Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापनेचा राज्य सरकारचा निर्णय

Marathi breaking live marathi- या आरोप-प्रत्यारोपामुळे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील तणाव चव्हाट्यावर आला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 08, 2025 | 06:20 PM
Top Marathi News Today: मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापनेचा राज्य सरकारचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत आणि भाजपशिवाय राहू शकत नाहीत, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शरद पवार भाजपला सोडून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. आगामी १५ दिवसांत यासंदर्भात मोठी बातमी मिळेल,” असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत दिला आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, यामागील अर्थ लावण्यासाठी राजकीय निरीक्षकांकडून विविध तर्क लढवले जात आहेत. दरम्यान, शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

 

The liveblog has ended.
  • 08 Aug 2025 05:40 PM (IST)

    08 Aug 2025 05:40 PM (IST)

    माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय ?

    माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी.भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना सोसिअल मीडियावर एका इस्माने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सध्या हा विडिओ सोसिअल मीडिया इंस्टाग्राम वर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ह्या विडिओ मधे इसामने अप शब्द वापरून नवनीत राणा यांना धमकी दिल्याचे दिसत आहे. या संधर्भात युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • 08 Aug 2025 05:21 PM (IST)

    08 Aug 2025 05:21 PM (IST)

    Crime News: गांजाची होम डिलिव्हरी करणारा अटकेत; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा गांजा अटकेत

    लोणावळा शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत २ किलो ७० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

  • 08 Aug 2025 04:29 PM (IST)

    08 Aug 2025 04:29 PM (IST)

    Jharkhand Naxal Attack: झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केला IED ब्लास्ट; CRPF चे दोन जखमी जवान

    झारखंड/CRPF: गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवादाविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या सीमेलगत नक्षलवादाचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. मात्र आता सुरक्षा यंत्रणांनी याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. झारखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या सुरक्षा यंत्रणेच्या पथकाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये २ जवान जखमी झाले आहेत.

  • 08 Aug 2025 04:00 PM (IST)

    08 Aug 2025 04:00 PM (IST)

    निवडणूक आयोग अन् भाजपाविरोधात काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन

    महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील निवडणुकांत मतांची चोरी झाल्याच्या आरोपाचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्रातील मते चोरली अशी आमची पक्की खात्री आहे’, असा आरोप राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘न्यायव्यवस्थेने या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण ज्या लोकशाहीवर आपण इतके प्रेम करतो, ती आता अस्तित्वात नाही’, असे राहुल यांनी अधोरेखित केले. राहुल गांधींच्या आरोपानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. दादरमध्ये चक्काजाम करून निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 08 Aug 2025 03:54 PM (IST)

    08 Aug 2025 03:54 PM (IST)

    “काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल…; उद्धव ठाकरेंच्या स्थानावरुन एकनाथ शिंदेचे जोरदार टीकास्त्र

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भेटी झाल्या आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. यावेळी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे हे मागे बसल्यामुळे आता जोरदार वाद पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये हे नेते मागे बसलेले असल्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

  • 08 Aug 2025 03:46 PM (IST)

    08 Aug 2025 03:46 PM (IST)

    दिल्लीतील चर्चांमागचं ‘राज’कारण; राहुल-उद्धव भेटीत काय ठरलं?

    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हेदेखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी (7 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय समीकरणावर चर्चा झाली. त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबतच्या आघाडीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 08 Aug 2025 03:37 PM (IST)

    08 Aug 2025 03:37 PM (IST)

    ओ चौबे, हे बरोबर नाही; वाहतूक कोंडीवरुन अजित पवार पोलीस आयुक्तांवर भडकले

    पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र आणि महामार्गावरील भीषण वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) सकाळी सहा वाजता चाकण चौक व चाकण परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. पुणे-नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या दोन मुख्य महामार्गांवरील दररोजच्या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अजित पवारांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला. पाहणीदरम्यान त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांना कडक शब्दांत फटकारले आणि वाहतूक तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले. “ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केलीये? सगळी वाहतूक सुरू करा!” असे म्हणत अजित पवारांनी पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

  • 08 Aug 2025 03:08 PM (IST)

    08 Aug 2025 03:08 PM (IST)

    मी तर शपथ घेतली आहे, राहुल गांधींचा इशारा, बंगळुरूत काँग्रेस आक्रमक

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या मतचोरीच्या आरोपांवर राहुल गांधींनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले आहेत. कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज बंगळुरूमध्ये काँग्रेसने वोट अधिकार रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत राहुल गांधींना पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप सरकार आणि  निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. “संविधान प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देते, परंतु सध्या देशातील महत्त्वाच्या संस्था कमकुवत केल्या जात आहेत आणि संविधानात हस्तक्षेप केला जात आहे. संविधान गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. पण काळ बदलल्यानंतर अशा कृत्यांना शिक्षा होणारच.

