Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ

-Marathi breaking live marathi headlines सुशीला कार्की यांना नेपाळचे अंतरिम पंतप्रधान बनवल्यानंतर, पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली ज्यामध्ये नेपाळी संसद औपचारिकपणे विसर्जित करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 13, 2025 | 02:15 PM
LIVE
Top Marathi News Today Live: सुशिला कार्की यांनी घेतली नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ
Follow Us
Close
Follow Us:
  • 13 Sep 2025 02:15 PM (IST)

    13 Sep 2025 02:15 PM (IST)

    शानदार कमबॅक! ‘या’ राज्यांतील नागरिकांचा वीकेंड होणार गारेगार

    गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मात्र आता भारतीय हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. पंजाब, दिल्ली या राज्यांना पुराचा फटका देखील बसला. राजधानी दिल्लीत देखील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 72 तास म्हणजे तीन दिवस देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

  • 13 Sep 2025 02:05 PM (IST)

    13 Sep 2025 02:05 PM (IST)

    मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हॉटएअर बलूनला आग; थोडक्यात वाचला जीव

    मध्य प्रदेशातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव एका कार्यक्रमासाठी मंदसौर जिल्ह्यात गेले होते. याठिकाणी एका  गरम हवेचा फुग्यात (Hot Air Balloon)  स्वार  होण्यासाठी  गेले होते. पण  फुगा फुगवताना  अचानक  फुग्याला आग लागली. यावेळी मोहन यादव यांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सुरक्षितरित्य बाहेर काढले आणि पुढचा अनर्थ टळला. पण अचानक फुग्याला आग लागल्यामुळे त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, फुग्याच्या खालच्या भागात आग लागली. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित आहेत.

  • 13 Sep 2025 01:50 PM (IST)

    13 Sep 2025 01:50 PM (IST)

    दशावतार पहिल्याच दिवशी ‘आरपार”! बॉक्स ऑफिसवर तब्बल ६५ लाखांची कमाई

    दशावतार या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतं, अखेर हा सिनेमा 12सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने 12 सप्टेंबरला एक दोन नाही तर तब्बल तीन मराठी सिनेमे रिलीज झालेत. बॉक्स ऑफिसवर सध्या हिंदी सोबतच मराठी चित्रपटांची तगडी स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मराठीमध्ये एक नाही तर तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दशावतार, आरपार, आणि बिन लग्नाची गोष्ट असे तीन तीन मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले आहेत.

  • 13 Sep 2025 01:30 PM (IST)

    13 Sep 2025 01:30 PM (IST)

    संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही

    प्रेमसंबंधांत अनेकदा अनेक जोडपी शारिरीक संबंध प्रस्थापित करतात पण नंतर काही कारणास्तव वेगळे झाल्यास पुरूषांना बलात्काराची धमकी दिली जाते. असे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणात महिला आणि पुरूष दोघांनाही मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशाच एका प्रकरणात अहलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची टिपण्णी दिली आहे. “दीर्घकालीन संमतीने प्रेमसंबंधात शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही.” असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महोबा जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या सहकारी लेखपालविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायमूर्ती अरुण कुमार सिंह देशवाल यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली.

  • 13 Sep 2025 01:25 PM (IST)

    13 Sep 2025 01:25 PM (IST)

    जुनैद आणि साई पल्लवीच्या आगामी चित्रपटाचे नाव उघड

    जुनैद खान आणि साई पल्लवी लवकरच ‘मेरे रहो’ चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट आमिर खान आणि मन्सूर खान यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. तब्बल १७ वर्षांनी आमिर खान आणि मन्सूर खान हे दोन्ही भाऊ प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घेऊन येत आहे. हा चित्रपट आता लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

  • 13 Sep 2025 01:20 PM (IST)

    13 Sep 2025 01:20 PM (IST)

    ‘या’ देशाच्या सरकारने नियुक्त केली जगातील पहिली AI मंत्री

    आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही. औद्योगिक क्षेत्र, आरोग्यसेवा, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये AI क्रांती घडवत आहे. मात्र आता राजकारण आणि शासन व्यवस्थेतदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) औपचारिक प्रवेश झाला आहे. आणि हा ऐतिहासिक पाऊल टाकणारा पहिला देश ठरला आहे अल्बेनिया. अल्बेनियाने आपल्या कॅबिनेटमध्ये व्हर्च्युअल एआय मंत्री “डिएला” यांची नियुक्ती करून जागतिक स्तरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्यावर सर्वात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे  सरकारी करारांमधील भ्रष्टाचार रोखणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे.

