Marathi Breaking news updates- मराठा समाजाला “कुणबी-मराठा” या स्वरूपात ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट विरोध दर्शवला आहे. राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नाव न घेता मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली असून, “मराठा समाजाला गोंधळात टाकण्याचे प्रयत्न आमच्याच समाजातील काहीजण करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. नागणे म्हणाले की, “कुणबी प्रमाणपत्र ही कोणतीही शाश्वत बाब नसून, ते कधीही रद्द होऊ शकते. त्यामुळे समाजाला भ्रमात ठेवण्याऐवजी थेट ‘मराठा’ म्हणूनच आरक्षण द्यावे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्याचबरोबर, राजकीय पक्षांनीही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मोर्चाने केली आहे.
09 Sep 2025 06:01 PM (IST)
केंद्रशासित प्रदेश लडाखमधील जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियर (Siachen Glacier) येथे हिमस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत तीन भारतीय सैनिकांना वीरमरण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सैनिक गुजरात, उत्तर प्रदेश आणि झारखंडचे आहेत. ते ५ तास बर्फात अडकले होते. एका कॅप्टनला वाचवण्यात यश आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १२,००० फूट उंचीवर असलेल्या सियाचीनच्या बेस कॅम्पजवळ हिमस्खलन झाले. यामध्ये दोन अग्निवीर जवानांसह तीन सैनिक अडकले होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनंतर बचाव पथकांनी बर्फाखाली गाडल्या गेलेल्या तिन्ही सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेबद्दल अधिक तपशील येणे बाकी आहे.
09 Sep 2025 06:00 PM (IST)
मंगळवारी (९ सप्टेंबर) भारतातील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१०,००० रुपयांवर पोहोचला. जागतिक बाजारपेठेतही वाढ दिसून येत आहे. अॅक्सिस म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये मौल्यवान धातूंमध्ये तेजीचा कल आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस $३,४७५ आणि चांदीचा भाव प्रति औंस $४० आहे. चांदीच्या किमती १३ वर्षांच्या उच्चांकावर आहेत. सोने आणि चांदीच्या किमती वर्षानुवर्षे ३५-४५% ने वाढल्या आहेत, जे बहुतेक मालमत्ता वर्गांमध्ये सर्वाधिक आहे. आर्थिक अनिश्चितता, डॉलरमधील कमकुवतपणा आणि व्याजदरांमध्ये संभाव्य कपात या काळात जागतिक गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी हे सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण आहे.
09 Sep 2025 05:52 PM (IST)
कोलकातास्थित वीज कंपनी CESC ने गुंतवणूकदारांसमोर त्यांची आगामी विकास योजना उघड केली आहे. कंपनी पुढील पाच वर्षांत अक्षय ऊर्जा आणि वितरण क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गत, CESC 3 GW पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमता विकसित करेल, ज्याचे लक्ष्य आर्थिक वर्ष 29 पर्यंत 3.2 GW आणि आर्थिक वर्ष 32 पर्यंत 10 GW अक्षय क्षमता साध्य करण्याचे आहे. एकूण भांडवली खर्च 300 अब्ज रुपये असेल, ज्यामध्ये वितरणात 60 अब्ज रुपये, अक्षय प्रकल्पांमध्ये 230 अब्ज रुपये आणि सौर उत्पादनात 30 अब्ज रुपये गुंतवले जातील.
09 Sep 2025 05:16 PM (IST)
Nepal Crisis: कालपासून नेपाळमध्ये हिंसाचार घडत आहे. काल नेपाळ सरकारने सोशल मिडियावर बंदी घातली होती. त्यानंतर तेथील नागरिकांनी मोठे आंदोलन केले. मात्र सरकारने सोशल मिडियावर घातलेली बंदी मागे घेतल्ली आहे. मात्र त्यानंतर तेथील हिंसाचार वाढला आहे. दरम्यान पंतप्रधान केपी ओली यांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
09 Sep 2025 04:50 PM (IST)
मीरा-भाईंदरच्या जय बजरंग नगरमध्ये अन्नातून विषबाधेची भीषण घटना घडली आहे. एका कुटुंबातील सहा जण आजारी पडले असून केवळ तीन वर्षांच्या दिपाली मोर्या या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रमेश, नीलम आणि राजकुमार मोर्या यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चाहत आणि अनामिका मोर्या यांना प्रकृती गंभीर असल्याने मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट असून पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानत फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे.
