20 Aug 2025 03:30 PM (IST)
पुणे: पुणे जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर व उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान धनकवडी, पुणे सातारा रस्ता, सिंहगड रस्ता यासह अन्य महत्वाच्या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान पानशेत, टेमघर, वरसगाव व खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
20 Aug 2025 03:21 PM (IST)
लोकसभेचे कामकाज सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 'संविधान (१३० वी सुधारणा) विधेयक, २०२५; केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक, २०२५ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक, २०२५' हे संसदेच्या संयुक्त समितीकडे (जेपीसी) पाठविण्यात आले आहेत.
20 Aug 2025 03:10 PM (IST)
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थान सिव्हिल लाईन्स येथे जनसुनावणीदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी (२० ऑगस्ट) झाले जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने प्रथम मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
20 Aug 2025 02:30 PM (IST)
IND VS PAK : 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत 10 सप्टेंबरला यूएइविरुध्द पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरवात करणार आहे. तसेच 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. परंतु आशिया कपपूर्वीच भारतात पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सोशल मीडियावर चाहते आक्रमक झालेले दिसून येत आहे.
20 Aug 2025 02:30 PM (IST)
जगाचाही विचार न करता अनेक जोड्या असतात ज्या आपण आजूबाजूला पाहतो आणि त्यांना एकत्र राहायचं असतं म्हणून पळून जाऊन लग्न करतात अथवा जगाला न जुमानता एकत्र राहतात. पण हल्ली अशाही जोड्या अधिक दिसत आहेत, ज्यांच्याकडे बघून प्रेमाचा आदर्श घेत असता असता अचानक त्यांनी वेगळं होण्याच्या चर्चा समोर येतात. मग प्रश्न पडतो की अरे इतक्या वर्षांनंतर नातं का टिकत नाही? असं काय घडतंय की नात्यातील गणितच पूर्ण बिघडतंय
20 Aug 2025 02:30 PM (IST)
भारतीय रेल्वे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, आता रेल्वेने एक नियम (रेल्वे नियम) काटेकोरपणे लागू करण्याची तयारी केली आहे, जो अगदी विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसारखाच असेल. हो, आम्ही प्रवासादरम्यान वाहून नेल्या जाणाऱ्या सामानाच्या वजनाबद्दल बोलत आहोत, जे रेल्वे आता विमान कंपन्यांप्रमाणे नियंत्रित करेल (रेल्वे सामान नियम जसे एअरलाइन्स). जरी हा नियम आधीच अस्तित्वात असला तरी तो पूर्णपणे लागू होऊ शकला नाही.
20 Aug 2025 02:29 PM (IST)
Pakistan News : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानच्या तुरंगातून एक मोठा डाव साधला आहे. सध्या ते पाकिस्तानच्या अदियाल तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शाहबाज यांनी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्ष्यातील नेत्याला विरोधीपक्षनेते (LoP) पदावरुन हटवेल होते. यानंतर हे पद छोट्या पक्षातील नेत्याला सोपवले जाणार असल्याच्या चर्चा सुर होत्या.
20 Aug 2025 02:29 PM (IST)
बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वडवणी पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली. न्यायालायने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दीड महिन्यात पोलिसांची ही दुसरी कारवाई असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
20 Aug 2025 02:29 PM (IST)
तुमचे शरीर मधुमेह होण्याबाबत संकेत देत असेल आणि तुम्हाला त्याबाबत जाणीव सुद्धा नसेल तर? असेच काहीतरी प्रीडायबिटीजच्या बाबतीत घडते. शहरी व ग्रामीण भागांमधील जवळपास १५.३ टक्के व्यक्ती या आरोग्यसंबंधित आजाराने पीडित आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मते, भारतात जवळपास १०१ दशलक्ष व्यक्तींना मधुमेह असण्याचा अंदाज आहे, जेथे २०१९ मधील ७० दशलक्ष व्यक्तींच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. रक्तातील साखरेची पातळी काहीसी वाढलेली असते, पण मधुमेह होण्याइतकी नसते तेव्हा त्या स्थितीला प्री-डायबिटीज म्हणतात. हा आजार सहसा शांतपणे आणि कोणतीही लक्षणे दिसून न येता वाढत जातो, ज्यामुळे अनेक व्यक्तींना त्याबाबत जाणीव देखील होत नाही. योग्य माहिती आणि जीवनशैलीमध्ये काहीशा बदलांसह या आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे.
20 Aug 2025 02:28 PM (IST)
Thackeray Brothers: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती. दरम्यान मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान त्यांच्याविरोधात प्रसाद लाड व शशांक राव यांचे पॅनल विजयी झाले आहे. विजय होताच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.
20 Aug 2025 02:23 PM (IST)
Thackeray Brothers: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती. दरम्यान मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान त्यांच्याविरोधात प्रसाद लाड व शशांक राव यांचे पॅनल विजयी झाले आहे. विजय होताच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.
20 Aug 2025 02:10 PM (IST)
Asim Munir nuclear threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी नुकतेच वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या भाषणामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. “पाकिस्तान एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहे. जर आम्हाला असे वाटले की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही आपल्यासोबत अर्धे जग बुडवू,” असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. ही धमकी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच दिलेला गंभीर इशारा मानला जातो. पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीत ही धमकी अधिक चिंताजनक ठरते.
20 Aug 2025 02:10 PM (IST)
भोगावती : कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा राधानगरी येथील लक्ष्मी जलाशय शंभर टक्के भरला आहे. मुसळधार पावसामुळे जलाशयात प्रचंड वेगाने पाणी साठ्यात वाढ झाली आहे. जलाशयात ८.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशयातून ११५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.
20 Aug 2025 01:55 PM (IST)
विक्रम सोलरचा बहुप्रतिक्षित २०७९ कोटी रुपयांचा आयपीओ मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी उघडला आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी आयपीओला १.५७ पट सबस्क्रिप्शन मिळाले. यामध्ये, किरकोळ गुंतवणूकदारांनी १.४३ पट, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (NII) ३.९९ पट बोली लावली, तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (QIB) फक्त २% बोली लावली.
20 Aug 2025 01:55 PM (IST)
बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत जोरदार निषेध नोंदवला. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
20 Aug 2025 01:45 PM (IST)
दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली. अनेक नावे चर्चेमध्ये असताना भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली. सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल देखील आहेत. दरम्यान, सी पी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.
20 Aug 2025 01:35 PM (IST)
शेअर बाजारातील अस्थिरतेदरम्यान, गेल्या दोन दिवसांत झालेल्या मोठ्या व्यवहारामुळे ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स शेअर बाजारात वरच्या दिशेने जात आहेत. बुधवारी बीएसईवर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर १४.५ टक्क्यांपर्यंत वाढला. मंगळवारी त्याआधी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स ८.७ टक्क्यांनी वाढून बंद झाले. बातमी लिहिताना, बीएसईवर सुमारे ३.६ कोटी शेअर्सचे व्यवहार झाले होते. तर दोन आठवड्यांची सरासरी १.२९ कोटी शेअर्स होती.
20 Aug 2025 01:25 PM (IST)
आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात १५ खेळाडूंची निवड केली आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणऱ्या आशिया कपसाथी भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. तर उपकर्णधार म्हणून शुभमन गिल याची निवड केली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने निवडलेल्या संघावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचे कारण म्हणजे चॅम्पियन ट्रॉफी आणि आयपीएल च्या १८ व्यय हंगामात आपल्या बॅट ने छाप सोडणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थाने देण्यात आले नाही. यावरून समालोचक आकाश चोप्रा, टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरने देखील शंका उपस्थित केली आहे.
20 Aug 2025 01:15 PM (IST)
पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे लढलेल्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते, परंतु त्यांच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. हा निकाल ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा दोन्ही पक्ष आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याची तयारी करत आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
20 Aug 2025 01:06 PM (IST)
धोम धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. धोम धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये सुरु असलेला 16058 क्युसेक विसर्ग 20.00 वा. वाढवून 17616 क्युसेकने सोडण्यात येणार आहे. धरणातुन नदीत सोडलेला विसर्ग व धरणा खालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा याचा विचार करता नदीमध्ये विसर्ग वाढणार आहे.
20 Aug 2025 01:05 PM (IST)
अलिकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या काही भागांमधून गायब असलेल्या अंबिका रंजनकर यांनी चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्री शो सोडण्याची चर्चा सुरू केली. तसेच, आता अभिनेत्रीने स्वतः शो सोडण्याच्या अफवांना निराधार ठरवत प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच काही नवीन पाहुण्यांनीही शोमध्ये प्रवेश करताना दिसले आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
20 Aug 2025 01:04 PM (IST)
मतचोरीचे सत्य बाहेर येत आहे आणि बिहारमधील प्रत्येकजण म्हणत आहे की मते चोरीला गेली आहेत. बिहारमधील लोक मतचोरीचा निषेध करत आहेत आणि लवकरच संपूर्ण देश त्याविरुद्ध उभा राहील, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.
20 Aug 2025 01:03 PM (IST)
MUMBAI | पावसाचा जोर अजून म्हणावा तसा ओसरलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात जाऊन मुंबई शहर आणि परिसर तसंच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणून घेतली. यावेळी अजित पवारांनी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
20 Aug 2025 01:03 PM (IST)
महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेले कास पठार हे लवकरच पुन्हा एकदा फुलांनी बहरणार आहे. विविध रंगांच्या रानफुलांची सजलेले कास पठार हे निसर्गाच्या सौंदर्याची मुक्त उधळण करत असते. हे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी साताऱ्यामध्ये होत असते. आता लवकरच कास पठार हंगाम सुरु होणार आहे.
20 Aug 2025 01:02 PM (IST)
येवला तालुक्यात पोळा सणाची लगबग सुरू झाली असून शेतकरी बांधव आपल्या शेतकऱ्याच्या विश्वासू सोबत्याला म्हणजेच बैलजोडीला सजवण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर बैल सजावटीच्या साहित्यांच्या किमतींमध्ये यंदा १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारपेठेत पारंपरिक झुल, रंगीबेरंगी दोर, कवड्या, पितळी घंटा, मण्यांच्या माळा, टोप्या, शिंगांच्या झिलईसाठी लागणारे रंग व चमकदार कपडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत.
20 Aug 2025 12:10 PM (IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएमडीच्या मते, पुढील ४८ तास राज्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. आयएमडीने पुढील ४८ तास गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने पुढील दोन दिवस कोकण आणि मुंबईसह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तसेच मराठवाडा आणि विदर्भात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे, जिथे या आठवड्याच्या अखेरीस पावसाची तीव्रता कमी होऊन 'यलो अलर्ट' होऊ शकते.
20 Aug 2025 12:05 PM (IST)
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना मोठा धक्का बसला आहे.मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी ठाकरे ब्रँडचे पक्ष एकत्र आले होते, मात्र निकालात त्यांना एकही जागा मिळाली नाही. शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार निवडून आले. निकालानंतर भाजपा नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.
20 Aug 2025 12:01 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज संसदेत १३० वे संविधान दुरुस्ती विधेयक २०२५ विधेयक सादर करणार आहेत. हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून या विधेयकाची सर्वाधिक चर्चा आहे. या विधेयकांतर्गत, पंतप्रधान असोत, मुख्यमंत्री असोत किंवा इतर कोणताही मंत्री, जर त्यांच्या कार्यकाळात ते सलग ३० दिवस न्यायालयीन कोठडीत राहिले, तर त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल, ज्यामध्ये ५ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेची तरतूद आहे, तर त्यांना ३० दिवसांच्या आत पद सोडावे लागेल. अन्यथा, ३१ व्या दिवसापासून ते आपोआप पदावरून काढून टाकले जातील असे मानले जाईल.
20 Aug 2025 11:45 AM (IST)
जय मल्हार या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले देवदत्त नागे लवकरच त्यांच्या हक्काचं घर बांधत आहे,हे घर इतर ठिकाणी नाही, तर थेट जेजुरीमध्ये खंडोबाच्या चरणी अभिनेता स्वतःच घर उभारणार आहे.
जय मल्हार या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले देवदत्त नागे लवकरच त्यांच्या हक्काचं घर बांधत आहे,हे घर इतर ठिकाणी नाही, तर थेट जेजुरीमध्ये खंडोबाच्या चरणी अभिनेता स्वतःच घर उभारणार आहे.
सविस्तर वाचा - https://t.co/FEdvvdITHf#DevdattaNage #Entertainment #MaharathiActor pic.twitter.com/mUeLrpSaSB— Navarashtra (@navarashtra) August 20, 2025
20 Aug 2025 11:44 AM (IST)
"एका पतपेढीची निवडणूक आहे. मला माहितच नाही या विषयावर.पतपेढ्यांच्या निवडणुका या ट्रेड युनियनच्या असतात. ठाकरे ब्रांड कधीच फेल होणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही. चाचणी परीक्षा नाही," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
20 Aug 2025 11:37 AM (IST)
20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी बालगंधर्वाच्या पुलावर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
20 Aug 2025 11:22 AM (IST)
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सी पी राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
20 Aug 2025 11:21 AM (IST)
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. रेखा गुप्ता यांचा दिल्लीमध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी त्यांच्यावर आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
20 Aug 2025 10:57 AM (IST)
19 ऑगस्ट 2025 रोजी, राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा जोर पाहण्यात आला. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल अनेक तासांसाठी खोळंबली होती. त्यामुळे मुंब ईकरांचे तसेच MMR परिसरातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे मोठे हाल झाले होते. पावसाचा वाढता जोर पाहता या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, दुसरा दिवस उगवला पण पावसाचा जोर मात्र काही कमी झाला नाही. त्या अनुषंगाने राज्यातील काही स्थानिक प्रशासनांनी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी 20 ऑगस्ट 2025 रोजी शाळा बंद राहणार असून तर काही ठिकाणी 21 ऑगस्ट रोजी ही शाळा बंद राहणार आहेत. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:50 AM (IST)
सुंदर त्वचेसाठी चांगला आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोषण आहार घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तरुण दिसण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:50 AM (IST)
सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मोरबे धरण परिसरातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून आज पहाटे 3.10 वाजता धरणाचे 12 मी. × 3 मी. आकाराचे दोन्ही वक्राकार दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले. या अंतर्गत 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात न उतरता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे. दररोज 450 दशलक्ष लिटर क्षमतेचे हे मोरबे धरण आता पूर्ण क्षमतेने (88 मीटर) भरलेले असून नवी मुंबईच्या जलसंपन्नतेत मोठी वाढ झाली आहे.
20 Aug 2025 10:46 AM (IST)
उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये 22 हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा दिला आहे. आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना व स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरणातून 75 हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये 54 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
20 Aug 2025 10:45 AM (IST)
गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे (वय ३०) या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर रुग्णालयात नेत असतानाच गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर रुग्णवाहिकेत या महिलेची प्रसूती झाली. यामध्ये आई सुखरूप राहिली आहे. मात्र, दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला.