  • 13 Sep 2025 01:18 PM (IST)

    13 Sep 2025 01:18 PM (IST)

    जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

    चिपळूण : महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली व निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 13 Sep 2025 01:17 PM (IST)

    13 Sep 2025 01:17 PM (IST)

    उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

    शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध केला आहे. अलिकडच्या दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अमेरिकेत बनवलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांनी आठवण करून दिली की त्यांनी सामना रद्द करण्यासाठी बीसीसीआय अध्यक्षांना पत्र लिहिले होते, कारण पाकिस्तानी क्रिकेटपटू अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर भारत आणि ऑपरेशन सिंदूरचा अपमान करताना आढळले आहेत.

  • 13 Sep 2025 01:17 PM (IST)

    13 Sep 2025 01:17 PM (IST)

    206 हाडं म्हातारपणापर्यंत राहतील मजबूत

    व्हिटॅमिन डी हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. जर त्याची कमतरता असेल तर त्याचा पहिला परिणाम कॅल्शियमच्या शोषणावर होतो. जर शरीरात व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम योग्यरित्या शोषले जाणार नाही आणि त्यामुळे हाडे कमकुवत होतात. व्हिटॅमिन डी रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि पॅराथोर्मोन संतुलित करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका बजावते. पॅराथोर्मोन कॅल्शियमचे चयापचय नियंत्रित करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात सूज येणे, सतत शरीरदुखी, पाठदुखी, खांदेदुखी आणि सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • 13 Sep 2025 01:05 PM (IST)

    13 Sep 2025 01:05 PM (IST)

    पंतप्रधान विमानतळावरूनच रॅलीला संबोधित करतील

    मिझोरममधील ऐझॉलमधील हवामान खराब आहे. अशा परिस्थितीत, पंतप्रधान ऐझॉल विमानतळावरूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, पंतप्रधान आसाम रायफल्स ग्राउंडवर जनतेला संबोधित करणार होते. खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर विमानतळावरून बैठकीच्या ठिकाणी पोहोचू शकले नाही.

  • 13 Sep 2025 12:55 PM (IST)

    13 Sep 2025 12:55 PM (IST)

    रशियाला जोरदार भूकंपाचा धक्का

    रशियाच्या कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र १० किमी खोलीवर होते. त्यानंतर, ३०० किमीच्या परिघात असलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

  • 13 Sep 2025 12:45 PM (IST)

    13 Sep 2025 12:45 PM (IST)

    मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या एयर बलूनला आग

    राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शुक्रवारी संध्याकाळी मंदसौर जिल्ह्यातील गांधी सागर येथे गांधी सागर फॉरेस्ट रिट्रीटचे उद्घाटन केले. रात्र पडताच मुख्यमंत्र्यांनी गांधी सागर येथील हिंगलाज रिसॉर्टमध्ये रात्रीचा मुक्काम केला. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी चंबळ नदीत बोटिंग केली, त्यानंतर ते एयर बलूनवर स्वार होण्यासाठी गेले, परंतु वाऱ्याचा वेग जास्त असल्याने एयर बलून उडू शकला नाही. या दरम्यान, फुग्याच्या खालच्या भागात आग तीव्र झाली, जी तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी विझवली. दुसरीकडे, मुख्यमंत्री डॉ. यादव ज्या ट्रॉलीमध्ये स्वार होते ती सुरक्षा रक्षकांनी हाताळली.

  • 13 Sep 2025 12:35 PM (IST)

    13 Sep 2025 12:35 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ मध्ये सुरू असलेल्या मोरारी बाप्पू यांच्या रामकथा कार्यक्रमाला सर्वात आधी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पडणवीस हे पोस्टल ग्राउंड वर आयोजित आदिवासी विकास विभाग कार्यक्रमालाही लावणार हजेरी.

