Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: रेव्ह पार्टीच्या कारवाईनंतर रोहिणी खडसे यांचा आक्रमक पवित्रा

-Marathi breaking live marathi headlines update 28 july : महाराष्ट्रासह देशभरातील राजकारणातील घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2025 | 05:36 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यातआ आली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे यांचे प्रांजल खेवलकर हे पती असून यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  या अटकेच्या 24 तासांनंतर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की,कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी घेतला आहे.

The liveblog has ended.
  • 28 Jul 2025 05:10 PM (IST)

    28 Jul 2025 05:10 PM (IST)

    वाहतूक पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार?

    आरटीओ व वाहतूक प्रशासन यांचं अवजड वाहनांवर कोणतेही नियंत्रण नाही, त्यामुळे असे अपघात घडतात, जर वाहतूक पोलिसच सुर
    क्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार? असा सवाल मनसेच्या गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

  • 28 Jul 2025 05:08 PM (IST)

    28 Jul 2025 05:08 PM (IST)

    तिकोना किल्ल्यावर पार पडली गडकिल्ले संवर्धन मोहिम; खासदार निलेश लंकेंचा पुढाकार

    मावळ तालुक्यातील तिकोना गडावर गडकिल्ले संवर्धन मोहिमे राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या संकल्पनातून स्वच्छता व वृक्षारोपण पाचवी मोहीम पार पडली. यावेळी हजारो शिवभक्तांनी गडाची काळजी घेत यामध्ये सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या मोहिमेत सहभागी झाले होते

  • 28 Jul 2025 05:05 PM (IST)

    28 Jul 2025 05:05 PM (IST)

    प्रशासकीय कामकाज थेट बारमधून? दारुच्या घोटासह पेपर्सवर सह्या

    नागपूरमधील मनिषनगरमधील हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. दुपारच्या सुमारास बिअर बारमध्ये दारुचे घोट घेत आणि प्रशासकीय फाईल समोर ठेवून सह्या केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बारमध्ये एका टेबलवर तीन माणसं बसली आहेत. त्यातील एक जण प्रशासकीय फाईल पडताळत असल्याचे दिसून येत आहे.

     

    (सविस्तर बातमी )

    प्रशासकीय कामकाज थेट बारमधून? दारुच्या घोटासह पेपर्सवर सह्या, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

     

  • 28 Jul 2025 05:00 PM (IST)

    28 Jul 2025 05:00 PM (IST)

    मराठी गाण्याचा डंका आता जर्मनीत; प्राइड परेडमध्ये वाजलं ‘तांबडी-चामडी’

    ध्या सोशल मीडियावर तांबडी-चामडी गाणे मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. अनेकजण यावर डान्स रिल्स बनवत आहेत. हे गाण जगभरातील लोकांच्या पसंतीस पडत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सगळेच या गाण्यावर व्हिडिओ बनवत आहेत. विषेश म्हणजे हे गाणे परदेशातही पोहोचले आहे. या गाण्यावर जर्मनीच्या एका पार्टीमध्ये हजारो लोकांनी ठेका धरला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. जर्मनीमधील पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • 28 Jul 2025 04:55 PM (IST)

    28 Jul 2025 04:55 PM (IST)

    कोनेरू हम्पीला पराभूत करून दिव्या देशमुख बनली बुद्धिबळ विश्वविजेती

    महाराष्ट्राची १९ वर्षीय लेक दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. दिव्याने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. या लढतीत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत ६४ घरांची राणी बनण्याचा मान पटकावला आहे.