  • 08 Aug 2025 03:06 PM (IST)

    08 Aug 2025 03:06 PM (IST)

    उत्तराखंडसह ‘या’ राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ; अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती

    गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनने सर्व देश व्यापला आहे. अनेक राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. दिल्लीत यमुना नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 08 Aug 2025 02:50 PM (IST)

    08 Aug 2025 02:50 PM (IST)

    उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

    Uttrakhand Cloudburst: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील हर्षिल खोर्‍यात वसलेलं आणि गंगोत्री धामला जाणाऱ्या मार्गावर वसलेलं धराली गाव मंगळवारी दुपारी अवघ्या ३० सेकंदांत भयंकर जलप्रलयाचा साक्षीदार बनलं. अचानक झालेल्या ढगफुटीमुळे गावात मोठं नुकसान झालं आहे. अनेक होमस्टे, हॉटेल्स, घरे मलब्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान येथील धराली गावात भारतीय लष्कराचे ऑपरेशन धराली सुरु आहे. याअंतर्गत मलब्याखाली गाडल्या गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

  • 08 Aug 2025 01:35 PM (IST)

    08 Aug 2025 01:35 PM (IST)

    इंडिया आघाडीचे दिल्लीत स्नेहभोजन; काय रंगले राजकारण?

    दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. बैठकांचा जोर वाढला असून नेत्यांच्या दिल्लीवारी देखील वाढल्या आहेत. कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वामध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. यामध्ये सर्व विरोधी पक्षातील जवळपास 50 नेतृत्व करणारे नेते सहभागी झाले होते. इंडिया आघाडीच्या या बैठकीची देशामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. वाचा सविस्तर. 

  • 08 Aug 2025 01:30 PM (IST)

    08 Aug 2025 01:30 PM (IST)

    वाढदिवसानिमित्त जाणून घ्या प्राजक्ता माळीचा संपूर्ण प्रवास

    मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर आणि गुणी व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी जिची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा रंगात असते. आज अभिनेत्री तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच तिचा चाहता वर्ग देखील मोठा असून तिचे चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. प्राजक्ता माळीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर तिने स्वत:चा एक काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध केला आहे. एक कवी, एक अभिनेत्री, एक उत्तम नृत्यांगना असण्यासोबतच एक उत्तम होस्ट देखील आहे.  वाचा सविस्तर. 

  • 08 Aug 2025 01:25 PM (IST)

    08 Aug 2025 01:25 PM (IST)

    अमेरिकेने ५०% कर लादल्यानंतर फडणवीस यांनी मुंबईत घेतली उच्चस्तरीय बैठक

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५% कर आकारण्याचा नियम लागू झाला आहे. या निर्णयामागील कारण भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी करणे असल्याचे सांगितले जाते. याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव करचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली. बैठकीत असे ठरले की, प्रथम त्याचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासानंतर काय करता येईल याचा विचार केला जाईल. आपल्याला आपले उद्योग वाचवायचे आहेत. त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असं देखील मुख्यमंत्र्‍यांनी बैठकीत सांगितले आहे.

  • 08 Aug 2025 01:15 PM (IST)

    08 Aug 2025 01:15 PM (IST)

    वस्त्रोद्योग तोट्यात, निर्यात ठप्प

    भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे कापड आणि वस्त्र निर्यात उद्योग ठप्प झाला आहे. वॉलमार्ट, टार्गेट, अमेझॉन, टीजेएक्स कंपन्या, गॅप इंक आणि एच अँड एम यासह सर्व प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी भारतातील त्यांच्या पुरवठादारांना शुल्काबाबत स्पष्टता येईपर्यंत ऑर्डर पाठवू नका असे सांगितले आहे. खरेदीदारांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू नये म्हणून कंपन्यांनी २७ ऑगस्टपूर्वी मिळालेले ऑर्डर पाठवण्यास सुरुवात केली आहे.

