Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News: शेतकऱ्यांनो सावध व्हा! रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल मोठी किंमत

अधिक उत्पादनाच्या मोहापायी रासायनिक खतांचा वापर वाढला. ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. खराब जमिनीत पीक घेण्यासाठी पुन्हा रसायनांचा वापर करावा लागत असल्याने हे घातक चक्र सुरूच आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 25, 2026 | 04:50 PM
Organic Farming Workshop, Chemical Fertilizers Impact, Soil Health Degradation, Sustainable Agriculture,

Organic Farming Workshop, Chemical Fertilizers Impact, Soil Health Degradation, Sustainable Agriculture,

Follow Us
Follow Us:
  • रासायनिक खतांमुळे आरोग्यावर घाला! कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढले
  • जमिनीचा पोत वाचवण्यासाठी सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वळण्याचे आवाहन
  • पारंपरिक शेती हीच काळाची गरज! यवत येथील कार्यशाळेत तज्ज्ञांनी व्यक्त केला गंभीर धोका
Farmers News:  शेतकरी आपल्या शेतात शेत पीकांना रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर करतात. मात्र, या रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत तर दिवसेंदिवस खालावत असून, त्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहेत. त्यामुळे वेळीच सेंद्रिय आणि जैविक शेतीकडे वळले पाहिजे; अन्यथा येणाऱ्या पिढ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा गंभीर धोका कृषी तज्ज्ञ डॉ. विनोद पाटील यांनी व्यक्त केला. (Agricultural News)

केरळनंतर आता ‘या’ राज्याचे बदलणार नाव? भाजप खासदाराने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

 

दौंड पंचायत समिती कृषी विभाग आणि रोटरी क्लब ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने यवत येथे ‘सेंद्रिय शेती कार्यशाळा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य मार्गदर्शक कृषी तज्ज्ञ डॉ विनोद पाटील बोलत होते. याप्रसंगी दौंडचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, रोटरीचे एन्व्हायर्नमेंट डायरेक्टर राजेंद्रकुमार सराफ, रोटरीचे अध्यक्ष दीपक शासम तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ पाटील यांनी शेतकरी जे विविध शेतपिके आणि फळे घेतात यावर प्रकाश टाकला. आरोग्यावर घाला, अन्नातून शरीरात जाणाऱ्या रासायनिक अंशामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत आहे. (Farmers News)

विषारी दुष्टचक्र :

अधिक उत्पादनाच्या मोहापायी रासायनिक खतांचा वापर वाढला. ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. खराब जमिनीत पीक घेण्यासाठी पुन्हा रसायनांचा वापर करावा लागत असल्याने हे घातक चक्र सुरूच आहे. मात्र, भविष्यात संभाव्य धोके ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. आपल्या पूर्वजांची पारंपरिक शेती पद्धत आज विस्मृतीत जात आहे. आज त्याच पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

NCERTच्या पुस्तकावरून वाद; न्यायव्यवस्थेतील ५ कोटी प्रलंबित खटल्यांवरून CJI संतापले

जैविक प्रयोगांना यश

डॉ. पाटील यांनी यावेळी स्वतः विकसित केलेल्या ‘एस. व्ही. गोल्ड’ या जैविक जिवाणूंची माहिती दिली. या तंत्रज्ञानामुळे केळी, पेरू, ऊस, डाळिंब आणि भाजीपाला पिकांमध्ये लक्षणीय उत्पादनवाढ झाल्याचे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. शेतकरी समाधान शिंदे, दत्तात्रेय दोरगे आणि सुनील राऊत या शेतकऱ्यांनी जैविक शेतीचे आपले सकारात्मक अनुभव यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगत सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती हाच भविष्यातील शाश्वत पर्याय असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, या कार्यशाळेत दौंड तालुक्यातून आलेल्या अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बाबत विविध बाबी आणि महत्त्वाच्या माहिती प्रत्यक्षात पाहायला मिळाली.

 

Web Title: Farmers beware future generations will have to pay a heavy price due to the excessive use of chemical fertilizers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Daund News
  • Farmers News

संबंधित बातम्या

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत
1

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.