20 Aug 2025 10:40 AM (IST)
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान झाले. मंगळवारी मतमोजणी प्रस्तावित होती, परंतु मुसळधार पावसामुळे उशिरा सुरू झाली आणि रात्री उशिरा निकाल जाहीर झाले. बेस्ट पतपेढीच्या एकूण २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शशांकराव पॅनलने १४ जागा जिंकल्या. त्याच वेळी महायुती समर्थित सहकार समृद्धी पॅनलने ७ जागा जिंकल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा पूर्णपणे सफाया झाला असल्याचं दिसून आले आणि इतकंच नाही तर उत्कर्ष पॅनलला ० जागा मिळाल्या आहेत. अगदीच अपमानास्पदरित्या ही जोडी हरल्याचं आता समोर आलं आहे. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:35 AM (IST)
९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हॉकी आशिया कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. हॉकी आशिया कप २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जणार आहे. भारताला हॉकी आशिया कपचे यजमानपदाचा मान मिळाला असून देशाने या स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्याकडे दिले आहे. परंतु, या स्पर्धेत पाकिस्तान हॉकी आशिया कपसाठी भारत दौरा करणार नसल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. एवढेच नाही तर ओमानने देखील आपले नाव मागे घेतले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानला संधी देण्यात आली. वाचा सविस्तर
20 Aug 2025 10:33 AM (IST)
सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो सर्वांचाच थरकाप उडवत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक शेतातील दृश्य दिसून येत आहे. हे दृश्य इतके हैराण करणारे आहे की त्याने कुणाचेही हातपाय थरथर कापू शकतात. व्हिडिओमध्ये दिसतंय की शेकडो आणि हजारो साप शेतात इकडे तिकडे रेंगाळत आहेत, जणू काही साप पिकं नाही तर शेती करत आहेत. साप जेसीबी मशीनवरही चढले आहेत आणि पुढे जाताना त्याला चिकटून आहेत. काही साप मशीनच्या बोनेटवर पोहोचले आहेत आणि केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दृश्य इतके भयानक आहे की ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
20 Aug 2025 10:16 AM (IST)
पुणे: यंदाच्या पावसाळी हंगामात पुण्यातील सर्व प्रमुख धरणे १०० टक्के भरली गेली आहेत. यापैकी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे १०० टक्के भरली आहेत. खास बाब म्हणजे, खडकवासला धरणातून सध्या मुठा नदीसाठी ३९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्याची तयारी करण्यात आली आहे. या विसर्गामुळे मुठा नदीच्या पातळीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे जलसंपत्तीची भरपाई झाली आहे.
20 Aug 2025 09:55 AM (IST)
Maharashtra Rain Update: गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अजून दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवा आहे. पावसाचा जोर पाहता राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तसेच शाळांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
20 Aug 2025 09:50 AM (IST)
हवामान खात्याने महाराष्ट्रातील पालघर, मुंबई उपनगरे, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि रायगड येथे मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, परंतु आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि पूर संबंधित घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थितीमुळे ५ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्याच्या विविध भागात ६ एसडीआरएफ पथकांसह एकूण १८ एनडीआरएफ पथके तैनात आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, भिवंडी, पालघर येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
20 Aug 2025 09:45 AM (IST)
Asia cup 2025 : मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी, बीसीसीआयकडून आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघ निवडीबाबत माहिती दिली. सूर्यकुमार यादवकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे तर शुभमन गिलल उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच वेळी, रिंकू सिंग, हर्षित राणा, सुज सॅमसन आणि जितेश शर्मा सारख्या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, चँपियन ट्रॉफी असो वा आयपीएल २०२५ या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देखील आशिया कपसाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे निवडकर्त्यांवर अनेकांनी रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये आता टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याने देखील संघाच्या निवडीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
20 Aug 2025 09:40 AM (IST)
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला मोठा फटका बसला आहे. ठाण्यात पडणाऱ्या या पावसामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वेगाड्या अर्धा तास उशिराने धावणार आहेत.
20 Aug 2025 09:35 AM (IST)
20 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,074 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,234 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,555 रुपये आहे. 19 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,117 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,274 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,588 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,00,740 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,550 रुपये आहे.
20 Aug 2025 09:31 AM (IST)
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या सरकारी निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
20 Aug 2025 09:30 AM (IST)
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नेरी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून चक्क फाटक्या नोटा निघाल्या. हा प्रकार सोमवारी (दि. १८) घडला. एका ग्राहकाने एटीएममधून पैसे काढून मोजू लागला. तेव्हा तो अवाक् झाला, कारण एटीएममधून चक्क 500 रुपयांच्या 18 नोटा फाटक्या निघाल्या आणि सदर बाब लोकांना सांगताच एकच खळबळ उडाली.
20 Aug 2025 09:23 AM (IST)
पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
Marathi Breaking news live updates- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांना आधीच सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडण्यास टाळावे, असेही सांगितले आहे. राज्यातील विविध ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.