10 Sep 2025 02:35 PM (IST)
आशिया कप २०२५ स्पर्धेला मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला आहे. या सामन्यात अफगाणिस्ताने हाँगकाँगचा ९४ धावांनी मोठा पराभव केला. त्याच वेळी, आज म्हणजे टीम इंडिया १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपला पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडून मोठी चूक झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय चाहते भडकले आहेत. सूर्याने नेमके काय केले याबाबत आपण जाणून घेऊया.
10 Sep 2025 02:34 PM (IST)
अकोल्यात जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा ठाकरे गटाचे नेता अकोला शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी केली आहे. राजेश मिश्रा यांनी ही घोषणा एका बलात्कार प्रकरणात केली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून चाकूच्या धाकावर बलात्कार केल्याचे समोर आले. या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार आहे. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
10 Sep 2025 02:33 PM (IST)
भारतीय स्वयंपाकात अंड्याची करी हा अतिशय लोकप्रिय आणि सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने ते पौष्टिक तर आहेच, पण चवीलाही अप्रतिम लागते. अंड्याची करी बनवायला सोपी असून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. ही करी भात, पोळी, पराठा किंवा अगदी ब्रेडसोबतही अप्रतिम लागते. महाराष्ट्रातील घराघरांत ही करी अनेक प्रकारे बनवली जाते – कुठे साधी मसाल्याची करी, तर कुठे नारळाची चव देऊन खास कोकणी स्टाईलमध्ये.
10 Sep 2025 02:12 PM (IST)
Delhi Police Arrested ISIS Terrorist: दिल्ली पोलिसांनी देशभरात मोठी कारवाई केली आहे. देशभरातील अनेक भागात छापेमारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत इसिस दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या 8 ते 10 जणांना ताब्यात घेतले आहे.
10 Sep 2025 02:08 PM (IST)
मानवजातीच्या इतिहासात युद्धे नेहमीच राजकारण, सत्ताकांक्षा आणि विचारसरणीच्या संघर्षातून उद्भवली आहेत. पहिले आणि दुसरे महायुद्ध मानवी सभ्यतेला घातक ठरले, पण त्यातून लोकशाही, मानवी हक्क आणि शांतीची महत्त्वाची शिकवण मिळाली. तरीसुद्धा, आज जर जग तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत उभे आहे, तर त्याचा एक मोठा परिणाम म्हणजे जगभरात हुकूमशाहीचे वाढते वर्चस्व आणि नागरिकांचा आपल्या सरकारांविरुद्ध वाढता रोष.प्रश्न असा उभा राहतो हे सर्व घडत का आहे? दोष सरकारांचा आहे का? की ‘Gen Z’ सारख्या नव्या पिढीच्या दृष्टिकोनामुळे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे?
10 Sep 2025 02:00 PM (IST)
नेपाळच्या काठमांडूमधील परिस्थिती बिघडताना दिसत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून नेपाळच्या संसद भवनाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले. नेपाळमध्ये पसरलेल्या हिंसाचाराचा सामना एका भारतीय पर्यटकालाही करावा लागला आहे.नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिला पर्यटकाने सोशल मीडियावर तिच्या अडचणी शेअर केल्या.
10 Sep 2025 01:51 PM (IST)
महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी असलेल्या नागपूरमधील प्रवासाचा वेग कमी व्हावा व विकासासाठी त्याचा फायदा व्हावा, यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गावरून रोज शेकडो वाहने प्रवास करत आहेत. मात्र सध्या या महामार्गावर शेकडो खिळे ठोकल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेमके या व्हिडिओमागचे सत्य काय आहे ते, जाणून घेऊयात.
10 Sep 2025 01:40 PM (IST)
प्रेमामध्ये असलेला व्यक्ती टोकाचं पाऊल उचलायला मागे पुढे पाहत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. बीडमधील एका उपसरपंचाने नर्तकीच्या प्रेमामध्ये आत्महत्या केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते कला केंद्रातील नर्तिके प्रेमात पडले होते मात्र त्यानंतर बोलणं बंद झाल्यामुळे गोविंद बर्गे यांनी नर्तिकेच्या घरासमोर आत्महत्या केली.
10 Sep 2025 01:35 PM (IST)
योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी संबंधित एफएमसीजी कंपनी पतंजली फूड्सने त्यांचे पहिले बोनस शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्सचे प्रमाण २:१ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक विद्यमान शेअरहोल्डरला त्याच्या १ शेअरसाठी २ नवीन पूर्ण पेड-अप शेअर्स मिळतील. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य २ रुपये आहे. कंपनी पहिल्यांदाच शेअरहोल्डर्सना बोनस शेअर्स देत आहे.