  • 13 Sep 2025 12:25 PM (IST)

    13 Sep 2025 12:25 PM (IST)

    तीन हात नाका परिसरात आंदोलन करणार

    ठाण्यात वाहतूक कोंडीमुळे वाहतूक विभागाच्या विरोधात मनसे आक्रमक होणार आहे. वाहतूक विभाग वाहतूक कोंडी सोडवण्यास असमर्थ ठरलं आहे. ठाण्यातील तीन हात नाका या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक विभाग कार्यालयासमोर मनसेच्या वतीने येत्या सोमवारी 15 सप्टेंबर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक विभागाला देखील जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.

  • 13 Sep 2025 12:15 PM (IST)

    13 Sep 2025 12:15 PM (IST)

    साताऱ्यात रंगणार हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा, जय्यत तयारी सुरु

    सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा रविवारी 14 सप्टेंबर रोजी पार पडत आहे. हे या स्पर्धेचे 14 वे वर्ष आहे. याची मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी सध्या सातारा पोलीस कवायत मैदानावर सुरु आहे. भारतामधून आलेल्या स्पर्धकांची राहण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. स्पर्धा पार पडत असताना साताराहून कास पठाराकडे जाणारा मॅरेथॉन रस्ता सकाळी सहा ते दहा या सुमारास बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

  • 13 Sep 2025 12:07 PM (IST)

    13 Sep 2025 12:07 PM (IST)

    प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. वय झाल्यामुळे आपण थांबत असल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

  • 13 Sep 2025 12:05 PM (IST)

    13 Sep 2025 12:05 PM (IST)

    रळी डाबी येथील शोभा तुकाराम मुंडे या 35 वर्षीय महिलेचा खून

    परळी तालुक्यातील डाबी येथील शोभा तुकाराम मुंडे या महिलेचा खून… शोभा यांचे पती तुकाराम यांनीच शोभा यांचा खून केला खून करून तुकाराम पळून गेला आहे… घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत… खून कशामुळे केला अजूनही स्पष्ट झाले नाही…

  • 13 Sep 2025 11:55 AM (IST)

    13 Sep 2025 11:55 AM (IST)

    राहुल गांधी विरोधात भाजपाचे आंदोलन

    मोदींचा अपमान केल्यावरून भाजप आक्रमक… नाशिकच्या रविवार कारंजा वर भाजपाकडून घोषणाबाजी… राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 13 Sep 2025 11:44 AM (IST)

    13 Sep 2025 11:44 AM (IST)

    तुळजाभवानी देवीचे 'व्हीआयपी' दर्शन महागले

    शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग होणार आहे. व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ 20 सप्टेंबर पासून वाढ करण्यात आली आहे. दोनशे रुपयांचा देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना मिळणार, तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पास 1000 रुपयांना मिळणार आहे. स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आली आहे. सकाळच्या अभिषेक पासची संख्या तीनशेवरून चारशे करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून परिपत्रक काढून नवे दर जाहीर करण्यात आले आहे.

  • 13 Sep 2025 10:59 AM (IST)

    13 Sep 2025 10:59 AM (IST)

    महामार्गावर रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात

    पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात रिल स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) याच्या फॉर्च्युनर गाडीमुळे घडला असल्याचे समोर आले आहे.

  • 13 Sep 2025 10:55 AM (IST)

    13 Sep 2025 10:55 AM (IST)

    शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा नव्या वादाची ठिणगी

    गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

  • 13 Sep 2025 10:45 AM (IST)

    13 Sep 2025 10:45 AM (IST)

    दिशा पटानीच्या घरावर गोळीबार

    दिशा पटानी आणि खुशबू पटानी यांच्या घरावर जोरदार गोळीबार झाला. पहाटे साडेतीन वाजता दिशाच्या बरेली येथील घरावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. रोहित गोदरा टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याची पुष्टीही केली. आता दिशाचे वडील जगदीश सिंह पटानी यांनी निवेदन दिले आहे. जगदीश म्हणाले की, पोलिसांनी तत्परता दाखवली आणि गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली आहे. संपूर्ण घर पोलिसांनी वेढले आहे.

  • 13 Sep 2025 10:36 AM (IST)

    13 Sep 2025 10:36 AM (IST)

    फराह खानने कुनिकाला खडसावलं!

    रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १९’ चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे. या आठवड्यात वीकेंड का वार सलमान खान नाही तर ज्येष्ठ चित्रपट निर्माती फराह खान होस्ट करणार आहे. नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये फराह खान कुनिका सदानंद, बशीर अली आणि नेहल चुडासमा यांना फटकारताना दिसत आहे. कुनिका सदानंद देखील होस्ट फराह खानशी वागताना दिसत आहे. फराह तिला समजावून सांगत असताना, कुनिका तिला विचित्र हावभाव करताना दिसत आहे.

  • 13 Sep 2025 10:27 AM (IST)

    13 Sep 2025 10:27 AM (IST)

    ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रशियात पुन्हा ७.४ तीव्रतेचा भूकंप

    रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ एक मोठा भूकंप झाला. जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि त्याचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १० किलोमीटर खाली होते. त्याच वेळी, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता ७.४ होती आणि त्याची खोली ३९.५ किलोमीटर होती. जरी आकडेवारीत थोडा फरक असला तरी, दोन्ही एजन्सींनी तो खोल आणि शक्तिशाली भूकंप मानला. भूकंपानंतर, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने संभाव्य त्सुनामीचा इशारा जारी केला आणि इशारा दिला की या प्रदेशात धोका असू शकतो.

  • 13 Sep 2025 10:15 AM (IST)

    13 Sep 2025 10:15 AM (IST)

    श्रीलंकेसाठी बांगलादेशचे आव्हान सोपे नसणार

    आशिया कपचा आज पाचवा सामना खेळवला जाणार आहे हा सामना श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. बांग्लादेशचा हा सामना दुसरा सामना असणार आहे. श्रीलंकेच्या संघासाठी आज बांग्लादेशचे आव्हान असणार आहे. हाॅंगकाॅंगच्या संघाला बांग्लादेशने त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केले होते. पहिल्या सामन्यात हाँगकाँगवर सहज विजय मिळवून उत्साहित असलेला बांगलादेश शनिवारी आशिया कप ग्रुप बी मध्ये सहा वेळा विजेत्या श्रीलंकेशी सामना करेल, जो कठीण गटाचे भवितव्य ठरवू शकतो.

  • 13 Sep 2025 10:05 AM (IST)

    13 Sep 2025 10:05 AM (IST)

    EMI न भरल्यास स्मार्टफोन होणार लॉक

    कर्ज काढल्यावर हफ्ते भरणे हे गरजेचे असते. कर्जाचे हफ्ते वेळेवर जमा न केल्यास अनेकदा बँकांकडून कारवाई देखील केली जाते. पण, आता हफ्ते थकले तर बँक खातेदारांचे फोन लॉक होतील, असा नियम आणण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करत आहे. आरबीआय कर्ज देणाऱ्या कंपन्यांना फोन लॉक करण्याचा अधिकार देऊ शकते. हा नियम आणण्यामागील कारण म्हणजे बँका आणि वित्तीय संस्थांचे थकित कर्ज कमी करणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 13 Sep 2025 10:00 AM (IST)

    13 Sep 2025 10:00 AM (IST)

    Chat App वर होणार नेपाळच्या पंतप्रधानांची निवडणूक?

    नेपाळमध्ये अलीकडेच भ्रष्टाचार विरोधात आंदोलनं करण्यात आली. सराकरने तब्बल 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर नेपाळमधील तरूण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात हजारो तरूण सहभागी झाले होते. बघता बघता आंदोलनाला हिंसक वळण आले आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. या सर्वाचा परिणाम असा झाला की, सरकार अस्थिर झाले आणि आता असा दावा केला जात आहे की, देशातील नवीन पिढी Discord सारख्या चॅट अ‍ॅपचा वापर करून नवीन पंतप्रधान निवडण्याची चर्चा करत आहेत. पण हा अ‍ॅप नक्की काय आहे, त्याचा वापर कशासाठी केला जात आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • 13 Sep 2025 09:54 AM (IST)

    13 Sep 2025 09:54 AM (IST)

    सुशीला कार्की यांनी घेतली नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ

    Sushila Karki New PM of Nepal:  नेपाळच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कार्की यांनी पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रपती भवन शीतल निवास येथे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते त्यांनी शपथ घेतली. सध्या इतर कोणालाही मंत्रीपद देण्यात आलेले नाही.