09 Sep 2025 04:45 PM (IST)
डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणावर समाधानक प्रक्रिया सुरू असून, कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे की कोणालाही बेघर केले जाणार नाही. रात्री केडीएमसी आयुक्तांना विनंती केल्यानंतर समर्थ कॉम्प्लेक्सवरील तोडक कारवाई स्थगित करण्यात आली असून, नगरविकास खात्यात या प्रकरणी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
09 Sep 2025 04:35 PM (IST)
बीडमध्ये कर्मचाऱ्यांवर त्यांचे म्हणणे ऐकून न घेता निलंबनाची कारवाई केली जात असल्याने आज तब्बल 1200 कर्मचारी सामूहिक रजेवर गेले असून मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील कर्मचारी संघटनेने दिला आहे..
09 Sep 2025 04:30 PM (IST)
डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्सवर होणारी तोडक कारवाई अखेर तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मात्र या कारवाईच्या विरोधात नागरिकांचा संताप उसळला. हातात फलक आणि पेट्रोलच्या बाटल्या घेऊन महिला इमारतीखाली उतरल्या आणि “जर पालिकेने कारवाई केली तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ,” असा थेट इशारा दिला. रहिवाशांना पाठिंबा देत शिवसेना ठाकरे गटही रस्त्यावर उतरला असून, “ही कारवाई होऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतला आहे.
09 Sep 2025 04:25 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असून डेंग्यूचे ११३, चिकूनगुनियाचे ४४ तर मलेरियाचे तब्बल १०० रुग्ण आढळले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आरोग्य पथकांना सज्ज ठेवत रेल्वे, बसस्थानक आणि चेकपोस्टवर तपासणी केली. यात ९८८ रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले, तर ६९ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले. पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्न-पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे आजार वाढत असल्याने नागरिकांना स्वच्छतेसह आरोग्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
09 Sep 2025 04:15 PM (IST)
राज्य महामार्ग असो किंवा राष्ट्रीय महामार्ग खड्यांच्या समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहेत. अलिबागपासून वडखळ रस्ता केवळ 22 किमीचा. 22 किमीचा राष्ट्रीय महामार्ग (क्र.166ओ) अत्यंत दुरवस्थेत असून लाखो खड्डे, उंचवटे, वाकडे-तिकडे वळणं यामुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. या रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण तसेच रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
09 Sep 2025 04:10 PM (IST)
आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर कारवाई करा अशाप्रकारचे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू राहिल्याने संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात होणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीवर परवाना अधिकारी गणेश टेमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे.
09 Sep 2025 04:05 PM (IST)
ठाण्यात डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच, महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली उभारलेले कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर आता डासांच्या पैदाशीचे नवे केंद्र ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. विसर्जनानंतर साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी आहे.विसर्जनाच्या काळात अनेक तलाव रिकामे पडले, तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पाणी दूषित अवस्थेत आहे. काही कंटेनरमध्ये तर या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास सुरू होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच ठाण्यात डेंग्यू व मलेरियाने शेकडो नागरिक त्रस्त असताना, महापालिकेच्या या 'पर्यावरणपूरक प्रयोगा'मुळे साथरोग फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
09 Sep 2025 03:55 PM (IST)
Vice President Elections 2025: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळपासून निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. इंडिया आघाडी आणि भाजपकडून आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचे दावे केले जात आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे.
09 Sep 2025 03:47 PM (IST)
तुम्हाला आठवतंय का अलीकडेच सोशल मीडयावर घिबली ईमेजचा ट्रेंड सुरु झाला होता. नेत्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत सर्वजण घिबली ईमेज तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत होते. AI टूल्स चॅटजीपीटी आणि ग्रोक घिबली ईमेज तयार करण्यात आघाडीवर होते. सर्वांनाच घिबलीचे वेड लागले होते.
09 Sep 2025 03:40 PM (IST)
आशिया कप 2025 चा थरार (Asia Cup 2025) आज (9 सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल. त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने स्पष्ट केले आहे की, आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात त्यांचा संघ आपल्या आक्रमक पवित्र्यापासून अजिबात मागे हटणार नाही.
