
मार्कर पेनचा 'खेळ' खल्लास! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय (Photo Credit - X)
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “महानगरपालिका निवडणुकीतील मार्कर पेनचा अनुभव पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा (काडीने लावण्यात येणारी शाई) वापर करणार आहोत. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी मतदारांच्या बोटाला पूर्वीप्रमाणेच काडीने शाई लावली जाईल.”
शाई पुसली जात असल्याचा दावा आयोगाने फेटाळून लावला आहे. “मार्करची शाई एकदा सुकली की ती निघत नाही. शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी नेमकं काय वापरलं हे माहित नाही, पण समाजात चुकीचे नरेटिव्ह पसरवले जात आहेत,” असे वाघमारे यांनी सांगितले. आयोगाने स्पष्ट केले की, २०११ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा वापर करण्याचा नियम आहे. नखावर आणि त्वचेवर ३-४ वेळा शाई घासून लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना आधीच देण्यात आल्या आहेत.
शाई पुसली तरी बोगस मतदान शक्य नसल्याचे आयोगाने निक्षून सांगितले आहे. मतदान केल्यानंतर मतदाराची रीतसर नोंद ठेवली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसली म्हणून कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकत नाही. प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी गुरुवारी दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. सध्या निवडणुकांबाबत एक प्रकारचा छळ सुरू आहे, हे आपण सर्वजण पाहात आहे. निवडणुका कशा जिंकायच्या हे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. जेव्हा आम्ही पुन्हा मतदानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा निवडणूक आयोगाने म्हटले की आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसताना, तुमचा उमेदवार निर्भयपणे मतदान करत आहे की नाही हे तुम्हाला माहित नव्हते. या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाना पाडू यंत्र आणले. हे पाडू यंत्र मतमोजणीवेळी वापरले जाणार आहे.सरकारने ठरवलेच आहे. विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लक ठेवायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने कोणत्याही सरकारी पक्षाला पाडू यंत्र दाखवलेले नाही. निवडणूक आयोग या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती देत नाही. आधी मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जायची. पण आता मार्करने मतदारांच्या बोटावर खूण केली जात आहे. मार्करने लावलेली शाईसॅनिटायझरने हात धुतल्यानंतर पुसली जात आहे
BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO