दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. बैठकांचा जोर वाढला असून नेत्यांच्या दिल्लीवारी देखील वाढल्या आहेत. कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वामध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. यामध्ये सर्व विरोधी पक्षातील जवळपास 50 नेतृत्व करणारे नेते सहभागी झाले होते. इंडिया आघाडीच्या या बैठकीची देशामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
India alliance delhi meeting by rahul gandhi with sharad pawar and uddhav thackeray
दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावरील शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’तील पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते.
मागील वर्षभरापासून इंडिया आघाडीची एकत्रित बैठक पार पडली नव्हती. काही दिवसांपूर्वी ऑनलाईन स्वरुपामध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर आता नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या असून अनेक महत्त्वपूर्ण नेते उपस्थित होते.
इंडिया आघाडीच्या या बैठकीमध्ये विरोधकांचे ऐक्य दिसून आले. राहुल गांधी यांनी यांनी नेतृत्व करत बैठकीमध्ये बोगस मतदार, मतचोरी, बिहार निवडणूक, बिहार विशेष मतदार यादी पुनरावलोकन अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे.
यावेळी 25 पक्षांचे 40 नेते उपस्थित होते. यावेळी अखिलेश यादव, डिंपल यादव, राम गोपाल यादव, तेजस्वी यादव, फारुक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, डी राजा, कमल हसन असे अनेक नेते उपस्थित होते
महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होत्या.
त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे देखील बैठकीला उपस्थित होते. तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असताना उद्धव हे मुलगा आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊतांसह उपस्थित होते.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये रश्मी ठाकरे देखील सहभागी झाल्या आहेत. रश्मी ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या संवादाचे फोटो व्हायरल होत आहेत.