आणि पर्सनलाइज्ड शुभेच्छांचे पोस्टर तयार करू शकता.

  • 16 Aug 2025 09:45 AM (IST)

    16 Aug 2025 09:45 AM (IST)

    पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’?

    Trump-Putin Alaska Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये झालेली ऐतिहासिक भेट जागतिक राजकारणाचे स्वरूप बदलवू शकते. वरकरणी ही चर्चा युक्रेन युद्ध आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाबद्दल असली तरी, पडद्यामागे एक महत्त्वाचा ‘घटक’ सतत हलता ठेवत होता तो म्हणजे भारत.

  • 16 Aug 2025 09:40 AM (IST)

    16 Aug 2025 09:40 AM (IST)

    जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर मारली लाथ

    जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जालनाच्या डीवायएसपींनी आंदोलन कर्त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जालन्यात एक कुटुंब जिल्ह्यादखिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. यावेळी सुरु असलेल्या आंदोलन स्थळावरून एका कुटुंबाने पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला पण यावेळी पोलिसांनी अडवलं. पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकांच्या कमरेत मागून लाथ मारली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • 16 Aug 2025 09:35 AM (IST)

    16 Aug 2025 09:35 AM (IST)

    दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार

    अ‍ॅशे टी-20 मालिका सध्या आहे, म्हणजेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन संघांमध्ये मालिका खेळवली जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज तिसरा टी-ट्वेंटी सामना मिळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती त्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धुमाकुळ होता. आजचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचे असणारा आहे. मागील सामन्यामध्ये डेव्होल्ड ब्रेविस याने शतक झळकावून नाबाद खेळी खेळली होती.

  • 16 Aug 2025 09:30 AM (IST)

    16 Aug 2025 09:30 AM (IST)

    सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच, चांदीच्या दरात वाढ!

    16 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,123 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,279 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,592 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,230 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,920 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 116.20 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,16,200 आहे.

  • 16 Aug 2025 09:25 AM (IST)

    16 Aug 2025 09:25 AM (IST)

    लॉटरी लागली, पण टिकवता यायला हवी- गणेश नाईकांचा शिंदेंना टोला

    "लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, पण लागलेली टिकवता आली पाहिजे," अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष चिमटा काढला. दुर्वेश (ता. पालघर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. नाईक म्हणाले, "प्रत्येकाचं नशीब असतं. शिंदे यांना लॉटरी लागली, ही आनंदाची बाब आहे. पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं, कसं कमवलं आणि किती टिकवलं हेच खरी कसोटी आहे." दरम्यान, यावर्षी १० कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • 16 Aug 2025 09:20 AM (IST)

    16 Aug 2025 09:20 AM (IST)

    बेस्ट पतपेढी निवडणूक : प्रसाद लाडांचा ठाकरे-मनसे युतीवर टोला

    दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार टीका केली. "पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला आता बंद करण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत आम्ही 'ठाकरे ब्रँड' बंद करणार आहोत," असा टोला लाड यांनी लगावला.

  • 16 Aug 2025 09:18 AM (IST)

    16 Aug 2025 09:18 AM (IST)

    हुमायूनच्या थडग्यात अपघात; सहा जणांचा मृत्यू, अनेक जखमी

     राजधानी दिल्लीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निजामुद्दीन परिसरातील हुमायूनच्या थडग्यातील एका खोलीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचार वाजता या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य सुरू असून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १६ व्या शतकाच्या मध्यात बांधलेले हुमायूनचं थडगं हे ऐतिहासिक स्मारक पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Marathi breaking news live updates political national sports crime international lifestyle entertainment breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today : राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण
1

Top Marathi News Today : राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
2

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

Top Marathi News Today: कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट
3

Top Marathi News Today: कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट

Top Marathi News Today:  ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामींना महायुतीत येण्याची जलसंपदा मंत्र्यांची भरसभेत ऑफर
4

Top Marathi News Today: ठाकरेंचे आमदार प्रवीण स्वामींना महायुतीत येण्याची जलसंपदा मंत्र्यांची भरसभेत ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.