  • 08 Aug 2025 01:10 PM (IST)

    08 Aug 2025 01:10 PM (IST)

    रीलसाठी तरुण धावत्या ट्रेनसमोर आला

    नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण रिल बनवण्यासाठी धावत्या ट्रेनसमोर गेला आहे. परंतु धावत्या ट्रेनसमोर रिल बनवणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने पटरीवरुन धावत आहे. याच वेळी एक तरुण धावत्या ट्रेनच्याबाजूने हिरो स्टाईलमध्ये चालत रिल बनवत आहे. परंतु तरुणाचा अंदाज चुकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तरुणाला पटीरीपासून किती लांबून चालायाचे याचा अंदाज येत नाही. यामुळे ट्रेन येताचा त्याच्या डोक्याला धडकते आणि तरुण बाजूला उडून पडतो. तरुणाला उठताही येत नसते. व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, तरुणाच्या डोक्याला चांगलाच मार बसला आहे.

  • 08 Aug 2025 01:05 PM (IST)

    08 Aug 2025 01:05 PM (IST)

    पोलिसांच्या छाप्यादरम्यान मीरा रोडच्या ‘केम छो’ ऑर्केस्ट्रा बारचं भयानक वास्तव उघड

    मुंबईतील मीरा रोड पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचे कारण मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेला ‘केम चो’ ऑर्केस्ट्रा बार आहे. बारमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गुप्त खोल्या आणि चुकीच्या कारवाया उघड झाल्या आहेत. पोलीस बारमध्ये पोहोचण्यापूर्वीच अलार्म वाजत असल्याचे समोर आले आहे. यासोबतच, लाल दिवा लागताच बारमधील वातावरण सुसंस्कृत व्हायचे. पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, मुली मेकअप रूमच्या मागे रेकॉर्ड केलेल्या संगीतावर लिप-सिंक करत होत्या. इतकेच नाही तर बारमध्ये एक गुप्त मार्ग बनवण्यात आला होता, ज्याद्वारे एखाद्या खोलीत पोहोचता येत असे. पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा ११ बार मुली तिथे लपलेल्या आढळल्या.

  • 08 Aug 2025 01:01 PM (IST)

    08 Aug 2025 01:01 PM (IST)

    Samsung चा स्वस्त फोन युजर्सच्या भेटीला

    कोरियन टेक कंपनी आणि लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Samsung पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाला. Samsung ने त्यांच्या A सीरीज अंतर्गत एक नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गॅलेक्सी A17 5G या नावाने लाँच करण्यात आला असून काही निवडक मार्केटमध्येच कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. असं सांगितलं जात आहे की, लाँच करण्यात आलेला नवीन गॅलेक्सी A17 5G हा A16 5G चे अपग्रेड मॉडल असू शकते.

  • 08 Aug 2025 12:45 PM (IST)

    08 Aug 2025 12:45 PM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी 11.30 वाजता पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12.45 वाजता पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ते यशदा येथे संवाद साधणार आहेत.

  • 08 Aug 2025 12:38 PM (IST)

    08 Aug 2025 12:38 PM (IST)

    नवीन अमेरिकन व्हिसा संबंधित नियम बदलले

    अमेरिकन व्हिसा पासपोर्टच्या संकलन प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने माहिती दिली आहे की १ ऑगस्ट २०२५ पासून कोणताही व्हिसा अर्जदार कोणत्याही तिसऱ्या व्यक्ती किंवा प्रतिनिधीमार्फत त्यांचा पासपोर्ट किंवा कागदपत्रे गोळा करू शकणार नाही. आता सर्व अर्जदारांना त्यांचे कागदपत्रे स्वतः गोळा करावी लागतील.

    (सविस्तर बातमी)

  • 08 Aug 2025 12:36 PM (IST)

    08 Aug 2025 12:36 PM (IST)

    ईडीचा माजी अधिकारी रिलायन्समध्ये नोकरीला

    ईडीमध्ये कार्यरत असताना अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या कपिल राज यांनी राजीनामा दिला होता. आता ते रिलायन्समध्ये नोकरीला लागले आहेत. कपिल राज हे माजीआयआरएस अधिकारी आहेत. १७ जुलैला त्यांनी स्वच्छेनिवृत्ती घेतली होती

  • 08 Aug 2025 12:00 PM (IST)

    08 Aug 2025 12:00 PM (IST)

    राहुल गांधींच्या प्रेसमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेमध्ये बसल्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.