  • 28 Jul 2025 04:50 PM (IST)

    28 Jul 2025 04:50 PM (IST)

    सुसाट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; सिंगल चार्जवर 116 किलोमीटर, किंमत खिशाला परवडणारी

    भारतीय बाजारात कायनेटिक ग्रीनने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून Kinetic DX लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स आणि रेंज प्रदान केली आहे. ज्यामुळे नक्कीच या स्कूटरला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळणार.उत्पादकाने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये दिली आहेत. यात 8.8 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीकर्स, व्हॉइस कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कायनेटिक असिस्ट, 748 मिमी सीट, 37 लिटर अंडरसीट स्टोरेज, यूएसबी चार्जिंग पोर्ट, हिल होल्ड, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल, इझी चार्जर, इझी की, इझी फ्लिप, 16 भाषा यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

  • 28 Jul 2025 04:45 PM (IST)

    28 Jul 2025 04:45 PM (IST)

    भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात

    सॅमसंगने आज भारतातील ग्राहकांसाठी त्‍यांचे सातव्‍या पिढीमधील फोल्‍डेबल स्‍मार्टफोन्‍स – गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७, गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७ एफई, तसेच गॅलॅक्‍सी वॉच८ सिरीजच्‍या विक्रीच्‍या शुभारंभाची घोषणा केली. आजपासून भारतात गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७, गॅलॅक्‍सी झेड फ्लिप७, झेड फ्लिप७ एफई आणि गॅलॅक्‍सी वॉच८ सिरीजची विक्री सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक त्यांच्या जवळच्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये जाऊन या डिव्हाईसची खरेदी करू शकतात. याशिवाय ग्राहक Samsung.com, अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील डिवाईसेस खरेदी करू शकतात.

  • 28 Jul 2025 04:40 PM (IST)

    28 Jul 2025 04:40 PM (IST)

    वसई-विरारला वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका, जाणून घ्या कुठे बांधणार ७ उड्डाणपूल

    वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शहरात ७ उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या उड्डाणपुलांवर खर्च करण्यासाठी महापालिकेने बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठवला होता. एमएमआरडीएने यासाठी एक वर्षापूर्वी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, भूसंपादन आणि निधीअभावी काम थांबले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामानंतर वसई-विरारवासीयांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळण्याची अपेक्षा आहे.

  • 28 Jul 2025 04:35 PM (IST)

    28 Jul 2025 04:35 PM (IST)

    श्रावणी सोमवारनिमित्त शिव कावड यात्रा जल्लोषात,बम बम भोळेचा जयघोष

    अखिल आर्यंवत संघ,आंतरराष्ट्रीय बजरंग दल अंतर्गंत शिव कावड यात्रा समितीच्यावतीने दरवर्षी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भगवान शिव शंकराच्या शिव कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते.यावर्षी रायगड विभागाकडून खालापूर रसायनी व पनवेल विधानसभा यांच्याकडून सोमवार दि.28 रोजी सकाळी 8 वाजता खांदेश्वर शिवमंदिर ते गाढेश्वर शिवमंदिर असे 15 किमी पायी शिव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यात्रेचा शुभारंभासाठी तपस्वी श्री 1008 आचार्य महामंडळेश्वर योगी सिध्दनाथ अघोर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून शंखनाद व डमरु वाजवून शिव कावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला‌.

  • 28 Jul 2025 04:34 PM (IST)

    28 Jul 2025 04:34 PM (IST)

    सांगलीमध्ये सरकारच्या विरोधात भीक मांगो आंदोलन

    सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावांमधील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील याने काही दिवसांपूर्वी मिशनची बिले न मिळत असल्याने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हर्षल पाटील याचीही आत्महत्या नसून सरकारने केलेली त्याची हत्या आहे शिवाय राज्याचे कृषिमंत्री जर विधानसभेमध्ये रमी खेळत असतील, शिवाय विधान भवनामध्ये गुंडागर्दी करून एकमेकांना मारहाण करणे अशा तऱ्हेच्या घटना या सरकारच्या काळात घडत असल्याने सरकारने याची जबाबदारी घेऊन ताबडतोब आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत या मागणीसह आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसच्या वतीने सांगलीमध्ये भीक मांगो आंदोलन केले.