10 Sep 2025 01:20 PM (IST)
‘बिग बॉस १९’ जसजसा पुढे सरकत आहे तसतसा हा शो अधिकाधिक तापत चालला आहे. स्पर्धकांमध्ये खूप भांडणे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता या शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा भांडताना दिसत आहेत. यामुळे वातावरण खूपच तणावपूर्ण दिसत आहे. आता या दोघांमध्ये नक्की असे काय झाले आहे की ते दोघे जोरदार भांडत आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
10 Sep 2025 01:10 PM (IST)
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये सतत चर्चेचा विषय असलेले ठाकरे बंधू आज (10 सप्टेंबर) पुन्हा एकमेकांना भेटले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी सकाळी अचानक राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब यांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या अचानक भेटीला गेल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या पाऊण तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचे दिसते. या भेटवस्तूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि उबाठा गट एकत्र येण्याचे मानले जात आहे.
10 Sep 2025 01:05 PM (IST)
‘काठमांडूमधील विमानतळ बंद ठेवण्याचा कालावधी वाढवल्यानंतर, शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व उड्डाणे १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रद्द राहतील. आम्ही काठमांडूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवासासाठी वेळापत्रक बदलण्यावर आणि रद्द करण्यावर १२ सप्टेंबरपर्यंत सूट देत आहोत, जी ९ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी केलेल्या बुकिंगसाठी लागू आहे. आमचे पथक संबंधित अधिकाऱ्यांशी सक्रियपणे समन्वय साधत आहेत आणि परवानग्या मिळताच सेवा पूर्ववत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत”, अशी माहिती इंडिगो एअरलाइन्सकडून देण्यात आली.
10 Sep 2025 01:01 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड (Donald Trump) ट्रम्प यांनी पुन्हा आपले सूर बदलेल आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी (Narendra Modi) चर्चेची इच्छा व्यक्त केली असताना दुसरीकडे युरोपियन युनियनला (EU) भारतावर १००% कर (Tarrif) लागू करण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी चीनवरही इतकाच कर लादण्यास सांगितले आहे. त्यांच्या या विधानेन संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे.
10 Sep 2025 12:55 PM (IST)
बीड- मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सुनावणी आहे. सरकारी वकील उज्वल निकम आज सुनावणीसाठी न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहेत. सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम बीडमध्ये दाखल झाले आहेत.
10 Sep 2025 12:45 PM (IST)
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांनी त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेत वाटा मागण्यासाठी दाखल केलेल्या खटल्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. न्यायालयाने संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेवा यांना संजय कपूर यांच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.
10 Sep 2025 12:35 PM (IST)
खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यातील आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जनआंदोलन सुरू करण्यात आलं आहे. जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे. या कायद्याच्या आडून सरकार जनतेचा आवाज दाबत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.
10 Sep 2025 12:25 PM (IST)
गोंदियाच्या रायपूर गाव शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ठेकेदाराला मजुरीचे पैसे मागितले म्हणून हत्या करण्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि दावनिवाडा पोलिसांनी केला आहे. कापूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (39) व ओमकार चेतराम नेवारे (52) दोन्ही रा. रायपूर जि. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
10 Sep 2025 12:10 PM (IST)
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. माजी उपसरपंच एका नर्तकीच्या प्रेमात वेडे होते. नर्तकीच्या घरासमोर कारमध्येच उपचारसपंचाने सोमवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या माजी उपसरपंचाचे नाव गोविंद जगन्नाथ बर्गे (34 वर्षे) असे आहे. तर नर्तिकीचा नाव पूजा देविदास गायकवाड (21 वर्षे) असे आहे.
10 Sep 2025 12:07 PM (IST)
समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंक्चर झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं की ब्रिजवर मोठ्या प्रमाणावर विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकल्याचे आढळून आलं आहे.
10 Sep 2025 12:00 PM (IST)
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा मैलजवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी पवार, आणि वैष्णव ईश्वर सुतार अशी आहे. तर स्वाती अमित कोळी, पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सुरज बलराम पवार आणि किशोर लक्ष्मण माळी अशी जखमींची नावे आहेत.
10 Sep 2025 11:55 AM (IST)
महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यांना 13 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या इशार्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय.
10 Sep 2025 11:45 AM (IST)
नाशिकमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सतार वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या बापाकडूनच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अत्याचारानंतर मुलगी गरोदर राहिली. तिच्या पोटात सतत दुखत असल्याने तिची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफी रेपोर्टस्मध्ये ती गरोदर असल्याचे समोर आले.पोलिसांनी DNA तपासल्यानंतर नरडं बापानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
10 Sep 2025 11:45 AM (IST)
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील विरोधकांची मतं फुटली असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यानी केला. यावर टीका करताना खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही विकला गेलात, शरण गेलात, स्वाभिमान गहाण पडलाय आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्यार शिंतोडे उडवताय. फार शहाणपणा करू नका नाहीतर नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात तुमच्याबाबतीत व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.