  • 08 Aug 2025 11:50 AM (IST)

    08 Aug 2025 11:50 AM (IST)

    हडपसरमध्ये दहशत माजवणारे 6 आरोपी ताब्यात

    दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास साडेसतरानळी चौक, हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले, गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरानळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली.

  • 08 Aug 2025 11:40 AM (IST)

    08 Aug 2025 11:40 AM (IST)

    नरवीर तानाजी वाडी येथील बस आगारात आग

    पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील नरवीर तानाजी वाडी येथील बस आगारात पहाटे साडेपाचच्या सुमारास बसला आग लागली. यानंतर अग्निशमन दल तातडीने हजर झाले. दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

  • 08 Aug 2025 11:30 AM (IST)

    08 Aug 2025 11:30 AM (IST)

    पुण्यातील गोल्डन बेकरीला आग

    कोथरूड येथील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या गोल्डन बेकरीला पहाटे आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र आगीचे मोठे लोट दिसून आले.

  • 08 Aug 2025 11:27 AM (IST)

    08 Aug 2025 11:27 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापनेचा राज्य सरकारचा निर्णय

    राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापन करण्याचा विचार सुरू केला आहे. हवेली, जुन्नर आणि इंदापूर या शहरांचा यामध्ये समावेश असून, लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे संबंधित शहरांच्या शहरीकरणास वेग येणार असून नागरी सुविधा आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

  • 08 Aug 2025 11:15 AM (IST)

    08 Aug 2025 11:15 AM (IST)

    अजित पवारांची चाकण अन् हिंजवडी भागात खास पाहणी

    राज्याचे उपमुख्यंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे एक्शन मोडमध्ये आले आहेत. यापूर्वी देखील त्यांनी हिंजवडी भागातील वाहतूक कोंडीची पाहणी केली होती. यानंतर आता अजित पवार यांनी चाकण परिसरामध्ये जात वाहतूक कोंडी, नागरी समस्या याची पाहणी केली आहे. तसेच प्रशासनाला थेट आदेश दिले.

  • 08 Aug 2025 11:04 AM (IST)

    08 Aug 2025 11:04 AM (IST)

    राहुल गांधींच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची स्वतंत्र बैठक

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामध्ये आज (दि.08) राहुल गांधी यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची स्वतंत्र बैठक पार पडत आहे. यामध्ये शरद पवार हे देखील उपस्थित आहेत.

  • 08 Aug 2025 10:28 AM (IST)

    08 Aug 2025 10:28 AM (IST)

    Samsung इंडियाने लाँच केला साउंडबार लाइनअप!

    भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, सॅमसंगने त्यांचे 2025 साउंडबार लाइनअप लाँच केले आहे. यामध्ये ऑडियो इंटेलिजेंस, एडॅप्टिव डिझाईन आणि स्मार्ट होम इंटीग्रेशन सारखे अनोखे फीचर्स देण्यात आले आहेत. आजच्या भारतीय घरातील सवयींना अनुकूल बनवलेली ही नवीन साउंडबार रेंज विविध स्वरूपाच्या घटकांमध्ये सुधारित कामगिरी आणि वैयक्तिकरण आणते. नव्या लाइनअपमध्ये फ्लॅगशिप HW-Q990F आणि कन्वर्टिबल HW-QS700F या दोन मॉडेलचा समावेश करण्यात आला आहे.

  • 08 Aug 2025 10:11 AM (IST)

    08 Aug 2025 10:11 AM (IST)

    भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा अंडर-19 संघ जाहीर!

    भारताच्या युवा संघाचा नुकताच इंग्लड दौरा पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने या दौऱ्यावर कमालीची कामगिरी केली होती. यामध्ये भारताच्या संघाने एकदिवसीय मालिका जिंकली, तर कसोटी मालिका अनिर्णयित राहिली. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या युवा संघांमध्ये मालिका रंगणार आहे. टीम इंडियाची घोषणा आधीच झाली आहे आणि आता ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे भारतीय वंशाचे दोन खेळाडू देखील पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसतील.