09 Sep 2025 03:29 PM (IST)
Rain Update: सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही देशभरात मान्सून सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पंजाब, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
09 Sep 2025 03:19 PM (IST)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) आजकाल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या प्रत्येक कामात आपण एआयची मदत घेऊ शकतो. रोजच्या जीवनातील अनेक कामे सुखकर करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच एआय संबंधित एक मजेदार आणि हास्यास्पद व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात एक आज्जी चक्क एआयसोबत भिडताना दिसून आल्या. आज्जीच्या प्रश्नांना एआयने जे उत्तर दिलं ते ऐकून आता सर्वांनाच हसू अनावर झालं आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
09 Sep 2025 03:17 PM (IST)
सांगलीच्या मिरज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री अपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
09 Sep 2025 03:09 PM (IST)
आशिया कप २०२५ (Asia cup 2025)आजपासून म्हणजेच ९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हाँगकाँग आणि अफगाणिस्तान या दोन संघात सलामीची लढत होणार आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवला जाणार आहे. आशिया कप स्पर्धेला सुरवात होण्याआधीच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.
09 Sep 2025 02:58 PM (IST)
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे, आणि तुमच्याकडे हे काम पूर्ण करण्यासाठी आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही वेळेवर ITR दाखल केला नाही, तर तुम्हाला मोठा दंड आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे, योग्य कागदपत्रे तयार करणे, अचूक माहिती भरणे आणि वेळेवर ऑनलाइन रिटर्न दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही नॉन-ऑडिट ITR दाखल करणार असाल, तर याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे.
09 Sep 2025 02:56 PM (IST)
लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस १९ दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत चालला आहे. स्पर्धकांमधील भांडणे आणि एकमेकांविरुद्ध त्यांच्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. आता शोचा एक नवीन प्रोमो लाँच झाला आहे, ज्यामध्ये बिग बॉस १९ च्या घरातील स्पर्धकांमध्ये खूप तणाव दिसून येत आहे. कारण ‘बिग बॉस’ने कोणते स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत याची घोषणा केली आहे. या नव्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
09 Sep 2025 02:55 PM (IST)
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे, आणि तुमच्याकडे हे काम पूर्ण करण्यासाठी आता फक्त 7 दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही वेळेवर ITR दाखल केला नाही, तर तुम्हाला मोठा दंड आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
09 Sep 2025 02:55 PM (IST)
9 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये 4 मॉडेल्सचा समावेश असणार आहे. सध्या सर्वत्र आयफोन 17 ची चर्चा सुरु असतानाच आता एक अनोखा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतातील युजर्सना कोणत्या प्रकारचा आयफोन खरेदी करणं पसंत आहे. हा रिपोर्ट सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या आकड्यांवर आधारित आहे.
09 Sep 2025 02:54 PM (IST)
काठमांडूमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. मंगळवारी सकाळपासून संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने निदर्शक पंतप्रधानांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत आहेत. वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) दुबईला जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. असे सांगितले जात आहे की ते उपचारासाठी दुबईला जाऊ शकतात आणि त्यासाठी खाजगी विमान कंपनी हिमालय एअरलाइन्सला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. याचदरम्यान आता नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला आहे.
09 Sep 2025 02:54 PM (IST)
Jane Street Marathi News: सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरण (SAT) ने मंगळवारी अमेरिकन हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग (HFT) फर्म जेन स्ट्रीट आणि तिच्या सहयोगी कंपन्यांचे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या आदेशाविरुद्धचे अपील स्वीकारले, ज्यामध्ये कंपनीवर निफ्टी बँक निर्देशांकात फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
09 Sep 2025 02:54 PM (IST)
US Open 2025 : सोमवार, ८ सप्टेंबर रोजी यूएस ओपन २०२५ (US Open 2025 )मध्ये कार्लोस अल्काराजने जॅनिक सिनरला पराभूत करून जेतेपद नावावर केले. या विजयासह कार्लोस अल्काराजने दुसरे यूएस ओपन जेतेपद पटकावले आणि एटीपी रँकिंगमध्ये नंबर १ स्थानी देखील वियाराजमान झाला. त्याच वेळी, ९ सप्टेंबर हा यूएसए ओपनसाठी खूप विषय दिवस देखील ठरला. या एकाच तारखेला वेगवेगळे इतिहास रचले गेले आहेत.
09 Sep 2025 02:53 PM (IST)
रविवारी (७ सप्टेंबर) इस्रायलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू, तर १२ जखमी झाले होते. या हल्ल्याचे वर्णन करताना दहशतवादाला शाप असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले. यावेळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त केला, तसेच दहशतवादाविरोधा इस्रायलला भारताचा पाठिंबा असेल असेही म्हटले. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींची आभार मानले आहेत.
09 Sep 2025 02:52 PM (IST)
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येते. त्याच वेळी भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी उपवास करणे, गणपती बाप्पाची पूजा करणे आणि दान करणे खूप फलदायी मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला भगवान गणेशाचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात आणि जीवनातील दुःखांपासूनही मुक्तता मिळू शकते.