10 Sep 2025 11:35 AM (IST)
गणेशोत्सव नुकताच पार पडला असून आज संकष्टी चतुर्थी आहे. यानिमित्ताने गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज संकष्टी असून दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी हि तिथी सुरू होणार आहे तर उद्या म्हणजेच गुरूवार, 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल.
10 Sep 2025 11:25 AM (IST)
दिल्लीतील शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून थार गाडी पडली. गाडीच्या पूजेदरम्यान हा अपघात झाला. ही महिला टायरखाली लिंबू ठेवून थारखाली ते चिरडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान वेग वाढला आणि गाडी पहिल्या मजल्यावरून थेट रस्त्यावर पडली. या अपघातात महिला जखमी झाली आहे. याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
10 Sep 2025 11:15 AM (IST)
पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी या आंदोलनातून केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे या देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत.
10 Sep 2025 11:07 AM (IST)
आज, हिमाचल प्रदेश आणि पंजाब दौऱ्यावरून परतल्यानंतर, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे. त्यात अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे जाणून खूप वेदना होत आहेत. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांतता राखण्याचे नम्र आवाहन करतो.
10 Sep 2025 10:42 AM (IST)
गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश नेपाळमध्ये हिंसाचार उफाळला आहे. नेपाळ सरकारने देशातील सोशम मीडियावर बंदी घातल्यामुळे नेपाळमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये, निदर्शकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला आणि संसद भवनासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आग लावली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा देत देशातून पलायन केले. पण त्यानंतर मात्र नेपाळ लष्कराने देशाची सुत्रे हाती घेतली आहेत. लष्कराकडून देशात परिस्थिती निंयत्रणात आणण्यासाठी काम सुरू आहे. तर दुसरीकडे नेपाळमध्ये अंतरिम सरकारसाठी नव्या नावांची चर्चाही सुरू झाली हे.
10 Sep 2025 10:35 AM (IST)
सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा मैलजवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी बापू सुतार, आशाताई शिवाजी पवार, आणि वैष्णव ईश्वर सुतार अशी आहे. तर स्वाती अमित कोळी, पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सुरज बलराम पवार आणि किशोर लक्ष्मण माळी अशी जखमींची नावे आहेत.
10 Sep 2025 10:25 AM (IST)
भारतात आज 10 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,030 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,111 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,273 रुपये आहे. भारतात काल 9 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,837 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,934 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,128 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,110 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,10,300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 82,730 रुपये आहे.
10 Sep 2025 10:17 AM (IST)
प्रत्येकालाच अतिशय घनदाट आणि काळेभोर केस हवे असतात. सुंदर केसांसाठी अनेक वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट किंवा शॅम्पूचा वापर केला जातो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे हेअर केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. पण केस व्यवस्थित धुतले नाहीतर कोणतेही प्रॉडक्ट किंवा ट्रीटमेंट केसांसाठी प्रभावी ठरणार नाहीत. केस व्यवस्थित न धुतल्यामुळे टाळूवरील इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय केसांमध्ये कोंडा वाढतो, ज्यामुळे केस गळणे, केस कोरडे पडणे किंवा केस पांढरे होण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला वारंवार दुर्लक्ष करतात. पण केसांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी हेअर स्टायलिश आणि हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी केस धुवण्याची सोपी पद्धत सांगितली आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. योग्य पद्धतीने केस धुतल्यास केसांच्या बऱ्याच समस्या दूर होतील. वाचा सविस्तर
10 Sep 2025 10:06 AM (IST)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. साथीचे आजार झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब किंवा आरोग्यासंबंधित इतरही अनेक समस्या उद्भवतात. पण सर्दी, खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा कान दुखतो. कानामध्ये वाढलेल्या वेदनांमुळे काहीवेळा कहयोची=खूप जास्त तीव्र वेदना होतात. तर काहींच्या कानात बुरशी तयार होते. कानात निर्माण झालेल्या बुरशीमुळे कानाचे देडे बसतात. कानाच्या आतील भाग घसा आणि नाकाशी जोडणारी यूस्टेशियन ट्यूब असते. त्यामुळे सर्दी झाल्यानंतर नळीला सूज येते किंवा नळी बंद होते.यामुळे कानाच्या आतील भागावर जास्तीचा तणाव येतो आणि कानात वेदना होऊ लागतात. ही समस्या प्रामुख्याने सर्दी झाल्यानंतर उद्भवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कान दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे कानाच्या समस्या दूर होतील. वाचा सविस्तर
10 Sep 2025 09:59 AM (IST)
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापूर्वी मराठा समाजाला कुणबी असल्याची प्रमाणपत्रे वाटप सुरू करण्याची मागणी करत सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर त्याचा चांगलाच परिणाम जाणवल्याचे दिसून येत आहे.