     

     

  • 28 Jul 2025 04:30 PM (IST)

    28 Jul 2025 04:30 PM (IST)

    कुणकेश्वरमध्ये पहिल्या श्रावण सोमवारी विधीवत पूजा

    कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. यावेळी विरण-मालवण येथील सुरेश नेरुरकर व कुडाळ येथील आनंद शिरवलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न होऊन मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.

  • 28 Jul 2025 04:25 PM (IST)

    28 Jul 2025 04:25 PM (IST)

    वेताळ बांबर्डे-कदमवाडी रस्त्याची दुरवस्था

    कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील भोगलेवाडी-कदमवाडी-हातेरी या रस्त्याची पार दुरवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भोगलेवाडी-कदमवाडी-हातेरी या रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते. या भागातून वाहने हाकताना वाहनचालक, स्थानिक तसेच विद्यार्थी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतोय. याशिवाय या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे येत्या १ ऑगस्टपासून एसटी बससेवा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदमवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि झाडी तोडण्याचे काम केले.

  • 28 Jul 2025 04:20 PM (IST)

    28 Jul 2025 04:20 PM (IST)

    महिला कल्याणाच्या नावाखाली ‘पैशांची उधळपट्टी’

    मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या मासिक पाळी स्वच्छता वाढवण्यासाठी आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २०१९ साली एक महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत ३ लाख ५५ हजार रुपये खर्च करून सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन खरेदी करण्यात आली होती. मात्र, सहा वर्षांनंतरही ही मशीन एकदाही वापरात न आणता निष्क्रिय पडून आहे. आज तिची अवस्था इतकी दयनीय आहे की, ती पूर्णतः गंजून कबाडात रूपांतरित झाली आहे.

  • 28 Jul 2025 04:16 PM (IST)

    28 Jul 2025 04:16 PM (IST)

    महाराष्ट्राची लेक बनली ६४ घरांची ‘राणी’! कोनेरू हम्पीला पराभूत करून दिव्या देशमुख बनली बुद्धिबळ विश्वविजेती

    महाराष्ट्राची १९ वर्षीय लेक दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. दिव्याने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. या लढतीत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत ६४ घरांची राणी बनण्याचा मान पटकावला आहे.

  • 28 Jul 2025 04:15 PM (IST)

    28 Jul 2025 04:15 PM (IST)

    माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

    अलिबागमध्ये  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रीपदावरून तात्काळ हटवा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत केली आहे. राज्याचे बेजबाबदार कृषीमंत्री शेतकऱ्यांना जुगार खेळायला लावतील.त्यांचा अशा वागण्याने राज्याची बदनामी होत आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची त्वरित मंत्री पदावरून हकालपट्टी करा अशा स्वरूपाचे पत्र मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.

  • 28 Jul 2025 04:10 PM (IST)

    28 Jul 2025 04:10 PM (IST)

    सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना महायुतीत बिघाडीचे संकेत

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढून त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार, आपण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना याविषयाचे सविस्तर पत्र लिहिले आहे.

  • 28 Jul 2025 04:04 PM (IST)

    28 Jul 2025 04:04 PM (IST)

    खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न' पुरस्कार प्रदान

    देशाची राष्ट्रीय धोरणे, महाराष्ट्र राज्याचे हिताचे विषय आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील विकासकामांविषयी संसदेत अभ्यासपूर्व मांडणी करणारे खासदार नरेश म्हस्के यांना यंदाचा मानाचा `संसद रत्न' पुरस्कार आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात केंद्रीय संसदीय कार्यमंत्री तथा अल्पसंख्यांक खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना `संसद रत्न' पुरस्कार मिळाल्याने नरेश म्हस्के यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

  • 28 Jul 2025 04:03 PM (IST)

    28 Jul 2025 04:03 PM (IST)

    दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित,

    दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या १४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत १० मोटर पंप जप्त करण्यात आले तर, ११ बोअरवेल बंद करण्यात आल्या. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाईही करण्यात येत आहे.

