Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग; मीटर रूमला अचानक आग लागली अन्…

मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती 'जैसे थे' आहे. निधी कुठे जातो याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 15, 2025 | 12:03 PM
पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आंबिल ओढा कॉलनीतील सानेगुरुजी नगर येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील मीटर रूमला ही आग लागल्याची माहिती सध्या दिली जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेने वसाहतीतील असुरक्षित आणि जर्जर स्थिती पुन्हा एकदा उघड केली आहे.

गेल्या काही वर्षांत अशा तीन आग लागल्यानंतरही महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. आग विझविण्यास विलंब झाला आणि त्याची माहिती प्रशासनाला बराच वेळ मिळाली नाही. वसाहतीतील इमारतींची ढासळलेली स्थिती, असुरक्षित विद्युतजाळे आणि दुरुस्तीअभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सत्ताधारी भाजपचे तीन माजी नगरसेवक स्वतः या वसाहतीत राहत असूनही सुधारणा झालेल्या नाहीत.

हेदेखील वाचा : आगीशी खेळणं तरुणीला महागात पडलं! तोंडातून निघू लागल्या ज्वाळा, लोकांनी मारून मारून विझवली आग; Video Viral

युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी या घटनेनंतर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर थेट आरोप केले. त्यांनी म्हटले की, मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. निधी कुठे जातो याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे. ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे धाडवे यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, मागील तीन आगींनंतर कोणताही पंचनामा किंवा संबंधितांवर कारवाई झाली नाही, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे गंभीर उदाहरण आहे. कर्मचारी शहराची सेवा बजावतात, पण त्यांच्या राहत्या घरांची अवस्था प्रशासन जाणीवपूर्वक दुरुस्त करत नाही का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

…आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल

युवक काँग्रेसने या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याची, आगीचा पंचनामा व दुरुस्तीतील संभाव्य भ्रष्टाचाराची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही सागर धाडवे यांनी दिला आहे.

विट्यात दुकानाला आग

दुसऱ्या एका घटनेत, सांगलीच्या विटा येथील जुन्या वासुंबे रस्त्यावरील असणाऱ्या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. तीन मजली इमारतीमध्ये सर्वात खालच्या मजल्यावर दुकान आहे. तर वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंब वास्तव्याला आहेत. या दुकानाला आग लागल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलचे कारण समोर आलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Massive fire breaks out in ambil odha colony in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Fire Case
  • Pune Fire
  • pune news

संबंधित बातम्या

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध
1

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप
2

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी
3

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी

Sports News: ‘टीम एक्स्ट्रीम’च्या खेळाडूंनी गाजवले ‘या’ स्पर्धेचे मैदान; 6 पदकांची कमाई करत…
4

Sports News: ‘टीम एक्स्ट्रीम’च्या खेळाडूंनी गाजवले ‘या’ स्पर्धेचे मैदान; 6 पदकांची कमाई करत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.