10 Sep 2025 09:50 AM (IST)
सोलापूर/ बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. माजी उपसरपंच एका नर्तकीच्या प्रेमात वेडे होते. नर्तकीच्या घरासमोर कारमध्येच उपचारसपंचाने सोमवारी मध्यरात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या माजी उपसरपंचाचे नाव गोविंद जगन्नाथ बर्गे (34 वर्षे) असे आहे. तर नर्तिकीचा नाव पूजा देविदास गायकवाड (21 वर्षे) असे आहे.
10 Sep 2025 09:40 AM (IST)
10 सप्टेंबर रोजीचे रिडीम कोड्स
10 Sep 2025 09:30 AM (IST)
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे सातत्याने उपोषण-आंदोलन करत आहेत. त्यातच सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील जो जीआर सरकारने काढला आहे, तो रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
10 Sep 2025 09:20 AM (IST)
गोंदिया: गोंदियाच्या रायपूर गाव शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ठेकेदाराला मजुरीचे पैसे मागितले म्हणून हत्या करण्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या परकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि दावनिवाडा पोलिसांनी केला आहे. कापूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (39) व ओमकार चेतराम नेवारे (52) दोन्ही रा. रायपूर जि. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
10 Sep 2025 09:17 AM (IST)
मंगळवारी (९ सप्टेंबर) नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांच्या दुसऱ्या दिवशी, सरकारविरोधी निदर्शनांमध्ये, निदर्शकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला आणि संसद भवनासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आग लावली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या राजीनाम्यादरम्यान, देशातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. तथापि, आता देशाची सूत्रे लष्कराच्या हाती आहेत. सध्या, अंतरिम सरकारसाठी चेहरे शोधण्याचे काम सुरू आहे.
सोशल मीडियावरील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील 'जेन जी' निदर्शन सुरू झाले. भ्रष्टाचार आणि सामान्य लोकांबद्दल उदासीनतेबद्दल ओली सरकार आणि देशातील राजकीय अभिजात वर्गावर वाढती सार्वजनिक टीका दर्शविणारे हे एक मोठे अभियान बनले.
10 Sep 2025 09:10 AM (IST)
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार व्होडाफोन आयडिया, बिकाजी फूड्स, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा, ब्लू जेट हेल्थकेअर, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, स्टर्लिंग आणि विल्सन, टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडिया ग्लास, अरिहंत कॅपिटल मार्केट्स, अफल 3i, कोवाई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल आणि टॅलब्रोस ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स यांचा समावेश आहे.
10 Sep 2025 08:49 AM (IST)
Apple मंगळवारी आयोजित केलेल्या ईव्हेंटमध्ये त्यांची नवीन लाईनअप लाँच केली आहे. Apple’s ‘Awe-Dropping 2025 ईव्हेंट मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा ईव्हेंट सुरु झाला. या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. कंपनीने त्यांच्या नेक्स्ट Gen iPhone लाइनअपची घोषणा केली आहे. या नेक्स्ट Gen iPhone लाइनअपची सुरुवात एंट्री-लेवल iPhone 17 ने झाली आहे. या सिरीजमधील बेस मॉडेल आहे.
10 Sep 2025 08:48 AM (IST)
नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि हिंसाचार सुरू असताना, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, पंतप्रधान केपी ओली आणि इतर अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, विमानतळ बंद करण्यात आले आहे.
10 Sep 2025 08:47 AM (IST)
पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्राने नियोसेरिका (Neoserica) वंशातील एका नव्या भुंग्याच्या प्रजातीचा शोध लावला आहे. या प्रजातीला नियोसेरिका आकुर्डी कलावटे, 2025 (Neoserica akurdi Kalawate, 2025) असे नाव देण्यात आले आहे. ही प्रजाती पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या परिसरातून आढळली आहे. या संशोधन पथकात डॉ. अपर्णा कलावटे, पूजा कुमार मिसाल आणि नॅन्सी सुप्रिया यांचा समावेश आहे. हा संशोधन लेख रेकॉर्ड्स ऑफ़ द झूलॉजिकल सर्वे ऑफ़ इंडिया या शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
10 Sep 2025 08:46 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. असे असताना आता बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राजधानी दिल्लीत मुसळधार पावसानंतर दिल्लीकरांना पुन्हा एकदा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या यमुना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.
Marathi Breaking news live updates: गोंदियाच्या रायपूर गाव शिवारातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ठेकेदाराला मजुरीचे पैसे मागितले म्हणून हत्या करण्यात करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना २ सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि दावनिवाडा पोलिसांनी केला आहे. कापूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (39) व ओमकार चेतराम नेवारे (52) दोन्ही रा. रायपूर जि. गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.