  • 28 Jul 2025 03:51 PM (IST)

    28 Jul 2025 03:51 PM (IST)

    'देशाचं नावं भारतच राहू द्या, कोणताही बदल नको; सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांचं विधान

    भारत हे फक्त एक नाव नाही, तर देशाची ओळख आहे. ते एक विशेषनाम आहे आणि त्याचे भाषांतर करू नये. 'इंडिया म्हणजेच भारत आहे' असं म्हणणं ठीक आहे, पण भारत, भारत आहे. म्हणून, लिहिताना आणि बोलताना, आपण भारताला फक्त भारत म्हटलं पाहिजे. भारत भारतच राहिला पाहिजे. त्यात कोणताही बदल होऊ नये, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागव यांनी केलं आहे.

  • 28 Jul 2025 03:30 PM (IST)

    28 Jul 2025 03:30 PM (IST)

    थायलंड कंबोडिया संघर्षादरम्यान बँकॉकमध्ये हिंसाचार; गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

    कंबोडिया-थायलडंमध्ये सुरु असलेल्या सीमेवरील संघर्षादरम्यान एक मोठी बातमी समोरी आली आहे. थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बॅंकॉकच्या ऑर टोर कोर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. बॅंकॉकचे हे मार्केट सतत पर्यटक आणि स्थानिकांनी गजबजलेले असते. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.

  • 28 Jul 2025 03:22 PM (IST)

    28 Jul 2025 03:22 PM (IST)

    थायलंड कंबोडिया संघर्षादरम्यान बँकॉकमध्ये हिंसाचार; गोळीबारात सहा जणांचा मृत्यू

    कंबोडिया-थायलडंमध्ये सुरु असलेल्या सीमेवरील संघर्षादरम्यान एक मोठी बातमी समोरी आली आहे. थायलंडची राजधानी बॅंकॉकमध्ये भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बॅंकॉकच्या ऑर टोर कोर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे.

  • 28 Jul 2025 03:16 PM (IST)

    28 Jul 2025 03:16 PM (IST)

    भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार, राजनाथ सिंहांचा संसदेतून पाकिस्तानला इशारा

    सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सनदेत भारत सरकारने आणि लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत सभागृहाला माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य दलांचे कौतुक केले. तर विरोधकांना देखील चांगलेच सुनावले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेले नाही असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे.

  • 28 Jul 2025 03:08 PM (IST)

    28 Jul 2025 03:08 PM (IST)

    १ ऑगस्ट पासून बदलतील UPI चे ‘हे’ महत्वाचे नियम

    UPI चा वापर झपाट्याने वाढत आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरून लोक एका क्षणात सर्वात जास्त पेमेंट करत आहेत. जर तुम्हीही ते वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण येत्या महिन्यापासून म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पासून UPI चे दोन प्रमुख नियम बदलणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये हे नियम सर्व बँका आणि पेमेंट अॅप्ससाठी लागू होतील. या बदलाचा परिणाम फोनपे, गुगल पे, पेटीएम भीम इत्यादी UPI प्लॅटफॉर्मवर दिसून येईल.

  • 28 Jul 2025 02:56 PM (IST)

    28 Jul 2025 02:56 PM (IST)

    US-EU Trade Deal : अमेरिकेचा टॅरिफवॉर! युरोपियन युनिवर लादणार १५ टक्के शुल्क

    सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्कॉटलॅंडच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) मध्ये एक मोठा व्यापार करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या बहुतांश वस्तुंवर केवळ १५% कर लादणार आहे. यामध्ये कार, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश आहे. यामुळे युरोपियन युनियन आणि अमेरिकेतील व्यापारी भागीदारीला चालना मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 28 Jul 2025 02:41 PM (IST)

