नाशिक : येत्या आठवडाभरात वेगवेगळ्या कारणांनी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना शेतमालाचे लिलाव करण्यास अडचणी येणार आहेत. माेर्केट कमिटीच्या नियमानुसार खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना २४ तासांत अदा करावे लागतात.
शनिवार आणि रविवार बॅंकांना सुटी आहे, २८ आणि २९ बॅंक कर्मचारी संपावर आहेत. अशा स्थितीत साेमवारी बाजार समिती सुरू ठेवली तर शेतकऱ्यांना पैसे अदा करणे शक्य हाेणार नाही. ३०-३१ तारखेला व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार करायचे असतात त्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहे. तर १ एप्रिल राेजी अमावस्या असल्याने तर २ तारखेला पाडवा तर ३ तारखेला रविवार असल्याने बाजार समिती बंद राहणार आहे.
[read_also content=”राखेने परळीकर हैराण; डोळ्यांचे विकार वाढले https://www.navarashtra.com/maharashtra/ash-parlikar-harassment-eye-disorders-increased-nrdm-260171.html”]
त्यामुळे आठवडाभर जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसाेय हाेणार असली तरी व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनाने आमची बाजू समजून घेण्याचे आवाहन केले आहे.