Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathwada News : पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकर सरसावले; मराठवाड्यात जीवनावश्यक वस्तू -अन्नधान्य आणि औषधांचा ताफा रवाना

भीषण परिस्थितीत पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर पुढे आले आहेत. काल रात्री कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधं घेऊन ताफा सोलापूर- धाराशिवकडे रवाना झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2025 | 06:28 PM
Marathwada News : पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकर सरसावले; मराठवाड्यात जीवनावश्यक वस्तू -अन्नधान्य आणि औषधांचा ताफा रवाना
Follow Us
Close
Follow Us:
  • पूरग्रस्त बळीराजासाठी कल्याणकर सरसावले
  • मराठवाड्यात जीवनावश्यक वस्तू -अन्नधान्य आणि औषधांचा ताफा रवाना

कल्याण :महाराष्ट्राच्या सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत मुसळधार पावसाने अनेक गावं जलमय झाली. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून जनावरे, धान्य, घरं आणि संसाराची साधनं वाहून गेल्याने ग्रामीण भागातील बळीराजा आणखीनच संकटात सापडला आहे. या भीषण परिस्थितीत पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर पुढे आले आहेत. काल रात्री कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधं घेऊन ताफा सोलापूर- धाराशिवकडे रवाना झाला. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा विभाग मित्र परिवाराच्या पुढाकारातून ही मदत रवाना करण्यात आली.

एकीकडे दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पुरामुळे मात्र शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण करण्यासह त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी बेतुरकर पाडा विभाग मित्र परिवारातर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे आवाहन करण्यात आले होते. ज्याला कल्याणमधील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाच्या संसारासाठी ही मदत पोहोचवून कल्याणकरांनी पुन्हा एकदा माणुसकीचं सुंदर उदाहरण घालून दिलं आहे. अनेक ग्रामीण भागांत पुरामुळे शाळा, रस्ते आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीत नागरी भागातून येणारी ही मदत शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देणारी ठरत आहे.

या मदत मोहिमेत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष सहकार्य करणाऱ्यांमध्ये नरेंद्र पवार, माजी नगरसेवक संदीप गायकर आणि त्यांचे सहकारी यांच्यासह राजेश ठाणगे, अक्षय वाघ, दिनेश अभंग, भाऊ धुमाळ, अमित आहेर, अमेय आमले, शुभम अभंग, अक्षय देशमुख, कपिल देसले, बसवराज कोळी, कुणाल जगताप, अजित म्हस्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहाचा वाटा उचलला.

या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून, “कल्याणकरांची ही मदत म्हणजे म्हणजे पूरग्रस्तांच्या जीवनातील अंधकार दूर करणारी आहे. पुरामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी बेतुरकर पाडा मित्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे अशा शब्दांत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, प्रिया शर्मा मॅडम, भाऊ धुमाळ, सोमनाथ अभंग, कपिल देसले, दीपक देसले आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

Web Title: Marathwada news kalyankar rushed to help flood hit baliraja a convoy of essential goods food grains and medicines left for marathwada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Heavy Rainfall
  • Marathwada

संबंधित बातम्या

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
1

Navi Mumbai : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचा मोठा निर्णय; मधुरा गेठेंनी घेतली पूरग्रस्त मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना
2

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Karjat News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ? कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक
3

Karjat News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ? कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक

Dhule News : शिरपूरमध्ये लंपीच्या लसीकरणानंतरही आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत
4

Dhule News : शिरपूरमध्ये लंपीच्या लसीकरणानंतरही आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.