    28 Jul 2025 02:41 PM (IST)

    सर रवींद्रज डेजाने मँचेस्टर खेळपट्टीचे घेतले चुंबन

    भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळवला गेला. भारताने पहिल्या डावात ३५८ धाव केल्या होत्या. प्रतिउत्तरात इंग्लंडने ६६९ धावांचा डोंगर उभा केला आणि ३११ धावांची आघाडी मिळवली. भारताची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. भारताने दुसऱ्या डावाची सुरवात केली तेव्हा ० धावा असताना चौथ्या दिवशी २ विकेट्स गमावल्या. त्यानंतर शुभमन गिल(१०३) आणि केएल राहुल (९०) चांगली खेळी करून भारताचा डाव सावरला त्यानंतर पाचव्या दिवशी राहुल आणि गिल लवकर बाद झाले आणि भारताची अवस्था २२२ धावांवर ४ अशी झाली. या कठीण परिस्थतीतुन सर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भारताला बाहेर काढण्याचे काम केले. या दोघांनी ३३४ चेंडूत २०३ धावांची नाबाद आणि विक्रमी अभेद्य भागीदारी रचली. या दरम्यान जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीमधील पाचवे शतक पूर्ण केले. भारताने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. या दरम्यान रवींद्र जडेजाने मँचेस्टर खेळपट्टीचे आभार मानले. त्यासाठी त्याने खास कृती केली. जी आता चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 28 Jul 2025 02:41 PM (IST)

    28 Jul 2025 02:41 PM (IST)

    Ghibli नंतर आता Crochet स्टाईलचं क्रेझ

    तुम्हाला आठवतंय का, अलीकडेच सर्वांमध्ये Ghibli स्टाईल ईमेजची क्रेझ निर्माण झाली होती. लोकं AI चॅटबोट चॅटजीपीटीचा वापर करून Ghibli स्टाईल ईमेज तयार होते. सोशल मीडियावर तर या ईमेजचा पूर आला होता. राजकीय नेते, सेलिब्रिटी, कलाकार, सामान्य माणसं सर्वांनाच Ghibli स्टाईलने भुरळ घातली होती. Ghibli स्टाईल ईमेजनंतर आता एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे, हा ट्रेंड म्हणजेच Crochet स्टाईल ईमेज.

  • 28 Jul 2025 02:31 PM (IST)

    28 Jul 2025 02:31 PM (IST)

    एकीकडे संसदेत ‘सिंदूर’वर चर्चा अन् श्रीनगरमध्ये लष्कराचे ‘ऑपरेशन महादेव’! ‘त्या’ दहशतवाद्यांचा खात्मा

    श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवत पहलगाम हल्ल्यातील तीन संशयित हल्लेखोरांना यमसदनी धाडले आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन महिन्यानंतर या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन संशयितांना लष्कराने यमसदनी धाडले आहे.

  • 28 Jul 2025 01:55 PM (IST)

    28 Jul 2025 01:55 PM (IST)

    महिला कल्याणाच्या नावाखाली ‘पैशांची उधळपट्टी’

    मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या मासिक पाळी स्वच्छता वाढवण्यासाठी आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २०१९ साली एक महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत 3 लाख 55 हजार रुपये खर्च करून सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन खरेदी करण्यात आली होती. मात्र, सहा वर्षांनंतरही ही मशीन एकदाही वापरात न आणता निष्क्रिय पडून आहे. आज तिची अवस्था इतकी दयनीय आहे की, ती पूर्णतः गंजून कबाडात रूपांतरित झाली आहे. ही घटना प्रशासकीय अपयश, प्रक्रियात्मक चूक, आणि जबाबदारीच्या अभावाचे प्रतीक बनली आहे.