09 Sep 2025 02:52 PM (IST)
जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी गोवा फिरण्यासाठी येतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे, संस्कृती आणि चविष्ट गोवन पद्धतीमध्ये बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतात. गोव्यातील सी फ्रुड जगभरात सगळीकडे फेमस आहे. तिथे वेगवेगळ्या माशांचा वापर करून फिश करी आणि फिश फ्राय बनवले जातात. गोव्यातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी खास करून पर्यटक गोव्यात जातात. त्यातील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे गोवन फिश करी. ओल्या खोबऱ्याचा किस, कोकम आणि त्रिफळाचा वापर करून बनवलेली करी चवीला अतिशय सुंदर लागते. गोवन फिश करी आणि वाफाळता उकड्या तांदळाचा भात हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते. गोव्यातील पारंपरिक पदार्थांची चव तुम्ही घरी बसून सुद्धा घेऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोवन फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
09 Sep 2025 02:52 PM (IST)
बिग बॉस १९ च्या नवीनतम भागात, नाॅमिनेशन टास्क दरम्यान खूप गोंधळ झाला आणि असे काही क्षण होते ज्यामुळे प्रेक्षकांना अनियंत्रितपणे हसवावे लागले. या टास्कमध्ये २ स्पर्धकांना वेळ मोजायला सांगितला होता 19 मिनिटांनंतर स्पर्धकांनी बजर वारवायचा होता. तर उर्वरित घरातील सदस्यांना त्यांचे लक्ष विचलित करावे लागले. आता अभिषेक बजाजची पाळी होती आणि नेहलला त्याचे लक्ष विचलित करायचे होते त्यावेळी तिने अनेक मुद्दांवर तिने बजाजला सुनावले.
09 Sep 2025 02:30 PM (IST)
गायक-रॅपर बादशाह सध्या अमेरिकेत ‘अनफिनिश्ड यूएसए टूर’वर आहे, जिथे तो उत्तर अमेरिकेत धुमाकूळ घालत आहे. बादशाह त्याच्या गाण्यांनी आणि रॅपने त्याच्या कॉन्सर्टमध्ये लोकांना नाचवतो आहे. दरम्यान, न्यू जर्सीमध्ये नुकत्याच झालेल्या एका शोमध्ये बादशाहने असे काही केले जे आता व्हायरल होत आहे. खरंतर, गाण्याच्या मध्यभागी बादशाहने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला. यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि प्रेक्षक टाळ्या वाजवू लागले. आता गायक बादशाह नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.
09 Sep 2025 02:25 PM (IST)
9 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये टेक जायंट कंपनी अॅपल त्यांच्या आगामी आयफोन 17 सिरीजसह अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. या आगामी आयफोनबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जसे की, या आयफोन सिरीजमध्ये कोणते मॉडेल्स उपलब्ध असणार आहेत, त्यांची किंमत किती असणार आहे आणि त्यांचे फीचर्स काय असू शकतात. आगामी आयफोन सिरीजची चर्चा सुरु असतानाच आता ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
09 Sep 2025 02:20 PM (IST)
टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील देशांतर्गत विमान कंपनी एअर इंडियाने प्रवाशांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. या अंतर्गत, भारतातील कोणत्याही शहरातून युरोपमधील कोणत्याही ठिकाणी फ्लॅट भाड्याने प्रवास करता येईल. ही मर्यादित कालावधीची ऑफर ७ सप्टेंबरपासून लागू झाली आहे आणि ११ सप्टेंबरपर्यंत सर्व प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. मिळालेल्या माहितीनुसार या बुकिंग अंतर्गत, ३१ मार्च २०२६ पर्यंत प्रवास करता येईल. विमान तिकिटे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध असतील.
09 Sep 2025 02:16 PM (IST)
सध्याच्या या धाकधुकीच्या आणि व्यस्त जीवनात लोक कामाच्या व्यापात आपल्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत म्हणूनच आजकाल बहुतेक लोकांना काही ना काही आजार जडलेला असतो. कुणाला लठ्ठपणाची समस्या तर कुणाला डायबिटीजची तर कुणाला कोलेस्ट्रॉलची… पण प्रत्येक आजारावर उपाय म्हणून फक्त औषधांचे सेवन करणे काही बरोबर नव्हे. आयुर्वेदात औषधांतून कित्येक पटींनी चांगले आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांचा वापर करून आपण आपले आरोग्य निरोगी बनवू शकतो. यासाठी फार काही पैसे घालवण्याची किंवा मेहनत करण्याची गरज नाही तर फक्त स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा तुम्हाला वापर करायचा आहे. रिकाम्या पोटी भिजवलेल्या मेथीच्या दाण्याचे सेवन अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते.
