नेलपेंट रिमूव्हरने मतदानाची शाई पुसली जात असल्याचा व्हिडओ रोहित पवारांनी शेअर केला (फोटो - सोशल मीडिया)
मतदारांच्या खुणेसाठी केली जाणारी मार्करची खूण ही सहज पुसली जात आहे. नेल पेंट रिमूव्हरने देखील ती पुसली जात आहे. यामुळे पालिका निवडणुकीतील विश्वासहर्ता आणि पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ही शाई पुसली जात असल्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आली आहे. यामध्ये ही शाई पुसली जात असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे.
हे देखील वाचा : मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल
नेल पेंट रिमूव्हरने शाई पुसली जात असल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसंच अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही, याचा अर्थ काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या… pic.twitter.com/2InMftEca9 — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026
त्याचबरोबर महाराष्ट्र कॉंग्रेसने देखील शाई पुसली जात असल्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर कॉंग्रेसने लिहिले आहे की, कधी नव्हे ते निवडणूकीत आज शाई ऐवजी मार्कर वापरल्या जातोय, तो मार्कर कसा पुसायचा यासाठी वेगवेगळे पर्याय अगोदरच सर्वांना माहिती आहेत, त्यामुळे एका मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर दूबार मतदार बोटावरील शाई नेलपेंट रिमुव्हर, विनेगर यांसारख्या वस्तूंचा वापर करून मिटवताहेत आणि पुन्हा दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी उभे राहताहेत, ही खरेतर लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल.
हे देखील वाचा : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?
आपल्या संविधानाने मतदानाचा समान अधिकार सर्वांना दिलेला आहे. कोणी उद्योगपती असो, पंतप्रधान असो की सामान्य नागरिक त्याला एकच मत देता येतं. पण आज खुलेआम दुबार तिबार मतदान होत असतील तर हा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान नाही का ? आज निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने उघडपणे दूबार तिबार मतदान घडवून आणत असेल तर या निवडणूकांना अर्थ तो काय उरतो, या निवडणूका घेतल्या तरी का जात आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आला तर ते काही चूक नाही, असे मत कॉंग्रेसने व्यक्त केले आहे.