  • 28 Jul 2025 01:45 PM (IST)

    28 Jul 2025 01:45 PM (IST)

    72 हजार फोटो आणि बरंच काही… Tea App चा Data Leak

    महिलांसाठी तयार करण्यात आलेलं खास अ‍ॅप म्हणजेच Tea App सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण म्हणजेच या अ‍ॅपचा डेटा लिक झाला आहे. हजारो फोटो आणि युजर्सची माहिती हॅकर्सच्या हाती लागली आहे, त्यामुळे सध्या युजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. Tea App महिलांमध्ये लोकप्रिय आहे. हे एक असं अ‍ॅप आहे, ज्यावर महिला पुरुषांना रेट करतात आणि रिव्ह्यू देतात.तर यातील 59 हजार फोटो असे आहेत, जे पोस्ट, कॉमेंट किंवा डायरेक्ट मेसेज केले आहेत आणि अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. हे असे फोटो आहेत जे परवानगीशिवाय अ‍ॅक्सेस केले जाऊ शकतात. अद्याप अनेकांना माहिती नाही, हे अ‍ॅप कसं आहे, काय कामं करतं? याबाबत जाणून घेऊया.

  • 28 Jul 2025 01:40 PM (IST)

    28 Jul 2025 01:40 PM (IST)

    देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

    सकाळपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राजाधानी दिल्ली-एनसीआरसह काही भागात पाऊसाने मात्र दांडी मारली आहे. राजधानी दिल्लीमध्ये दमट उष्णता पसरली असून दिल्लीकरांचा जीव कासावीस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने २८ जुलैचा हवामान अंदाज जारी केला आहे.हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

  • 28 Jul 2025 01:40 PM (IST)

    28 Jul 2025 01:40 PM (IST)

    आळंदीमध्ये घरात झाला गॅस सिलेंडरचा स्फोट

    पुण्यातील आळंदी चऱ्होली रस्तावरील हरिपाठ उद्यान समोरील गल्लीत असणाऱ्या घरात आज पहाटे 5.30 च्या सुमारास LPG सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे.

  • 28 Jul 2025 01:35 PM (IST)

    28 Jul 2025 01:35 PM (IST)

    कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले, गुंतवणूकदारांनी काय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

    २८ जुलै रोजी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले. याचे कारण बँकेचे जून तिमाहीचे निकाल आहेत. जून तिमाहीत बँकेची कामगिरी खराब राहिली आहे. निव्वळ नफ्यात ७ टक्क्यांनी घट झाली आहे. बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या जून तिमाहीत ३,५२० कोटी रुपयांऐवजी ३,२८२ कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीला तिच्या सामान्य विम्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाचे समायोजन केल्यानंतर हा नफा झाला आहे. जर हा नफा समाविष्ट केला तर असमायोजित निव्वळ नफा ६,२५० कोटी रुपये होतो.

  • 28 Jul 2025 01:30 PM (IST)

    28 Jul 2025 01:30 PM (IST)

    पुणे नदीपात्रामध्ये अग्निशमन दलाचे जवान तैनात

    पुणे शहर परिसरात पाऊसामुळे धरणातून होणारा विसर्ग वाढत असल्याने अग्निशमन दलाकडून नदीपात्रात व विविध ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव मेगाफोन्सद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. नदीला पाणी सोडण्यात आल्यामुळे अग्निशमन दलाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

  • 28 Jul 2025 01:25 PM (IST)

    28 Jul 2025 01:25 PM (IST)

    अमेरिका-युरोपियन युनियन करारानंतर टाटा मोटर्सचे शेअर्स वाढले

    टाटा समूहाच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहन युनिट असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये आज कमकुवत बाजारपेठेतही सुधारणा झाली. याचे कारण अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील व्यापार कराराची घोषणा आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात नफा वसुली होत असतानाही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सुधारणा झाली. जरी ही वाढ किरकोळ होती परंतु विक्रीच्या वादळाला न जुमानता, दिवसाच्या आत तो सुमारे २% ने वाढला. सध्या, तो बीएसईवर ०.७९% वाढीसह ₹६९२.७५ वर आहे. तथापि, तो दिवसाच्या आत १.९४% वाढून ₹७००.६० वर पोहोचला होता.

