कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढवला (फोटो- सोशल मीडिया)
सातारा/ Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वागढवण्यात आला आहे. कोयनेतून विसर्ग वाढवण्यात आल्याने सांगली-कोल्हापुरात महापुरचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोयनेतून विसर्ग वाढवला
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ९ फुटांवरून ११ फुटापर्यंत उघडून ७८,४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ८०,५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.