09 Sep 2025 02:14 PM (IST)
सर्वच महिलांना अभिनेत्रींप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. वाढत्या वयात सुद्धा तरुण दिसण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात. कधी स्किन बोटॉक्स करून घेतले जाते तर कधी फेशिअल करून त्वचा अधिक तरुण केली जाते. पण वारंवार स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते, ज्याचा परिणाम वाढत्या वयात चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्किन ट्रीटमेंटचा वापर करू नये. यामुळे त्वचेची नुकसान होते. महागड्या पार्लर ट्रीटमेंट्स, स्किन केअर प्रॉडक्ट्स इत्यादीचा चुकीचा पद्धतीने वापर केल्यामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते.
09 Sep 2025 02:13 PM (IST)
केंद्र सरकारकडून देण्यात आलेली किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. दर चार महिन्यांनी २००० रुपये खात्यात येतात. परंतु सर्व शेतकऱ्यांना आता त्याचा लाभ मिळणार नाही. या योजनेबाबत काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील 60 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. यावरुन आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
09 Sep 2025 01:55 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. ७) चंद्रमा गार्डन येथे पार पडली. मात्र सभेदरम्यान एका तरुण सभासदाच्या वारंवार प्रश्नोत्तरांमुळे निर्माण झालेल्या वादातून दोन सभासदांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली. त्यामुळे बँकेच्या वार्षिक सभेला प्रथमच गालबोट लागले आहे. इतर सभासदांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित व्यक्तीला बाहेर काढत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
09 Sep 2025 01:45 PM (IST)
कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) तर्फे राबवण्यात येणाऱ्या कोटक कन्या शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना दरवर्षी ₹1,50,000 पर्यंतची मदत 4 ते 5 वर्षांसाठी दिली जाते. फक्त आर्थिक सहाय्यच नव्हे तर शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी मेंटरिंग, जीवन कौशल्ये, मानसिक आरोग्य सत्रं तसेच इंजिनिअरिंग विद्यार्थिनींसाठी Unstop आणि वैद्यकासाठी Marrow यांसारख्या सदस्यता सुविधा देखील दिल्या जातात. देशातील 136 अग्रगण्य संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींना या उपक्रमाचा लाभ मिळतो.
09 Sep 2025 01:40 PM (IST)
मुंबईतील कुलाबा येथे एका अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या जवानाची रायफल आणि काडतुसे घेऊन पळ काढला आहे. ही घटना शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नेव्ही नगरमध्ये घडली. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. सध्या नौदल, मुंबई पोलीस आणि एटीएस हाय अलर्ट मोडवर आहेत. संपूर्ण मुंबईत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा भारतीय नौदलाचा गणवेश घातलेल्या एका व्यक्तीने नेव्ही नगरच्या निवासी भागात ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीरला फसवले आणि त्याची रायफल आणि जिवंत काडतुसे घेऊन पळ काढला.
09 Sep 2025 01:35 PM (IST)
बिग बॉस सीझन १९ च्या दुसऱ्या आठवड्यात स्पर्धकांमध्ये बरीच बाचाबाची झाली. आठवड्याच्या शेवटी झालेल्या वादात सलमान खान आला आणि त्याने फरहाना भट्टला तिच्या अपशब्दाबद्दल फटकारले, त्यानंतर तिने माफी मागितली आणि आता ती काळजी घेईल असे म्हटले. तथापि, फरहाना भट्टने पुन्हा एकदा नॉमिनेशन टास्कमध्ये तिच्या मर्यादा ओलांडल्या.
09 Sep 2025 01:25 PM (IST)
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बिहारमध्ये केलेल्या मतदार अधिकार यात्रेत महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थीनींशी संवाद साधला. यात या तरुणींनी बिहारमधील महिलांची स्थिती राहुल गांधी यांच्यासोबत शेअर करताना दिसत आहेत.