  • 28 Jul 2025 01:19 PM (IST)

    28 Jul 2025 01:19 PM (IST)

    भारताला भारतच म्हणा, ती आपली ओळख - मोहन भागवत

    भारत हे एक विशेष नाम आहे. भारताला भाषांतर करुन इंडिया म्हटले जाते. मात्र भारत हीच आपली ओळख आहे. आपल्या चर्चेमध्ये, लेखनामध्ये सार्वजनिक चर्चा, वैयक्तिक चर्चा यामध्ये भारताला भारत म्हटले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

  • 28 Jul 2025 01:15 PM (IST)

    28 Jul 2025 01:15 PM (IST)

    थायलंड कंबोडियात वादात आता ‘या’ देशाचा सहभाग

    थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमावादावरुन गेल्या चार दिवसांपासून संघर्षा सुरु होता. या संघर्षात ३३ हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. परंतु या दाव्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर संघर्ष सुरुच होता.दरम्यान आता पुन्हा एकदा मलेशियाने दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे. शिवाय दोन्ही देशांतील संघर्ष थांबल्याचेही दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियाने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थ करुन युद्धबंदीसाठी मान्यता मिळवली आहे.

  • 28 Jul 2025 01:02 PM (IST)

    28 Jul 2025 01:02 PM (IST)

    पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानी की भारतीय?

    सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आजच्या दिवशी सभागृहामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज सभागृहामध्ये चर्चा होणार आहे. याबाबत चर्चा व्हावी अशी विरोधकांची पहिल्या दिवसापासून मागणी होती. अखेर यावर चर्चा होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. पहलगाम हल्ल्यांमधील दहशतवादी हे भारतीय होते की पाकिस्तानी होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

  • 28 Jul 2025 12:56 PM (IST)

    28 Jul 2025 12:56 PM (IST)

    वर्ध्यामध्ये भाजपची विभागीय मंथन बैठक पार

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे वर्ध्यामध्ये मंथन पार पडले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

  • 28 Jul 2025 12:41 PM (IST)

    28 Jul 2025 12:41 PM (IST)

    आत्महत्या की हत्या ? शनिशिंगणापूर देवस्थानाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

    पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनि देवस्थान मध्ये मोठा गोंधळ असल्याचे कबूल करत याबाबत चौकशी नेमली होती. यानंतर आज देवस्थानचे वरिष्ठ अधिकारी नितीन शेटे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नितीन शेटे यांची आत्महत्या ही चौकशीच्या भीतीपोटी की राजकीय बळी? याबाबत शनिशिंगणापूर सह नेवासे तालुक्यामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • 28 Jul 2025 12:34 PM (IST)

    28 Jul 2025 12:34 PM (IST)

    खडकवासला धरणातून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु

    खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आता सुरू असणारा पाण्याचा विसर्ग 22121 क्युसेक्स वाढवुन दुपारी 01.00 वा.25696 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • 28 Jul 2025 12:32 PM (IST)

    28 Jul 2025 12:32 PM (IST)

    जर्मनीमध्ये भीषण अपघात! रेल्वे रुळावरुन घसरल्याने ३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

    जर्मनीमधून एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. रविवारी (२७ जुलै) जर्मनीमध्ये एक प्रवासी ट्रेन रुळावरुन घसरली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. सध्या बचाव आणि मदत कार्य सुरु आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  • 28 Jul 2025 12:29 PM (IST)

    28 Jul 2025 12:29 PM (IST)

    थायलंड कंबोडियात युद्धबंदीसाठी मलेशियाने मांडला मध्यस्थीचा प्रस्ताव

    Thailand Combodia Ceasefire : थायलंड आणि कंबोडियामध्ये सीमावादावरुन गेल्या चार दिवसांपासून संघर्षा सुरु होता. या संघर्षात ३३ हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला होता. परंतु या दाव्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर संघर्ष सुरुच होता. आता पुन्हा एकदा मलेशियाने दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे. यासाठी मलेशियाने मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला आहे.

