फोटो सौजन्य - Social Media
झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका स्वराज्य रक्षक संभाजी यात येसूबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतेच तिचे साखरपुडा हुरकला आहे. मुळात, तिला खऱ्या आयुष्यात देखील ‘शंभूराज’ मिळाल्याने हे नवं जोडपं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड करत आहे. अशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने तिची लव्ह स्टोरी शेअर केली आहे. ही फिल्मी स्टोरी चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.
याबद्दल सांगताना प्राजक्ता म्हणाली की, “शंभूराज आणि तिची पहिली भेट एका अपघातात झाली होती. तेव्हा ट्रक ड्राइव्हर उद्धटपणे तिच्याशी बोलत असताना शंभूराज यांनी येऊन त्या ड्राइव्हरच्या कानशिलात लगावली. तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली. आधी फार काही जास्त बोलणं नव्हतं पण नंतर हळू हळू बोलणं वाढलं… मैत्री झाली, मैत्री वाढली.”
मुळात, प्राजक्ताचे असे सांगणे होते की शंभूराज यांना ती आधी दादा म्हणून हाक मारत होती परंतु शंभूराज यांनी कधीच तिला ताई म्हणून हाक मारली नाही. तिचे म्हणणे होते की शंभूराज आधीपासूनच तिच्या बद्दल भावना बाळगून होता. यांनतर त्याने तिला विचारले असता त्याला नकाराचाही सामना करावा लागला, परंतु शंभूराजने प्रयत्न काही सोडले नाही. अखेर प्राजक्ताच्या मनात त्याने घर केलेच आणि आज त्यांचे प्रेम लग्नबंधनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
प्राजक्ताचे म्हणणे होते की तिला वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षांपासून लग्नासाठी दुरदुरून मागण्या येत होत्या. पण तिला आधी करिअर बनवायचे होते आणि त्याच दरम्यान तिच्या आयुष्यात शंभूराज आले. महत्वाची गोष्ट अशी आहे की जरी प्राजक्ताने आधी त्याला दादा म्हणून हाक अनेकदा मारल्या असल्या तरी शंभूराजने मॅडम हा शब्द काही सोडला नाही. ती कितीही दादा बोलूदे शंभूराज तिला मॅडमच म्हणत होता आणि त्यावरच ठाम होता. साखरपुड्याचे फोटोज चांगलेच चर्चेत आले आहेत.