बिहार की इन युवा बेटियों की समझ, हौसला और सपने सब प्रेरणादायक हैं।
मगर NDA सरकार की उपेक्षा उनके साथ सबसे बड़ा धोखा है - जो इन्हें शिक्षा, स्वास्थ्य और सुरक्षा जैसे बुनियादी अधिकार तक नहीं दे पाई।
हम उनकी आवाज़ दबने नहीं देंगे। हर बेटी अपने सपनों को पूरा करेगी - ये वादा है। pic.twitter.com/EBFhwDpsdW
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 8, 2025
09 Sep 2025 01:15 PM (IST)
उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. एका मालवाहून ट्रेनने डबलडेकर बसला चिरडले आहे. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० हून अधिक लोक जखमी झाली आहे. रेल्वेलाईन आणि मेक्सिकोच्या कॅनेडियन पॅसिफिक कॅन्सस सिटीने या घटनेची पुष्टी केली. या अपघाताचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने संपूर्ण मेक्सिको हादरला आहे.
09 Sep 2025 01:10 PM (IST)
गणेशोत्सवाची सांगता झाली असून गणरायाचे विर्सजन पार पडले आहे. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सर्वत्र जोरदार चर्चा असते. पण यंदा सर्वात जास्त चर्चेत राहिला म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा. लालबागचा राजाच्या दर्शनावरुन अनेकदा वाद निर्माण होत असतात. पण यंदा विसर्जनाला 33 तास लागल्यामुळे सर्व स्तरावर जोरदार टीका करण्यात आली. समुद्राच्या भरती मुळे लालबागच्या राजाचे विसर्जन खोळंबले. याबाबत गिरगाव चौपटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे लालबाग राजा मंडळ त्यांना कोर्टामध्ये खेचणार आहे.
09 Sep 2025 01:05 PM (IST)
मंगळवारी शेअर बाजार पुन्हा एकदा गॅप-अप ओपनिंगमध्ये दिसला. निफ्टीने कालच्या पातळीपेक्षा सुमारे १०० अंकांची वाढ नोंदवली आणि दिवसाचा उच्चांक २४८७९ पाहिला. सुरुवातीपासूनच आयटी आणि बँकिंग क्षेत्रात खरेदी सुरू होती. तथापि, निफ्टीने पुन्हा एकदा वरच्या पातळीपासून विक्री पाहिली आणि तो २४८०० च्या पातळीजवळ आला. आयटी क्षेत्राने निर्देशांक राखला.
09 Sep 2025 12:35 PM (IST)
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी म्हणून ओबीसी संघटना पदाधिकाऱ्यांचे नाव, पद आणि इतर माहिती गोळा करणार आहेत. ओबीसी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक बैठक असल्याची माहिती आहे.
09 Sep 2025 12:20 PM (IST)
शिर्डीत भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर भागात हा प्रकार झाला. या अज्ञातांनी बॅनरसह परिसरातील दुचाकींची केली तोडफोड केली आहे. विखे समर्थकांची पोलिस ठाण्यात धाव घेत, तक्रार दिली आहे.
09 Sep 2025 12:00 PM (IST)
केंद्र सरकारकडून उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी आता दिल्ली पोलिसांच्या ऐवजी ही जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखील पोलीस दलाला (CRPF) उपराष्ट्रपतींच्या मुख्य निवासी संकुलातील राहण्याच्या ठिकाणाची सुरक्षा, त्यांची जवळपास सुरक्षा आणि मोबाइल प्रोटेक्शन हे दिल्ली पोलिसांकडून घेण्यास सांगितले आहे. तर दिल्ली पोलिसांना उपराष्ट्रपतींच्या घरातील प्रवेशावरील नियंत्रण किवा कार पॅसेज क्लिअरन्स ड्युटी आणि निवासस्थानाच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.
09 Sep 2025 11:55 AM (IST)
पूर आणि भूस्खलनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हिमाचल प्रदेश आणि पंजाबला रवाना होत आहे. या दुःखद घटनेत भारत सरकार बाधितांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
09 Sep 2025 11:45 AM (IST)
भविष्यामध्ये काय होऊ शकते, याचा हा अंदाज आहे. आमच्या उमेदवाराला मतच पडणार नाही, हे म्हणत असतील पण आज रात्री नऊपर्यंत दुध का दुध पाणी का पाणी होईलच. या क्षणी त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये 40 मतांची तफावत आहे, हे आम्ही मान्य करतो. त्यांच्याकडे मित्रपक्षाचे मिळून बहुमत आहे. तरीही आम्ही आमचे सुदर्शन रेड्डी यांना निवडणुकीत उतरवले आहे. पाहू काय होतंय, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
09 Sep 2025 11:35 AM (IST)
राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन अनेक महिने उलटल्यानंतर देखील विरोधी पक्षनेता ठरलेला नाही. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला आहे. राज्यात काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला जातो आहे.