  • 13 Sep 2025 09:45 AM (IST)

    13 Sep 2025 09:45 AM (IST)

    राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच

    मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेले वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण हजारो शिक्षकांनी पूर्ण करूनही त्यांना प्रमाणपत्रच मिळाले नव्हते. शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हता. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. मात्र, आता एससीईआरटीने पुढील आठवड्यात प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने शिक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

  • 13 Sep 2025 09:42 AM (IST)

    13 Sep 2025 09:42 AM (IST)

    महादेवी हत्तीणी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उच्चस्तरीय समितीकडे

    कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या प्रकरणाची शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, हत्तीणीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील अंतिम निर्णय उच्चस्तरीय समितीकडे सोपवला आहे.दरम्यान, नांदणीच्या स्वस्तश्री जिनसेन पठारक भट्टाचार्य मठाकडून सोमवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात परतण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात ती मठात यावी, अशी अपेक्षा कोल्हापूरकर व्यक्त करत आहेत.

  • 13 Sep 2025 09:38 AM (IST)

    13 Sep 2025 09:38 AM (IST)

    फराह खानने बसीर खानचे उघडले सर्व पत्ते!

    Bigg Boss Promo : टीव्हीवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ मध्ये यावेळी वीकेंड का वार खूप धोकादायक ठरणार आहे. सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत, फराह खान पुन्हा एकदा त्याच्या जागी ‘बिग बॉस’ होस्ट करताना दिसणार आहे. फराह खानच्या आगमनामुळे यावेळी अनेक स्पर्धकांना धक्का बसू शकतो. सलमान या सीझनमध्ये स्पर्धकांशी अतिशय सौम्यतेने वागतोय, पण फराह कोणालाही सोडणार नाही.

  • 13 Sep 2025 09:32 AM (IST)

    13 Sep 2025 09:32 AM (IST)

    बीडमध्ये अमानुष मारहाण आणि अपहरण; व्हिडिओ व्हायरल

    जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने नागनाथ नन्नवरे यांना लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करत अपहरण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, ही थरारक घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून तिची क्लिप परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे गुन्हेगारीचं मूळ बीडमध्ये किती खोलवर गेलं आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

  • 13 Sep 2025 09:32 AM (IST)

    13 Sep 2025 09:32 AM (IST)

    रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला

    पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे. तर आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या परिसरात अश्या अनेक घटना घडताना दिसत आहे.

  • 13 Sep 2025 09:30 AM (IST)

    13 Sep 2025 09:30 AM (IST)

    नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ सप्टेंबर) मणिपूरला भेट देणार आहेत. २०२३ मध्ये राज्यात झालेल्या वांशिक हिंसाचारानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे, ज्यामध्ये किमान २६० लोक मारले गेले होते आणि हजारो लोक बेघर झाले होते. मणिपूरच्या शांतता आणि विकासाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मिझोराममधील ऐझॉल येथून चुराचंदपूरला पोहोचतील आणि तेथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

    पंतप्रधान मोदींचा दौरा मिझोराममधील ऐझॉल येथून सुरू होईल, जिथे ते ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे पायाभरणी आणि उद्घाटन करतील. या प्रकल्पांमध्ये बैराबी-सैरंग रेल्वे मार्ग, ४५ किमी लांबीचा ऐझॉल बायपास रस्ता, थेंझावल-सियालसुक आणि खानकोर्न-रोंगुरा रस्ता आणि मुआलखांगमधील एलपीजी बॉटलिंग प्लांट यांचा समावेश आहे.

  • 13 Sep 2025 09:25 AM (IST)

    13 Sep 2025 09:25 AM (IST)

    फिल्ल सॉल्ट रन मशीन, इंग्लंडने पहिल्या सामन्याचा हिशोब घेतलाच

    दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या टी 20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती काल या मालिकेचा दुसरा सामना पार पडला यामध्ये इंग्लंडच्या संघाने पलटवार केला आहे इंग्लंडच्या संघाने २० ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट्स गमावून ३०० हून अधिक धावा करून धुमाकूळ घातला होता. यामध्ये फिल सॉल्ट याने शतक झळकावले आणि नाबाद खेळी खेळली. इंग्लडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला 146 धावांनी पराभूत केले.

