महाराष्ट्रातील अपडेट्स एका क्लिकवर
19 Aug 2025 10:35 AM (IST)
भारताच्या अलिकडच्या विजयांमुळे आत्मविश्वास वाढला आहे, परंतु नीतू डेव्हिडच्या नेतृत्वाखालील महिला निवड समिती मंगळवारी मुंबईत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी संघ निवडताना शेफाली वर्मा आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांच्या समावेशावरून काही कठीण प्रश्नांना तोंड देईल. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळले जातील, तर भारत ३० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठ संघांच्या ५० षटकांच्या विश्वचषकातील इतर सर्व सामने आयोजित करेल आणि पहिल्यांदाच जागतिक ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल.
19 Aug 2025 10:30 AM (IST)
गडचिरोली : गडचिरोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करत अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी देसाईगंज शहरातील एका नामांकित सराफ व्यापारी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीची सराफ व्यवसायिकासोबत मैत्री झाली होती. त्यातून लागाचें आमिष दाखवत आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हंटल आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे सुनील पंडलिक बोके (48) आणि अक्षय कुंदनवार (32) हे दोघेही देसाईगंजचे रहिवासी आहेत.
19 Aug 2025 10:25 AM (IST)
आज, म्हणजेच १९ ऑगस्ट हा दिवस भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आहे, कारण आज २०२५ च्या टी-२० आशिया कपसाठी भारताच्या पुरुष संघाची घोषणा होणार आहे. जर तुम्हीही आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाच्या संघाची आतुरतेने वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ८ देशांदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी केली जाईल. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत संघाची घोषणा करतील. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन जवळजवळ निश्चित आहे. तथापि, शुभमन गिल निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल.
19 Aug 2025 10:20 AM (IST)
Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबई, पालघर, कोकणाला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. राज्यातील सवर्च भागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान सध्या राज्यभरात कुठे कुठे पाऊस सुरु आहे आणि काय स्थिती निर्माण झाली आहे याचा एक आढावा घेऊयात.
19 Aug 2025 10:15 AM (IST)
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना तीन स्टॉकची खरेदी-विक्री करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये UTI AMC, नायका आणि ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, वेदांत, व्होडाफोन आयडिया, हिंदुस्तान झिंक, ग्लेनमार्क फार्मा, जीएमआर विमानतळ, ट्रेंट, टाटा स्टील, एस्कॉर्ट्स कुबोटा, ओएनजीसी या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, जेटीएल इंडस्ट्रीज आणि श्रीराम प्रॉपर्टीज हे शेअर्स १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा.
19 Aug 2025 10:10 AM (IST)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेची लाईव्ह स्ट्रिमिंग : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये काही दिवसाआधी तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 2-1 असे पराभुत केले. आता या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा आज होणार आहे. टी20 मालिकेचे दक्षिण आफ्रिका संघाचे एडन मार्करमने केले होते तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे मिचेल मार्शने नेतृत्व केले होते.
19 Aug 2025 10:07 AM (IST)
मुंबईत मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालयेही बंद राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. वाहनांची वाहतूक करणे कठीण होत आहे. काही ठिकाणी २-४ तास तर काही ठिकाणी ८ तासांपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
19 Aug 2025 10:05 AM (IST)
मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पहिला अपघात चिपळूण कराड मार्गावर झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरा अपघात लातूर जिल्ह्यातील तावशी ताडा पाटी येथे घडला आहे. एका खाजगी प्रवासी बसने आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते, दोन वाहक आणि एक सहाय्यक देखील यांच्यासोबत प्रवास करत होता. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहे.
19 Aug 2025 10:02 AM (IST)
NAVI MUMBAI | मुसळधार पावसामुळे ऐरोली मधील रस्ते झाले जलमय झाले असून 24 तासात सरासरी 200 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासून नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत असून ऐरोली प्रवेशद्वार असलेल्या सबवे जवळ पाणी साचले आहे. नवी मुंबईत रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहतूक झाली संथ झाली आहे.
19 Aug 2025 10:00 AM (IST)
19 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,117 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,274 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,588 रुपये आहे. 18 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,118 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,275 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,589 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,740 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,170 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 75,880 रुपये आहे.
19 Aug 2025 09:58 AM (IST)
NAVI MUMBAI | नवी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला आहे. जोरदार पावसामुळे नवी मुंबईतील काही सखल भागामध्ये पाणी साचले असून रहिवासी सोसायट्यांमध्ये संपूर्ण पाणी भरले आहे. जोरदार पावसामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होताना दिसून येत आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Marine Drive witnesses high tides amid the heavy rainfall in the city. pic.twitter.com/83D21X2wgf
— ANI (@ANI) August 19, 2025
19 Aug 2025 09:55 AM (IST)
आशिया कपसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 : आशिया कप सुरू व्हायला फक्त २० दिवस शिल्लक आहेत. भारताच्या संघाची अजूनपर्यंत बीसीसीआयने घोषणा केलेली नाही. टीम इंडियाने मागील काही वर्षांमध्ये टी20 क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. यावर्षी आशिया कप हा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये नाही तर टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेत हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळणार नाहीत.
19 Aug 2025 09:52 AM (IST)
गणेश चतुर्थीचा सण आला की वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण पसरते. प्रत्येक घरात आणि मंदिरात बाप्पांची स्थापना केली जाते तसेच ठिकठिकाणी भव्य पंडाल उभारले जातात. मुंबईतील गणेशोत्सवाचे दर्शन तर जगप्रसिद्ध आहेच, पण देशाच्या इतर अनेक भागांमध्येही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. रस्ते, चौक सजवले जातात, ढोल-ताशांचा गजर आणि भक्तांची गर्दी सर्वांना मोहून टाकते. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या काळात प्रवासाचा विचार करत असाल, तर मुंबई व्यतिरिक्तही काही ठिकाणे अशी आहेत जिथे गणेशोत्सवाची झलक वेगळ्याच उत्साहाने अनुभवता येते.
19 Aug 2025 09:50 AM (IST)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे याचा परिणाम फळ भाजी विक्रेत्यांना होत आहे. पावसामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक कमी झाल्यामुळे टमाटे उत्पादकांना याचा फायदा बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे भाव अगदीच घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे टमाट्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळेच 400 ते 500 रुपयांना जाणारे टमाट्यांचे कॅरेट आता 1 हजार रुपयांवर येऊन पोहोचले आहे. किरकोळ बाजारात येणारे काही दिवस टमाट्याचे भाव 60 किलो इतक्या दराने विकले जाणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या ४ दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाःकार माजवला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत समुद्र खवळला असून महाराष्ट्रातील नद्यांची पातळीदेखील ओलांडली आहे आणि यामुळे सगळीकडेच धोका वाढलाय. आज सकाळच्या पावसामुळे भांडुपच्या एलबीएस मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले असून ठाण्याकडे जाणारी वाहतूक आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा