
PM Narendra modi dark skin tone in tamilnadu create Dispute as modi makeup in south state
PM Modi Dark Skin tone : चैन्नई : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचाराला जोर आला असून प्रचारसभांमध्ये राजकीय वादंग निर्माण झाला आहे. दक्षिणेतील राज्यांवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने राजकीय खेळी आखल्या असून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. पंतप्रधान मोदींची तमिळनाडूमध्ये सभा पार पडली. मात्र या सभेमध्ये पंतप्रधान मोदी हे नेहमीपेक्षा अधिक सावळे दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक अयशस्वी झाल्याबद्दल विरोधकांवर निशाणा साधला. कोईम्बतूर येथील एका सभेत त्यांनी विरोधकांना महिला विरोधी म्हणत टीका केली. ते म्हणाले की जर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असते, तर तामिळनाडूतील अनेक सामान्य महिलांना लोकसभेत पोहोचण्याची संधी मिळाली असती. त्या खासदार आणि आमदार झाल्या असत्या. एवढेच नाही तर तामिळनाडूतील जागांची संख्याही वाढली असती.पण दुर्दैवाने या चांगल्या कामांना विलंब झाला, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
हे देखील वाचा : देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र फेल…! खासदार राऊतांची जहरी टीका
मात्र पंतप्रधान मोदींची ही सभा वेगळ्याच विषयावरुन गाजली आहे. पंतप्रधान मोदी हे या सभेमध्ये नेहमीपेक्षा अधिक सावळ्या रंगाचे दिसत होते. पंतप्रधान मोदी हे गौर वर्णीय आहेत. मात्र तमिळनाडूमधील त्यांचा डार्क स्कीनटोन हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिणात्य देशांमध्ये सभा घेण्यासाठी स्वतः स्कीन टोन डार्क केला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र याचे तथ्य अद्याप समोर आलेले नाही.
Make-Up and Dress to Suit the Region of Election Rally. pic.twitter.com/oH8GNfdxjO — Dr Ranjan (@DocRGM_) April 19, 2026
हे देखील वाचा : “TMC ला जास्त महिला खासदार नको होत्या…; महिला आरक्षणावरुन PM मोदींचा विश्वासघाताचा आरोप
नेटकऱ्यांनी मात्र पंतप्रधान मोदींनी दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रचार करताना डार्क रंगाचा मेकअप केला असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. एक्सवर अनेकांनी त्यांचा व्हिडिओ शेअर करुन टीका केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, जैसा देश वैसा भेस…ज्या प्रदेशातील प्रचार रॅली त्याला योग्य असा पोषाख व मेक-अप केला, अशी टीका केली. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, देशाला संबोधित करताना एक लूक आणि दक्षिण भारतीय लोकांना संबोधित करताना दुसरा लूक…मोदीजींच्या मेकअप आर्टिस्टला एक सलाम, अशी टीका नेटकऱ्याने केली आहे.
1. While addressing Nation
2. While addressing south indian people. One salute to Modi ji’s make up artist. pic.twitter.com/viMfDj8QPU — Chikoo 𝕏 (@tweeterrant) April 19, 2026