  • 28 Jul 2025 12:11 PM (IST)

    28 Jul 2025 12:11 PM (IST)

    आमदार रोहित पवार पुणे दौऱ्यावर

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आहेत. त्याचबरोबर वारजे भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेतल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाला भेट दिली आहे.

  • 28 Jul 2025 11:51 AM (IST)

    28 Jul 2025 11:51 AM (IST)

    लोकसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित

    लोकसभेमध्ये आज महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर सभागृहामध्ये विशेष चर्चा होणार आहे. त्यापूर्वी लोकसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

  • 28 Jul 2025 11:50 AM (IST)

    28 Jul 2025 11:50 AM (IST)

    पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानी की भारतीय? - पी चिदंबरम

    NIA ने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरुन? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय? सरकारकडून पाकिस्तानशी संघर्ष करताना काय नुकसान झालं ते का लपवलं गेलं?" असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत

  • 28 Jul 2025 11:47 AM (IST)

    28 Jul 2025 11:47 AM (IST)

    ठाकरे गटाचे सर्वच नेते घेणार राज्यपालांची भेट

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एक मोठी मागणी केली जाणार आहे. मा कोणती मागणी केली जाणार याची माहिती समोर आलेली नाही.

  • 28 Jul 2025 11:27 AM (IST)

    28 Jul 2025 11:27 AM (IST)

    संसदेमध्ये गाजणार ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा

    भारताने पाकिस्तान विरोधात कारवाई करत ऑपरेशन सिंदूर केले होते. यामधून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. मात्र ते बंद झाल्यावरुन जोरदार वाद निर्माण झाला. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून आज सभागृहामध्ये ऑपरेशन सिंदूरवरुन चर्चा रंगणार आहे.

  • 28 Jul 2025 11:23 AM (IST)

    28 Jul 2025 11:23 AM (IST)

    श्रावणी सोमवार निमित्त शिवमंदिरात भक्तांची अलोट गर्दी

    श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे. यानिमित्ताने सर्व शिवभक्तांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शिवमंदिरामध्ये भक्तांचा जनसागर लोटला आहे.

  • 28 Jul 2025 11:19 AM (IST)

    28 Jul 2025 11:19 AM (IST)

    बाराबंकी मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

    उत्तर प्रदेशमधील बाराबांकी मंदिरात दुर्दैवी घटना झाली आहे. माकडांमुळे विजेचा तार तुटला आणि भाविकांच्या रांगेत पडला. यामुळे टीन शेडमध्ये विद्युत प्रवाह वाहू लागला. विजेचा धक्का बसल्याने चेंगराचेंगरीची घटना झाली आहे. या चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ४० हून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना ताबडतोब बाराबंकी जिल्ह्यातील त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले.

  • 28 Jul 2025 11:17 AM (IST)

    28 Jul 2025 11:17 AM (IST)

    रोहिणी खडसे आणि रोहित पवार पुणे पोलीस आयुक्तालयात होणार दाखल

    पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. प्रांजल खेवलकर कालपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाबाबत सखोल माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार आणि रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल होणार आहेत

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 28 july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • maharashtra news
  • political news
  • Top Marathi News Today

संबंधित बातम्या

असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?
1

असं काय घडलं की ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळली?

Shrirang Barne affidavit News : खासदार श्रीरंग बारणे हाजीर हो….! शपथपत्रात दिली खोटी माहिती दिल्या प्रकरणी न्यायालयाचा दणका
2

Shrirang Barne affidavit News : खासदार श्रीरंग बारणे हाजीर हो….! शपथपत्रात दिली खोटी माहिती दिल्या प्रकरणी न्यायालयाचा दणका

Maharashtra Golden Data : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थ्यांवर एका क्लिकमध्ये बसणार वचक
3

Maharashtra Golden Data : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थ्यांवर एका क्लिकमध्ये बसणार वचक

‘शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता’; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण
4

‘शरद पवार गटाचे आमदार असा शब्द मी वापरला होता’; छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.