  • 13 Sep 2025 09:23 AM (IST)

    13 Sep 2025 09:23 AM (IST)

    रशियात पु्न्हा ७.४ तीव्रतेचा तीव्र भूकंप

    शनिवारी (१३ सप्टेंबर) रशियाच्या कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ ७.४ तीव्रतेचा तीव्र भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची खोली १० किलोमीटर (६.२ मैल) होती. GFZ अहवालानुसार, भूकंपाचे केंद्र कामचटका शहराच्या पूर्व किनाऱ्याजवळ होते. पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने इशारा दिला आहे की भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर (१८६ मैल) अंतरापर्यंत किनारी भागात धोकादायक लाटा उसळू शकतात. भूकंपानंतर लगेचच, अमेरिकन त्सुनामी चेतावणी प्रणालीने त्सुनामीचा धोका जारी केला. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क करण्यात आले आहे आणि किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 13 Sep 2025 09:19 AM (IST)

    13 Sep 2025 09:19 AM (IST)

    सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरुच

    भारतात आज 13 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,129 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,201 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,347 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,010 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,290 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,470 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 132.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,32,100 रुपये आहे.

  • 13 Sep 2025 09:12 AM (IST)

    13 Sep 2025 09:12 AM (IST)

    अंबाजोगाईत पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

    बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. पत्नीने पतीला लाथा बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली आहे. यामध्येच घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.

  • 13 Sep 2025 09:11 AM (IST)

    13 Sep 2025 09:11 AM (IST)

    मतचोरीच्या काँग्रेसच्या आरोपांना नक्षलवाद्यांचा पाठिंबा

    मतचोरीबाबत काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना आता नक्षलवाद्यांचा पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च निर्णय प्रक्रिया करणाऱ्या ‘सेंट्रल कमिटी’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.  तसेच, मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासूनच मतचोरीच्या माध्यमातून विधानसभा व इतर निवडणुकांमध्ये विजय मिळवला. हीच पद्धत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही वापरली, असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे.

  • 13 Sep 2025 09:02 AM (IST)

    13 Sep 2025 09:02 AM (IST)

    पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच मणिपूर पेटले

    इम्फाळ : मणिपूरमध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे पाहिला मिळाले होते. या हिंसाचाराने संपूर्ण राज्य अशांत झाले होते. त्यानंतर येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसत असतानाच आता पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला.

  • 13 Sep 2025 08:46 AM (IST)

    13 Sep 2025 08:46 AM (IST)

    गुणवत्तापूर्ण बांधकामासाठी गडकरींचा भर; हलगर्जी अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

    “प्रत्येकाने चांगले काम करायला हवे. त्याचे श्रेय निश्चित मिळते. मात्र, राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार, आर्किटेक्ट यांना काम द्या असा दबाव सरकारी अधिकाऱ्यांवर येतो. तरीदेखील त्यावर मार्ग काढत चांगल्या दर्जाचे काम व्हायला हवे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, “बांधकाम क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण दृष्टिकोन ठेवून कमी खर्चात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि किफायतशीर बांधकाम साहित्याचा वापर करून चांगले प्रकल्प उभारले जावेत.”

Marathi Breaking news live updates:  नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शितल निवास येथे झालेल्या समारंभात राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशासमोरील राजकीय आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रतिष्ठित माजी मुख्य न्यायाधीश कार्की यांची निवड करण्यात आली आहे.

 

Web Title: Marathi breaking news today live updates political sports crime national international entertainment business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार
1

Top Marathi News Today: विजापूरच्या जंगलात चकमकीचा थरार; 2 नक्षलवादी ठार

Top Marathi News Today:  उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; अनिल परब, संजय राऊत देखील सोबत
2

Top Marathi News Today: उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला; अनिल परब, संजय राऊत देखील सोबत

Top Marathi News Today: कुणबी-मराठा आरक्षणाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध; थेट मराठा म्हणून आरक्षणाची मागणी
3

Top Marathi News Today: कुणबी-मराठा आरक्षणाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध; थेट मराठा म्हणून आरक्षणाची मागणी

Top Marathi News Today: गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप
4

Top Marathi News Today: गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! लाडक्या बाप्पाला वाजत गाजत निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.