    The next batch of future stars ✨

    Congrats to all selected in a 15-man U19 squad ahead of an upcoming series against the India U19s in Brisbane and Mackay. pic.twitter.com/PoCa2d2Szk

    — Cricket Australia (@CricketAus) August 8, 2025

  • 08 Aug 2025 09:56 AM (IST)

    08 Aug 2025 09:56 AM (IST)

    महाराष्ट्रात निवडणुकीत घोटाळा

    गेल्या वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. पण या निवडणुकांनंतर लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत आहेत. अशातच काल ( ७ ऑगस्ट) राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्यातील निवडणुका आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत थेट पुराव्यानिशी गंभीर आरोप केले आहेत. वाचा सविस्तर 

  • 08 Aug 2025 09:40 AM (IST)

    08 Aug 2025 09:40 AM (IST)

    लैगिंक शोषणाच्या आरोपाखाली पाकिस्तानी क्रिकेटपटूला ब्रिटनमध्ये अटक

    पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला जेव्हा त्यांचा क्रिकेटपटू हैदर अलीला युकेमध्ये बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पाकिस्तानचा अ संघ म्हणजेच पाकिस्तान शाहीन सध्या युके दौऱ्यावर आहे, हैदर अली या संघाचा भाग होता. वृत्तानुसार, पाकिस्तानी वंशाच्या एका मुलीने हैदर अलीवर वंशवादाचा आरोप केल्यानंतर ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी हैदर अलीला अटक केली आहे. ही बातमी समोर येताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हैदर अलीला तात्पुरते निलंबित केले आहे.

  • 08 Aug 2025 09:30 AM (IST)

    08 Aug 2025 09:30 AM (IST)

    घसरणीसह उघडणार शेअर बाजार

    गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड आज ८ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराची मंद सुरुवात दर्शवतात. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,६४७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २६ अंकांनी कमी होता.

  • 08 Aug 2025 09:20 AM (IST)

    08 Aug 2025 09:20 AM (IST)

    लाडक्या बहिणींनो हफ्ता जमा झाला का?

    मागील बऱ्याच दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा बारावा हफ्ता कधी मिळणार याबाबत बरीच चर्चा सुरू होती. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ गिफ्ट देणार का? याबाबत शंका होती. त्यामुळे आता लाडक्या बहीणीची शंका दुर झाली आहे. लाडक्या बहीणींचा हफ्ता हा 7 जुलै रोजी खात्यामध्ये जमा झाला आहे. रक्षाबंधनाच्या २ दिवसाआधीच लाडच्या बहीणीची १२ वा हफ्ता देऊन त्यांना आनंद दिला. जुलैचाच फक्त खात्यामध्ये जमा झाला आहे.

  • 08 Aug 2025 09:10 AM (IST)

    08 Aug 2025 09:10 AM (IST)

    तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचे दर?

    8 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,256 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,401 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,692 रुपये आहे. 7 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,234 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,381 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,676 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,010 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,560 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,920 रुपये आहे.

  • 08 Aug 2025 08:57 AM (IST)

    08 Aug 2025 08:57 AM (IST)

    पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; शेतकऱ्यांना दिलासा

    केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून, आता शेतकरी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ही योजना देशभरात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते. काही योजनांमध्ये आर्थिक मदत दिली जाते, तर काहींमध्ये पीक विम्याचे संरक्षण मिळते. यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो.

  • 08 Aug 2025 08:57 AM (IST)

    08 Aug 2025 08:57 AM (IST)

    रक्षाबंधनपूर्वी ‘लाडकी बहिण’ योजनेचा जुलै हप्ता जमा; महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

    ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनच्या आधीच महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने अनेकजणींनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांना ‘रक्षाबंधनाची ओवाळणी’ मिळाल्याचे चित्र आहे. या योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की, रक्षाबंधनच्या दिवशी किंवा त्याआधी जुलैचा हप्ता जमा केला जाईल. त्यानुसार जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात आली असून, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला रक्कम जमा करण्याची घोषणा पूर्णत्वास गेली आहे.

Web Title: Marathi breaking news today live political national crime international lifestyle business entertainment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या
1

Top Marathi News Today Live: भिवंडीत 65 वर्षीय महिलेवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या

Top Marathi News Today Live: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप
2

Top Marathi News Today Live: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप

Top Marathi News Today: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3

Top Marathi News Today: मतदार यादीच्या SIR संदर्भात आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Top Marathi News Today: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक
4

Top Marathi News Today: साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.